indian railways baggage weight rules 2025 in marathi : विमानतळाप्रमाणे नियम लागू करण्याच्या तयारीत भारतीय रेल्वे
indian railways baggage weight rules : भारतीय रेल्वे विमानतळप्रमाणे कठोर नियम लागू करण्याची तयारी करत आहे. आता प्रवाशांचे सामानाचे वजन इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे मोजले जाणार आहे. एका निश्चित वजनापेक्षा अधिक वजनाचे सामान घेऊन गेल्यास दंड भरावा लागू शकतो. मोठ्या स्टेशनवर ब्रँडेड स्टोअर उघडणार आहेत. अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आधुनिक सुविधा असणार आहेत.
आता रेल्वेमध्ये प्रवास करतेवेळी आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण भारतीय रेल्वे विमानप्रमाणे कठोर नियम आणण्याच्या तयारीत आहे म्हणजेच ज्या पद्धतीने विमानात सामानाचे वजन निश्चित असते तशाच पद्धतीने आता रेल्वे स्टेशनवर पण तुमच्या बॅगचे वजन चेक केले जाणार आहे.
लवकरच तुमचे सामान रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक वेटिंग मशीनने मोजले जाणार आहे आणि निश्चित वजनापेक्षा अधिक वजन तुमच्या बॅग मध्ये भरलेले असल्यास अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. एवढेच नाही तर तुमचे बॅग हलके आहे मात्र खूप मोठे आहे किंवा असुविधा जनक साईज मध्ये आहे, तरीपण तुम्हाला पेनल्टी लागू शकते.
indian railways baggage weight rules याबरोबरच भारतीय रेल्वे आता सर्व रेल्वे स्टेशनला मॉडर्न लुक देत आहे. लवकरच मोठ्या रेल्वे स्टेशनवर ब्रँडेड शोरूम दिसणार आहेत, तेथे तुम्हाला कपडे, बुट-चपला, इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि ट्रॅव्हल संबंधित साहित्य मिळणार आहे. तेही विमानतळाप्रमाणे. या मागील रेल्वेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि कमाईचे नवीन संधी निर्माण व्हाव्या.
तिकीट क्लासप्रमाणे सामान वजन मर्यादा
रेल्वेने आता निश्चित केली आहे आता प्रवाशांच्या सामानाचे वजन आणि साईजवर कठोर नियम लागू करायचे. वेगवेगळ्या तिकीट क्लाससाठी वेगवेगळे सामानाची वजन मर्यादा ठरवण्यात येणार आहे.
जसे की एसी फर्स्ट क्लास साठी 70 किलो पर्यंत.
एसी टू सीटर साठी 50 किलो पर्यंत.
जनरल क्लास मध्ये 35 किलो पर्यंत. सामान घेऊन जाता येणार आहे.
indian railways baggage weight rules जर एखादा प्रवासी आपले सामानाचे वजन मर्यादापेक्षा कमी ठेवतो मात्र त्याच्या बॅगची साईज मोठी असेल तर अशा परिस्थितीमध्ये रेल्वेत जागा पुरत नाही त्यावेळी त्याला दंड लागू शकतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रवास आरामदायक आणि सुरक्षित बनवणे हा रेल्वेचा उद्देश आहे. कारण तुमच्या सामानामुळे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे.
सुरुवातीला हे नियम विशेष करून उत्तर रेल्वेच्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर लागू होणार आहेत. यामध्ये प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल, मिर्जापुर, अलिगड यासारख्या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश असणार आहे. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना तेव्हाच जाता येईल जेव्हा त्यांच्या सामानाचे वजन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे केले जाईल आणि वजन मर्यादेमध्ये असेल.
महाकुंभ समोर ठेवून बनवले जात आहे प्रयागराज जंक्शन स्टेशन
indian railways baggage weight rules प्रयागराज जंक्शन टेशनला मोठ्या प्रमाणात नवीन बनवले जात आहे. तेथे 907 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. आता हे रेल्वे स्टेशन नऊ मजले असणार आहे आणि यामध्ये वायफाय, स्वयंचलित तिकीट मशीन, सौर ऊर्जा आणि पावसाचे पाणी वाचवण्यासाठीच्या आधुनिक सुविधाही असणार आहेत.
2026 पासून स्टेशनमध्ये प्रवेश केवळ अधिकृत तिकीट दाखवणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार आहे, हे तिकीट विमानतळप्रमाणेच बोर्डिंग पास सारखे काम करणार आहे. ज्या लोकांना प्रवास करायचा नाही त्यांच्यासाठी विजिटर पास म्हणून प्लॅटफॉर्म टिकीट दिले जाईल.
हे बदल विशेष करून येणारे कुंभ किंवा महाकुंभ लक्षात ठेवून करण्यात येत आहेत. कारण या मोठ्या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. रेल्वे स्टेशनवर सुविधा चांगल्या करण्यासाठी आणि लोकांना असुविधेचा सामना करावा लागू नये म्हणून नवीन व्यवस्था बनवली जात आहे.
नवीन सुविधा दिव्यांग व्यक्तीसाठी ही परिपूर्ण असणार आहे आणि स्टेशनवर एक ग्रीन बिल्डिंग असणार आहे ती सौरऊर्जेवर चालणार आहे. त्यानंतर कानपूर आणि ग्वालियर सारखे अन्य मोठ्या रेल्वे स्टेशनवरही अशा प्रकारच्या सेवा-सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.