Kisan Credit Card Scheme 2025 in marathi : 5 लाखाच्या कर्जावर फक्त 4 % व्याजदर

Kisan Credit Card Scheme 2025 in marathi : काय आहे सरकारची शेतकऱ्यांसाठी ची योजना

Kisan Credit Card Scheme 2025 in marathi : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजनाची अंमलबजावणी करत असते. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक मदत होईल. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारने सुरू आहे केली आहे.

Kisan Credit Card या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याज दराने कर्ज मिळते. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील या योजनेचा होत आहे. शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना सरकारने राबवली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना.

Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्डमध्ये शेतकऱ्यांना खूप कमी व्याजदरात कर्ज मिळते. शेतीसाठी आणि शेती संबंधित कामांसाठी लगेच कर्ज देणे हा किसान क्रेडिट योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे शेतकरी कापणीनंतरचा खर्च, घरगुती गरजा, पशुपालन आणि शेतीच्या कामांसाठी कर्ज घेऊ शकतो, या योजनेत सरकार 2 टक्के अनुदान देते.

Kisan Credit Card Scheme वेळेवर पैसे भरण्यासाठी 3 टक्के बोनस देखील देते जेणेकरून शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याजदरावर कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्डवरील हे कर्ज सर्वात स्वस्त कृषी कर्ज आहे. नक्की किसान क्रेडिट कार्ड योजना आहे तरी काय? हे आपण आज सविस्तर या लेखाच्या माध्यमातून पाहू..

त्याचबरोबर या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते याची देखील माहिती आज आपण पाहणार आहोत..

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत शेती आणि इतर गरजू शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

याद्वारे शेतीची बी-बियाणे, खते आणि उपकरणे, शेतकरी खरेदी करून शकतात. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर खूप कमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होतो. हे कार्ड डेबिट कार्ड सारखे काम करते. यामुळे तुम्हाला एटीएम मधून पैसे काढता येतात.

किती मिळते कर्ज?

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत Kisan Credit Card Scheme शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेत कर्ज किती द्यायचे हे वित्त पुरवठ्याचे प्रमाण, जमीन लागवड खर्च आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून असते.

यावर्षीच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कर्जाच्या कमाल मर्यादा वाढवून 3 लाखांवरून 5 लाखापर्यंत केली आहे. हे दोन लाखांचे कर्ज तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळते.