Ladki Bahin Yojana 2024 In Marathi : बहिणींना कधी मिळणार सहावा हप्ता
Ladki Bahin Yojana 2024 In Marathi : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता संपली, नवीन सरकार निवडून आले, मंत्र्यांचा शपथविधी पण झाला. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम मात्र अजून मिळालेली नाही. याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये होणार का? याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. काही खर्च हे आपल्याचा करावेच लागतात, ते टाळता येणे शक्य नाही. लाडकी बहिण योजना पुढे चालू राहण्यासाठी तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नागपूर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दिली आहे.
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक पार पडल्यानंतरही निकाल लागल्यानंतर 20 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष नागपूरच्या अधिवेशनाकडे लागले आहे. राज्यभरातील 2 कोटी 50 लाख लाभार्थी महिला हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. खरच नागपूरच्या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी रकमेची तरतूद होणार का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिलांना मिळणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. याची उत्तरे आपल्याला नागपूरच्या अधिवेशनात म्हणजेच हिवाळी अधिवेशनात मिळतील, अशी आशा आहे.
Ladki Bahin Yojana राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 15 ऑक्टोंबरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम राज्य सरकारने जमा केली होती. मात्र त्यानंतर निवडणूक झाली, अतिरसहिता संपून 20 दिवस उलटले. मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही सहावा हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही.
Ladki Bahin Yojana त्यामुळे राज्यातील 2 कोटी 50 लाख लाभार्थी महिलांकडून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा केली जात आहे. राज्य सरकार 1500 रुपये जमा करणार ती आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ladki Bahin Yojana 2024 राज्यात स्थापन झालेले नवीन सरकारच्या मंत्र्यांचा रविवारी शपथविधी झाला. सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यामध्ये विविध योजनाची घोषणाही होईल. मात्र लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि किती होणार याची प्रतीक्षा आहे.
Ladki Bahin Yojana 2024 नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. मात्र ती रक्कम 1500 रुपये असेल की 2100 हे अजून निश्चित झालेले नाही. यावर सरकार काय निर्णय घेते याकडे राज्यातील 2 कोटी 50 लाख महिलांचे लक्ष लागले आहे.
नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार का?
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे 14 ऑक्टोंबर पासून लाडक्या बहिणीसाठीची अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली होती. मात्र आता आचारसंहिता संपली आहे. नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करणार की नाही, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातला निर्णय विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना लाभ हे सरकार देणार का? हे या अधिवेशनात कळेल.