Investment Tips Age 40 Get 1 Crore Corpus With Smart Planning : अशी करा गुंतवणूक, लागेल पैशाचा ढीग
Investment Tips Age 40 Get 1 Crore Corpus With Smart Planning : निवृत्तीचे नियोजन योग्य वेळी सुरू केल्यावर तुम्ही कोट्यावधी रुपयांचा फंड जमा करू शकता. तुम्ही जर 40 वर्षाचे आहात, तर चिंता करायची गरज नाही. स्मार्ट पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करून या वयातही सहज पद्धतीने करोड रुपयांचा फंड जमा करू शकता. चला जाणून घेऊया कशी करावी गुंतवणूक.
investment tips age 40 get 1 crore corpus with smart planning सामान्यतः कमी वयातच गुंतवणूक करावी असे सांगितले जाते. मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक 25-30 वयापर्यंत निवृत्ती संदर्भात काही विचार करत नाहीत. कारण त्यांच्याकडे संधी नसते की ते निवृत्ती साठी पैसा जमा करू शकतील.
तर काही लोक 40 व्या वयापर्यंत रिटायर संदर्भात विचार करत नाहीत. जर तुम्हीही 40 वर्षाचे असाल तर निवृत्ती साठी तुम्ही काही रक्कम जमा केली नसेल तर चिंता करण्याची बाब नाही. कारण म्हणतात ना ‘जब जगो तब सबेरा’, तुम्हीही निवृत्तीसाठी करोडो रुपयाचा फंड या वयामध्ये जमा करू शकता.
यासाठी तुम्हाला स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक धोरण करावे लागेल.
मात्र 40 व्या वर्षी निवृत्तीसाठी पैसा जमा करण्यासाठी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र तुम्ही निश्चय केला तर कुठलीच गोष्ट कठीण नसते ती शक्य असते. या वयातही तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करू शकता.
त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP आणि सोन्यामध्ये गुंतवणूक चा पर्याय निवडू शकता. हे काही असे उपाय आहेत जे तुमचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मदत करतील.
Investment Tips In Marathi सोन्याने मागील एक वर्षांमध्ये जवळपास 50 टक्के परतावा दिला आहे. केवळ सप्टेंबर महिन्यामध्ये 8 ते 9 टक्के परतावा मिळाला आहे.
हिट आहे हा फार्मूला
Investment Tips In Marathi
40 व्या वर्षी करोडपती होण्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये SIP मध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. ऑगस्ट महिन्यात म्युचल फंड SIP इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा रेकॉर्ड स्तरावर पोहोचली होती. अनेक लोक यामध्ये गुंतवणूक करतात.
म्युचल फंड मोठी कंपनी विदेश व्यापार फिक्स इंटरेस्ट बाँड्स ग्लोबल फंड्स आदी मध्ये गुंतवणुकीची संधी असते. गुंतवणूक तुमची जोखीम क्षमता आणि रिटायरमेंट लक्ष नुसार म्युच्युअल फंड प्रकार किंवा संपत्तीची निवड करू शकता. यामध्ये तुम्ही बदलही करू शकता.
गुंतवणूक थांबू शकता किंवा पुन्हा एकदा सुरू करू शकता. जर तुम्ही 10 वर्षासाठी 18000 रुपये SIP द्वारे गुंतवणूक केली तर जवळपास 60 लाख रुपये पर्यंतचे रक्कम जमा होऊ शकते.
सोने खरेदी करून करा गुंतवणूक
Investment Tips In Marathi
Investment Tips सोने खरेदी करूनही तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 20,000 रुपयांचे सोने मध्ये गुंतवणूक केली तर 10 टक्क्याच्या सरासरी नुसार तुम्हाला जवळपास 40 लाख रुपयांचे रक्कम जमा होऊ शकते.
जवळपास 16 लाख 44 हजार 488 रुपये परतावा मिळू शकतो. एकूण व्हॅल्यू 39 लाख 24 हजार 478 रुपये होईल. अशा पद्धतीने तुम्ही सोने किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून 1कोटी फंड सहज जमा करू शकता.
गुंतवणुकीसाठी सांगू इच्छितो की, ऐतिहासिक सल्ल्यावर हा अंदाज आहे इक्विटी आणि सोन्यामध्ये गुंतवणूक ही गॅरंटी ची नसते कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक असतो.