HSRP number plate Registration Deadline In Marathi : लाखो वाहनधारकांना दिलासा HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली

HSRP number plate Registration Deadline In Marathi : या तारखेपर्यंत बसवू शकता नंबर प्लेट

HSRP number plate Registration Deadline In Marathi : राज्यातील लाखो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. HSRP नंबर प्लेट बद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच याचे एचयसआरपी प्लेट वाहनांना बसवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला.

HSRP number plate Registration Deadline जुन्या वाहनांना 15 ऑगस्ट पर्यंत एचयसआरपी नंबर प्लेट बसवण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु असे अनेक वाहन आहेत की, त्यांची अजूनही नंबर प्लेट बसवायची राहिली आहे. त्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे.

HSRP number plate Registration Deadline आता याचे HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत कधीही तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट बसवून घेऊ शकता.

HSRP नंबर साठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन वाहन मालकांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी. 1 डिसेंबर 2025 नंतर HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांवर कारवाई होणार नाही अशी माहिती सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे.

राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना HSRP number plate बसवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 ही तारीख दिली होती. परंतु अनेक वाहनांची नंबर प्लेट बसवायची राहिली असल्यामुळे आणि मुदत संपायला केवळ एक दिवस बाकी असताना सरकारने यामध्ये बदल करून पुन्हा एकदा मुदत वाढवून दिली आहे.

आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाहन मालकांनी एचयसआरपी नंबर प्लेट बसवून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे जर तुमच्या गाडीचे नंबर प्लेट बसवायची राहिली असेल तर त्वरित बसवून घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

कशी कराल अपॉइंटमेंट बुक

How To Install HSRP Number Plate

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.

तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल.

गाडीचा आरसी नंबर आणि इतर माहिती द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे सेंटर निवडावे लागेल.

त्यानंतर जे शुल्क आकारले आहे ते भरावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट ची तारीख समजेल.

त्यानंतर अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्ही तेथे जाऊन तुमच्या गाडीचे नंबर प्लेट बसवावी लागेल.