krishi samruddhi yojana 2025 in marathi : कृषी समृद्धी योजनेसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक

krishi samruddhi yojana : पोकराच्या धरतीवर आता राज्यात कृषी समृद्धी योजना

krishi samruddhi yojana in marathi : सरकारने कृषी समृद्धी योजना देशभरात सुरू केली आहे. राज्यात कृषी क्षेत्राचा पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी दरवर्षी 5000 कोटी रुपये या योजनेअंतर्गत खर्च केले जाणार आहेत.

krishi samruddhi yojana भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कृषी समृद्धी योजनेची कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

krishi samruddhi yojana ही योजना पोकरा या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे 5000 कोटी रुपयांची बचत सरकारला होणार आहे. ही रक्कम कृषी पायाभूत विकासासाठी खर्च करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात कृषी समृद्धी योजनेचे नानाजी देशमुख कृषी संजीवनी pocra या योजनेच्या धर्तीवर योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्त्वावर मंजुरी दिली जाणार आहे. एका जिल्ह्यात जास्त निधी खर्च होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा न्याय विविध घटकांवर निधीची मदत निधीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेत मोठी गुंतवणूक केली जाणार असल्यामुळे दरवर्षी त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात येणार आहे. ही संस्था दरवर्षी संशोधन आणि माहिती संकलनाचे काम करणार आहे.

2 हजार कोटी रुपयांचा खर्च

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरण करताना हवामान अनुकूल, शाश्वत आणि कीफायतशीर शेतीला प्रोत्साहन देत शेती उत्पन्नात वाढ करून शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी आणण्याचा प्रमुख मुख्य उद्देशाने कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात येत आहे.

krishi samruddhi yojana कृषी समृद्धी योजनेसाठी पुढील 5 वर्षांमध्ये दरवर्षी 5000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. म्हणजेच एकूण 25000 कोटी रुपयांचा खर्च कृषी समृद्धी योजनेत केला जाणार आहे. भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, पायाभूत सुविधा व शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

काय आहे पोखरा योजना

ही योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक लागवड आणि हवामान बदल या अनुषंगाने शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यात मदत करेल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी pocra योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पिकाची लागवड करता यावी आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या लागवडीवर भर देण्यात यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5142 खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावणे तसेच सामाजिक व आर्थिक उन्नती वाढवणे हा आहे.

NDKSY या योजनेतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दुष्काळ भागातील मातीचे परीक्षण करण्यात येईल आणि त्यानंतर हे परीक्षण करताना त्यामध्ये काही कमतरता दिसून आली तर ती भरून काढण्यात येईल आणि ती जमीन पीक लागवडी साठी योग्य करण्यात येईल. तसेच जी जमीन लागवडीसाठी योग्य नाही तेथे शेतीपूरक उद्योग व्यवसाय सुरू केले जातील.