Kanya Sumangala Yojana In Marathi : या सरकारी योजनेतून मुलींना मिळतात 25000 रुपये

Kanya Sumangala Yojana 2025 In Marathi : काय आहे कन्या सुमंगला योजना

Kanya Sumangala Yojana In Marathi : सरकार मुलींच्या भविष्यासाठी सतत प्रयत्नशील असते. केंद्र सरकारने मुलींसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत आणि नवीन योजना देखील अजून राबवत आहे.

Kanya Sumangala Yojana मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी सरकार नवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. मुलींना उच्च शिक्षण मिळावे, मुली स्वतःच्या पायावर उभे राहाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असते.

Kanya Sumangala Yojana उत्तर प्रदेश सरकारने मुलींसाठी खास कन्या सुमंगला योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना 25000 रुपये मिळतात. यातून मुली त्यांचे उत्तम दर्जाचे शिक्षण पूर्ण करू शकतात. जर त्यांनी उत्तम दर्जाचे शिक्षण घेतले तर त्यांना नोकरी चांगली मिळणार, नोकरी चांगली मिळाली तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहणार या उद्देशाने कन्या सुमंगला योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Kanya Sumangala Yojana या योजनेत मुलींना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेत 1 एप्रिल 2019 नंतर जन्मलेल्या मुलींना मदत केली जाते. ती कशी ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहू.

पहिला हप्ता :- मुलीचा जन्म झाल्यानंतर एक रकमी 5000 रुपये दिले जातात. जन्म एप्रिल 2019 किंवा त्यानंतर झालेला असावा.

दुसरा हप्ता :- ज्या मुलीचे 1 वर्षांमधील टीका करण झाले आहे डोस झाले आहेत त्यांना 2000 रुपये देण्यात येतील त्यांचा जन्म एक एप्रिल 2018 च्या पूर्वी झालेला असावा.

तिसरा हप्ता :- चालू शैक्षणिक सत्रा दरम्यान पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलीला 3000 रुपये एक रक्कम दिले जातात.

चौथा हप्ता :- चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सहावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलीला 3000 रुपये एक रक्कम दिले जातात.

पाचवा हप्ता :- चालू शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या मुलींनी नववी मध्ये प्रवेश घेतला आहे अशा मुलींना 9000 रुपये एक रकमी दिले जातात.

सहावा हप्ता :- यामध्ये अशा मुलींना लाभ दिला जातो ज्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चालू शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदवी किंवा त्यापेक्षा कमी 2 वर्षाचा डिप्लोमा मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना 7000 रुपये एक रक्कम दिले जातात.

अर्जासाठी लागणारे कागदपत्रे

Kanya Sumangala Yojana Documents

  • आई-वडिलांचे आणि मुलीचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • बँक अकाउंट माहिती
  • रेशन कार्ड
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • मुलीला दत्तक घेतले असल्यास प्रमाणपत्र
  • मुलगी किंवा आई-वडिलांचा पासपोर्ट फोटो
  • आई वडील नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र तसेच जन्म प्रमाणपत्र

कन्या सुमंगला योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Kanya Sumangala Yojana Online Apply

  • सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा अधिकृत वेबसाईटला mksy.up.gov.in  भेट द्यावी लागेल.
  • तिथे गेल्यानंतर सिटीझन सर्विस पोर्टल मध्ये अप्लाय हेअर या बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यावर तुम्ही आपला पासवर्ड आणि लॉगिन आयडी टाकून साइन इन करू शकता.
  • नवीन अर्ज करणाऱ्यांनी आय ॲग्री यावर क्लिक करावे त्यानंतर साइन इन होईल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल तो अर्ज भरा आणि खात्री करण्यासाठी सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • ओटीपी मिळाल्यानंतर तो सत्यापन करा.
  • पासवर्ड आणि आयडी टाकून वेबसाईटवर लॉगिन करा.
  • त्यानंतर सर्व कागदपत्रे, अर्ज सबमिट यावर क्लिक करून सबमिट करा.

असा सोप्या पद्धतीने तुम्ही यशस्वीपणे सुमंगला योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.