Jalyukt Shivar Yojana 2.0 2024 : जलयुक्त शिवार अभियान 2024 मराठी माहिती
Jalyukt Shivar Yojana 2.0 : या योजनेचा पहिला टप्पा राज्यात यशस्वी ठरल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना 2.0 सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वकांक्षी योजना पैकी एक योजना आहे. या योजनेचा राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. या योजनेअंतर्गत दुष्काळी भागाचा सामना करावा लागणाऱ्या गावांना जलयुक्त शिवार योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात. त्यामध्ये बंधारा बांधणे, तलाव बांधणे, शेततळी तयार करणे आदि कामे केल्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची साठवणूक क्षमता निर्माण होते. त्यामुळे त्या परिसरातील भूजल पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. तसेच गावालाही पाणी उपलब्ध होत असल्याने दुष्काळाचा सामना करावा लागत नाही.
जलयुक्त शिवार योजना Jalyukt Shivar Yojana लोक चळवळ म्हणून राज्यभरात राबवली जात आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी राज्य सरकारने व्यक्ती विकास केंद्र आर्ट ऑफ लिविंग या संस्थेसोबत सामंजस करार केला आहे.
या कराराद्वारे राज्यातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर असे 24 जिल्ह्यातील 76 तालुक्यात जलयुक्त शिवाराची गाळ काढण्याची व जलस्रोतांचे खोलीकरण नाल्यात जलंदीकरण सिमेंट बंधारे बांधणे शेततळ्यांची कामे या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे.
जलयुक्त शिवार योजना 2.0 2024
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला महाविकास आघाडी सरकारचा काळात मुदतवाढ मिळाली नव्हती, मात्र आता शिंदे, फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या योजनेला पुन्हा गती देण्यात आली आहे. आणि जलयुक्त शिवार अभियान 2.0 Jalyukt Shivar Abhiyan 2.0 सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यापूर्वी 2015 ते 2019 या काळामध्ये जलयुक्त शिवार अभियान राज्यभर राबवण्यात आले. त्याचे 39 लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. आता नव्याने सुरू झालेल्या योजनेअंतर्गत तीन वर्षात सुमारे 5000 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार Jalyukt Shivar दोन मध्ये पहिल्या टप्प्यात पाणलोट क्षेत्र, विकास कार्यक्रम न राबवलेल्या पात्र गावामध्ये मृदा व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच ज्या गावांमध्ये पहिल्या टप्पा राबवला गेला आहे पण पाण्याची गरज आहे, तेथेही लोकसभागातून कामे करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी जलयुक्त शिवाराचा पहिला टप्पा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गाव इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येतील. गावाची निवड करताना पानलोट क्षेत्र हा नियोजनाचा मुख्य घटक असेल.
Jalyukt Shivar Yojana 2.0 भारत हा कृषिप्रधान देश आहे, मात्र येथील शेती अजूनही पावसाच्या पाण्यावरच अधिक प्रमाणात केली जाते. पण राज्यात पिकाच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता आणि पावसातील खंड यामुळे टंचाई सदृश्य स्थिती निर्माण होऊन त्याचा शेती पिकाला मोठा फटका बसतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण अनिश्चित व खंडित पाऊस यामुळे शेती क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबीचा विचार करून टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान 2015-16 पासून ते 2018-19 पर्यंत राबवले होते.
या जलयुक्त शिवार अभियानामध्ये Jalyukt Shivar Abhiyan एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबद्धरित्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम एक लोक चळवळ झाला. विविध दम्रता व जलसंधारणाचे क्षेत्रिय उपचार, अवघड नियंत्रण उपचार, जुन्या उपचाराचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती गाळ काढणे इत्यादी कामे एकूण 22 हजार 593 गावात मोहीम राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. यात 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण झाली, तर २०,५४४ गावे जल परिपूर्ण झाली आहेत. या Jalyukt Shivar Yojana योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे 27 लाख PCM पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात आली असून 39 लाख हेक्टर शेतीसाठी सुरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचा शेतीला मोठा फायदा होत आहे.
राज्यात जलयुक्त शिवार अभियान Jalyukt Shivar Abhiyan प्रमाणे जलसंधारणासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नानाजी देशमुख, कृषी संजीवनी प्रकल्प आदर्श गाव योजना अशा काही योजना राबवल्या गेल्या होत्या. या सर्व योजनामध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये झालेल्या कामाची देखभाल दुरुस्ती मूलस्थानी जलसंधारणाचे काम सूक्ष्म सिंचन वाढवणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढवणे, आशे उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे या गावाचा शाश्वत विकास होईल. ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झालेली नाहीत अशा उर्वरित गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची पहिल्या टप्प्याप्रमाणे कामे हाती घेणे, पावसाची पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, जलसाठे निर्माण करून पिकांसाठी संरक्षण सिंचन व्यवस्था निर्माण करणे, दुरुस्ती करून जलस्रोतांची साठवणूक क्षमता वाढवणे आदी कामासाठी शासनाने निर्णय घेतला आहे.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठीचा शासन निर्णय
Jalyukt Shivar Yojana 2.0 राज्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत प्रथम टप्प्यात तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृदा व जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान Jalyukt Shivar Abhiyan प्रथम टप्पा व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करण्यात येणार आहेत. जलसाक्षरतेद्वारे गावातील पाण्याची उपलब्ध व कार्यक्षम वापर यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मृदा व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध दलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jalyukt Shivar Yojana या योजनेसाठी मंजूर असलेल्या तरतुदी पैकी 0.25 टक्के रक्कम जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे सनियंत्रण करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान 3 लाखापेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर करून सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार अभियंता अशी वर्गवारी विचारात न घेता ही निवेद्वारे करण्यात या शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे :
जलयुक्त शिवार योजना 2.0 2024
जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठीचा शासन निर्णय
जलयुक्त शिवार योजनेत नवीन गावांचा समावेश
गावाची निवड
अवर्षण प्रवण तालुक्यातील गावांची निवड
गावाचा आराखडा
Jalyukt Shivar Yojana 2.0 कामाचा प्राधान्यक्रम
तांत्रिक व प्रशासकीय मान्यता
जल परिपूर्णता अहवाल तयार करणे
जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची थोडक्यात माहिती
महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजना 2.0 ला मंजुरी
जलयुक्त शिवार योजना 2.0 ची उद्दिष्टे
जलयुक्त शिवार योजना 2. 0 अंतर्गत करावयाच्या कामाची यादी
जलयुक्त शिवार योजनेची वैशिष्ट्ये
जलयुक्त शिवार योजनेत प्रथम या गावांना प्राधान्य
जलयुक्त शिवार योजनेची पात्रता
जलयुक्त शिवार योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
जलयुक्त शिवार योजनेची अर्ज प्रक्रिया
FAQ;s
जलयुक्त शिवार योजनेत नवीन गावांचा समावेश
- गावाची निवड : राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा Jalyukt Shivar Yojana प्रथम टप्पा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नानाजी देशमुख, कृषी संजीवनी प्रकल्प आदर्श गाव व अन्य पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत पूर्ण झालेली व कार्यान्वित असलेली गावे वगळता उर्वरित गावांपैकी पाणलोट कार्यक्रम अंमलबजावण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. याद्वारे गावांची निवड करण्यात येणार आहे.
- अवर्षण प्रवण तालुक्यातील गावांची निवड
भूजल सर्वेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे
अपूर्ण राहिलेले पाणलोट क्षेत्र
ग्रामसभेच्या मान्यतेने लोकसहभाग स्थानिक जिल्हा समितीने शिफारस केलेली व पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पात्र कामे या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
- गावाचा आराखडा
Jalyukt Shivar Yojana पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहील क्षमता नकाशा MIS पोर्टलवरून उपलब्ध करून घेऊन ग्राम समितीच्या मान्यतेने गाव आराखडा तयार करण्यात येतो. सरपंच हे ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ग्राम समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, महिला प्रतिनिधी, जलसेवक व गावांची संबंधित शासकीय क्षेत्रातील कर्मचारी यांचा समावेश आहे. जलसंधारण अधिकारी कृषी पर्यवेक्षक हे समन्वयक म्हणून काम पाहतील. विविध यंत्रणांकडून आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी नौदल अधिकारी म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग यांची असणार आहे.
या माहितीच्या आधारे ग्राम समिती सोबत शिवार फेरी करून त्यानुसार प्राथमिक गाव आराखडा तयार करावा लागेल.
प्राथमिक आराखड्यातील कामाच्या संबंधित यंत्रणेच्या सक्षम अधिकाऱ्याने तातडीने सर्वेक्षण करून तांत्रिक व आर्थिक मदत करावी.
आराखड्यातील जी कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत व आर्थिक नियमानुसार अनुज्ञेय आहेत अशाच कामांना अंतिम आराखड्यामध्ये समावेश करावा. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे.
गाव आराखडा तयार करतेवेळी गाव घटक ऐवजी पाणलोट क्षेत्र घटक विचारात घेऊन कामाचे योग्य नियोजन करावे.
गावाच्या पिण्याचे अंदाजपत्रकामध्ये गावातील पिण्याच्या पाण्याची गरज, शेतीसाठी लागणारे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार व्हावा. तसेच पाणलोट क्षेत्रामध्ये उपलब्ध पाणी वाहून जाणाऱ्या पाण्यामधून किती पाणी अडवले जाऊ शकते यासंदर्भात निश्चित ताळेबंद तयार करण्यात यावा.
- Jalyukt Shivar Yojana 2.0 कामाचा प्राधान्यक्रम
अपूर्ण व प्रगतीपथावरील कामे.
क्षमता पुनरस्थापित करण्याबाबतची दुरुस्ती नूतनीकरणाची कामे.
नाला खोलीकरणाची कामे.
लोकसभा आणि सार्वजनिक खाजगी भागीदारातील कामे.
- तांत्रिक व प्रशासकीय मान्यता
Jalyukt Shivar अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणांनी प्राधान्याने त्यांच्या नियमित आर्थिक निकषानुसार कामे करावीत. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता द्यावी.
जी कामे अभिसरणाद्वारे व इतर योजनेतून घेणे शक्य होणार नाही अशा कामांना जलयुक्त शिवार अभियान Jalyukt Shivar Abhiyan अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतुदीमधून जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देतील.
प्रशासकीय मान्यता आदेशामध्ये निधी नमूद करणे बंधनकारक आहे.
नियमित योजनांमधून संबंधित आर्थिक वर्षात निधी उपलब्ध नसल्याचे सक्षम स्तरावरून प्रमाणित केल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान मधून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.
- जल परिपूर्णता अहवाल तयार करणे
जलयुक्त शिवार Jalyukt Shivar गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जलपरी पूर्णता अहवाल तयार करण्यात यावा.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 ची थोडक्यात माहिती
Jalyukt Shivar Abhiyan 2.0 In Short
योजनेचे नाव | जलयुक्त शिवार अभियान 2.0 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
योजनेची सुरुवात | 13 डिसेंबर 2022 |
लाभार्थी | शेतकरी व नागरिक |
विभाग | जलसंधारण विभाग महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | पाणी आडून जमिनीत मुरवणे |
योजनेचा लाभ | शेतीला आणि गावाला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | http:mrsac.maharashtra.gov.in/jalyukt/ |
महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजना 2.0 ला मंजुरी
Jalyukt Shivar Yojana 2.0
Jalyukt Shivar Yojana जलयुक्त शिवार योजना 2016 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली होती. मात्र 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने ही योजना स्थगित करण्यात आली. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर 13 डिसेंबर 2022 रोजी जलयुक्त शिवार योजनेला पुन्हा मान्यता देण्यात आली, आणि तिला जलयुक्त शिवार योजना 2.0 असे नाव देण्यात आले. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
2023 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना 2.0 सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 22,500 गावातील लोकांची पाणी समस्येतून सुटका झाली असल्यासही त्यांनी सांगितले होते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत 2023- 24 या वर्षात 3,886 कोटी खर्च केले जाणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
जलयुक्त शिवार योजना 2.0 ची उद्दिष्टे
Jalyukt Shivar Yojana 2.0 Purpose
- Jalyukt Shivar या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल आणि त्यांचे उत्पादनात वाढ होईल.
- राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 गावांना पाणी देण्याचे काम करणार आहे यासाठी नाला, सिमेंट, काँक्रेट नाला, बांधकाम कालव्याची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.
- जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे.
- जलयुक्त शिवार Jalyukt Shivar म्हणजेच गावातील शिवार जलयुक्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची ठरत आहे.
- जलसंधारण आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देऊन त्यांचे शिवार जलयुक्त करणे हा योजनेचा उद्देश आह.
- राज्यातील ज्या भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे अशा गावांची ह्या योजनेत प्रथम निवड करण्यात आली आहे.
- गावाच्या शिवारात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार.
- राज्यातील पाच भंडारे विभागाकडे लक्ष देऊन पाण्याचा वापर सुलभ करणे आणि पाण्याचे संवर्धन करणे करण्यात येणार आहे.
- जलयुक्त शिवार योजना Jalyukt Shivar Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यात येणार आहे.
- जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी साठे या साठी नवीन कामे करण्यात येणार आहेत.
- गावातील बंद पडलेले बंधारे, तलाव, सिमेंट बंधारे दुरुस्त करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवली जाणार आहे.
- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत Jalyukt Shivar Abhiyan जिल्हा, तालुका निहाय कामाची माहिती गोळा केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 75 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेला मोठा वेग येणार आहे आणि राज्यभरात जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात कामे होणार आहेत याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
- महाराष्ट्र डी टी ई पोर्टल नोंदणी.
जलयुक्त शिवार योजना 2. 0 अंतर्गत करावयाच्या कामाची यादी
Jalyukt Shivar Yojana 2.0 List
- या योजनेअंतर्गत शेत, तलाव खोल आणि रुंद करणे.
- शेत तलावाची खोलीकरण आणि रुंदी वाढल्यामुळे पाणी साठवणूक क्षमता ही वाढेल.
- या योजनेअंतर्गत कालवा धरण याची दुरुस्ती करण्यात येणार.
- जलयुक्त शिवार अभियानातून कोरडवाहू भागातील भूजल पातळीत वाढ होईल.
- जलयुक्त शिवाराची कामे झाल्यामुळे पावसाची पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवण करण्यात येईल.
- राज्यभरात बंद पडलेल्या सर्व बंदराचे सिमेंट काँक्रिटीकरण करून त्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येतून मुक्त करणे हा जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे शेतीला सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होईल.
- जलयुक्त शिवार योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना 2.0 यशस्वीपणे राबवण्यासाठी सरकारने सर्व ग्राम गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करून या योजनेची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
- जलयुक्त शिवार योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जाहिराती दिल्या जात आहेत.
- या योजनेची पुस्तिका व टेम्पलेट राज्य सरकारकडून गावांमध्ये वितरित केले जाणार आहेत त्यामुळे लोकांना या योजनेची माहिती मिळेल आणि या योजनेचा त्यांच्या गावाला लाभ होईल.
- शाळेतील मुलांना जलयुक्त शिवार योजनेची माहिती व्हावी यासाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून त्यांनाही या योजनेची माहिती देण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेची वैशिष्ट्ये
Jalyukt Shivar Yojana 2.0 Features
- राज्यातील गावे जलयुक्त करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे.
- Jalyukt Shivar या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल.
- जलयुक्त शिवार योजना Jalyukt Shivar Yojana अंतर्गत करण्यात आलेल्या कामामुळे पावसाचे पाणी साठवण्याची मोठी क्षमता निर्माण होईल त्यामुळे भूजल पातळीतही वाढ होईल.
- तलावाची दुरुस्ती आणि नूतनीकरण केल्यामुळे त्या गावात पाणी साठवता येईल.
- या योजनेच्या माध्यमातून साखळी सिमेंट पूलांचे रुंदीकरण खोलीकरण केले जाते.
- जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नवीन बंधारे बांधण्यात येणार असल्यामुळे या योजनेअंतर्गत अनेकांना रोजगारही मिळेल.
जलयुक्त शिवार योजनेत प्रथम या गावांना प्राधान्य
- जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षात ज्या गावांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत त्या गावाची या योजनेसाठी प्रथम निवड केली जाणार आहेत.
- ज्या गावांनी गेल्या पाच वर्षांमध्ये एका वर्षी दुष्काळाचा सामना केला आहे अशा गावांना ही प्राधान्य दिले जाणार आहे.
- याबरोबरच ज्या गावांना दुष्काळाचा सर्वाधिक धोका आहे अशा गावाची या योजनेसाठी निवड केली जाणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेची पात्रता
Jalyukt Shivar Yojana 2.0 Eligibility
- जलयुक्त शिवार योजनेचा Jalyukt Shivar Yojana लाभ राज्यातील दुष्काळी भागातील गावांना होणार आहे.
- जलयुक्त शिवार योजना Jalyukt Shivar Yojana 2.0 अंतर्गत केवळ शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आपल्या गावात जलयुक्त शिवार योजनेची कामे सरकारच्या माध्यमातून करून घ्यावीत जेणेकरून त्या गावातील पाण्याची समस्या सुटेल.
जलयुक्त शिवार योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Jalyukt Shivar Yojana Documents
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
जलयुक्त शिवार योजनेची अर्ज प्रक्रिया
Jalyukt Shivar Yojana 2.0 Online Apply
जलयुक्त शिवार योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. परंतु सध्या सरकारने या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र तुम्ही सरकारच्या mrsac.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवु शकता.
FAQ;s
प्रश्न: जलयुक्त शिवार Jalyukt Shivarयोजना म्हणजे काय?
उत्तर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही योजना महत्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत राज्यातील दुष्काळी भागातील गावांमध्ये जलयुक्त च्या माध्यमातून पाणी पोहोचवणे यासाठी शेततळे खोल करणे रुंद करणे पाणी साठवण्यासाठी गावाबाहेर बंधारे बांधणे यातून गावाचे शिवार जलयुक्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रश्न: जलयुक्त शिवार Jalyukt Shivarयोजनेचे फायदे काय
उत्तर: राज्यातील दुष्काळी भागात पाणी व्यवस्थापनाची कामे करून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी साठवणीसाठी बांधण्यात आलेले बंधारे काँक्रीटच्या साह्याने मजबूत करण्यात येणार आहेत. यासोबत शेततळ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.
प्रश्न: जलयुक्त शिवार योजना 2.0 Jalyukt Shivar Yojana 2.0 कोणी सुरू केली?
उत्तर: जलयुक्त शिवार ही योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्वकांक्षी योजना आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली होती. आता 13 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे आणि या योजनेला जलयुक्त शिवार योजना 2.0 असे नाव दिले आहे.
प्रश्न: जलयुक्त शिवार Jalyukt Shivarयोजनेचा दरवर्षी किती गावांना मिळणारा लाभ?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील 5 हजार गावांना लाभ दिला जाणार आहे.
प्रश्न: जलयुक्त शिवार Jalyukt Shivarयोजनेसाठी कोणाला पात्र मानले जाईल?उत्तर: जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्यातील कायमस्वरूपी शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी पात्र मानले जाईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA