Indian railway New Rules 2025 In Marathi : डब्यात बसणार सीसीटीव्ही, प्रवास होणार सुरक्षित
Indian railway New Rules 2025 In Marathi : भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 74,000 रेल्वे मध्ये आणि 15000 इंजिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने हे पाऊल उचललेले आहे. यासाठी AI आधारित प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे तुमचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे.
Indian railway New Rules रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता लांब पल्ल्याच्या प्रत्येक रेल्वेच्या डब्यामध्ये CCTV कॅमेरा बसवला जाणार आहे.
या संदर्भात रविवारी रेल्वे मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी च्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता.
त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर धावता ट्रेनमध्ये अनेक घटना घडल्याचेही प्रकार समोर येत होते.
Indian railway या घटना गांभीर्याने घेत रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे आणि त्यांच्यावर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
Indian railway नुकताच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवणीत सिंह बिट्टू यांनी इंजन आणि डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाचा आढावा घेतला. शनिवारी झालेल्या एका बैठकीमध्ये रेल्वे बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
Indian railways to install cctv cameras in all long distance route train या संदर्भात रेल्वेने म्हटले आहे की, या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षितता मध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. दुष्कर्म करणारे आणि संघटित टोळ्या निष्पाप प्रवाशांचा फायदा घेतात.
Indian railways to install cctv cameras in all long distance route train मात्र प्रत्येक डबा मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यानंतर यामध्ये घट होणार आहे. विशेष बाब म्हणजे प्रवाशांची गोपनीयता राखण्यासाठी दरवाजा जवळील सामान्य हालचाली क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
अशी असेल कॅमेऱ्याची सेटिंग
Indian railways to install cctv cameras in all long distance route train यासंदर्भात उत्तर रेल्वेच्या इंजिन आणि डब्यामध्ये यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. रेल्वेमंत्री यांनी 74000 रेल्वे डब्यामध्ये आणि 15000 रेल्वे इंजिन मध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे. अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे.
यानुसार प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. प्रत्येक डब्यामध्ये 4 डोम प्रकारचे CCTV कॅमेरे असतील.
एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा प्रकारे प्रत्येक इंजिन मध्ये 6 CCTV कॅमेरे असतील.
प्रत्येक इंजिनच्या केबिनमध्ये (पुढील व मागील) एक डोम सीसीटीव्ही कॅमेरा आणि दोन बेस्ट माऊंटेड मायक्रोफोन बसवले जातील.
आधुनिक देखरेख
भारतीय रेल्वेमध्ये बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक वैशिष्ट्ये सह आणि एसटी क्यू सी प्रमाणित आहेत. या संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचे आग्रह धरला होता. या संदर्भात अधिकार्यांना निर्देश देण्यात आले होते.
100 किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे चित्रीकरण उपलब्ध व्हावे याचीही खात्री करण्यात आली आहे.
त्यांनी अधिकाऱ्यांना इंडिया एआय मिशनच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज वरील डेटावर AI आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची शक्यता सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे आता रेल्वेच्या डब्यामध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.