Labour Card Renewal Process In Marathi : श्रमिक कार्ड घरबसल्या करा रिन्यू

Labour Card Renewal Process 2026 In Marathi : श्रमिक कार्ड रिन्यू करणे गरजेचे

Labour Card Renewal Process In Marathi : नमस्कार वाचकहो, तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला सरकारकडून 5000 रुपये किंवा मुलांच्या शिष्यवृत्ती किंवा किट मिळणे बंद झाले आहे का? असे असेल तर तुम्ही तुमचे श्रमिक कार्ड रिन्यू केलेले नाही.

Labour Card Renewal Process 2026 In Marathi : आज आपण या लेखाच्या माध्यमातून श्रमिक कार्ड घरबसल्या रिन्यू कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर श्रमिक कार्ड रिन्यू करणे गरजेचे आहे का? तेही आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

प्रत्येकाचे स्वप्न असते घर बांधायचे पण घर बांधण्यासाठी बांधकाम कामगार असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय तुम्ही घर बांधू शकत नाही. बांधकाम कामगार करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता ते त्यांचे काम अगदी अचूकपणे करतात.

बांधकाम क्षेत्रातील कामगार कमी पगारात अधिक काम करतात. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

काम करत असताना काही कामगारांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी जाण्याने कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न पडतो. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने 1 मे 2011 रोजी त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केली.

आज आपण या लेखात श्रमिक कार्ड युनिव्हर्सिटी काय आहे याची माहिती पाहणार आहोत. 2026 मध्ये हे कार्ड लिंक कसे करायचे त्याचे नवीन नियम काय आहेत हे पाहणार आहोत. तुम्हाला आता स्टेटस घरबसल्या कसे तपासावे हे देखील पाहणार आहोत.

श्रमिक कार्ड रिन्यू करणे का आहे महत्त्वाचे

Labour Card Renewal Process In Marathi

सर्वप्रथम सांगायचे झाले तर श्रमिक कार्ड आणि बांधकाम कामगार म्हणजेच लेबर कार्ड यामध्ये फरक आहे. ई-श्रम कार्ड हे केंद्र सरकारचे एक कार्ड आहे. याला रिन्यूअल ची गरज नसते. या ई -श्रम कार्ड ला फक्त अपडेट करावे लागते. परंतु महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स Maharashtra Building and Other Construction Workers (MBOCW) Card म्हणजेच लेबर कार्ड हे दरवर्षी किंवा दर 3 वर्षांनी रिन्यू करणे गरजेचे असते. यामध्ये जर तुम्ही हे कार्ड ऍक्टिव्ह केले नाही तर तुम्हाला अनेक फायद्यांपासून वंचित राहावं लागतं जसे की, मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य म्हणजेच स्कॉलरशिप, घरकुल अनुदान योजना, लग्नासाठी 51 हजार रुपये पर्यंतची मदत आणि सुरक्षा कीट म्हणजेच संसार उपयोगी वस्तू त्यासाठी तुम्हाला तुमचे लेबर कार्ड रिन्यू करणे अत्यंत गरजेचे आहे.

रिन्यूअल साठी लागणारे कागदपत्रे

Labour Card Renewal Docements

तुम्हाला तुमची कार ट्रेनिंग करायचे असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

जुने लेबर कार्ड

90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र

आधार कार्ड

बँक पासबुक

स्वयंघोषणापत्र

ऑनलाइन पद्धतीने रिन्यूअल कसे करणार

Labour Card Renewal Process

आता तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईल वरून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही श्रमिक कार्ड रिन्यू करू शकता.

त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या google वर mahabocw.in या वेबसाईटवर जावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन किंवा रिन्यूअल असे पर्याय दिसतील त्यातील तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिन्यूअल या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल तो टाकावा लागेल.

त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकावा लागेल.

त्यानंतर फॉर्म उघडला जाईल त्यात तुमची जुनी माहिती दिसेल.

तिथे तुम्हाला फक्त 90 saheb certificate अपडेट कराय लागेल.

कंत्राट दाराची माहिती भरावी लागेल आणि प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला सरकार फिस साधारण 12 ते 25 रुपये आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ती जपून ठेवावी लागेल तुमचे रिन्यूअल रिक्वेस्ट सबमिट झाली आहे.

तुमचे रिन्यूअल कार्ड झाले की नाही असे तपासा

तुम्हाला mahabocw.in या संकेतस्थळावर जावे लागेल.

त्यानंतर रजिस्ट्रेशन स्टेटस या लिंक वर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाका.

जर तुमचे स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल तर तुमचे कार्ड यशस्वीरीत्या रीन्यू झाले आहे.

जर पेंडिंग असे स्टेटस तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला 7 ते 15 दिवसाची वाट पहावी लागेल.