Kokan Ganpati Special ST Bus 2025 : एसटीने घेतला मोठा निर्णय
Kokan Ganpati ST Bus Service गणपतीच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळ यावर्षी गणपती उत्सवासाठी 5 हजार पेक्षा अधिक बस सोडणार आहे.
23 ऑगस्ट ते सात सप्टेंबर या काळात एसटी महामंडळाकडून जादा बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर 22 जुलैपासून गट आरक्षणाला देखील सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील तिकीट दरात मोठी सवलत आता मिळणार आहे.
Kokan Ganpati ST Bus Service एसटी बाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. गणेशोत्सव कोकणातील लोकांचा महत्त्वाचा सण मांडला जातो.
Kokan Ganpati Special ST Bus गणपती बाप्पा कोकणातील चाकरमानी आणि एसटी बस यांच्यात एक वेगळेच नात आहे. यावर्षी देखील गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी महामंडळ दरवर्षीपेक्षा जादा बस सोडणार आहे. यावर्षी 5000 जादा गाड्या कोकणात जाणार आहेत, असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.
Kokan Ganpati Special ST Bus बस मधील सीटच आरक्षण हे npublic.msrtcors.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
बस स्थानकात किंवा एमएसआरटीसी बस रिझर्वेशन या ॲपवर आरक्षण करण्याची सुविधा आहे.
एसटी महामंडळाने आषाढी एकादशीला 5 हजार दोनशेहून अधिक एसटी बस सोडल्या होत्या. दरम्यान एसटी महामंडळाच्या नियमानुसार जेष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत आहे आणि महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून 23 ऑगस्टपासून जादा बस सोडण्यात येणार असून मागच्या वर्षी 4 हजार तीनशे बस सोडल्या होत्या.
गणेशोत्सवा दरम्यान एसटी बसची वाहतूक सुरळीत सोयीस्कर होण्यासाठी बस स्थानक आणि बस थांबल्यावर देखील एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहे.