ladki bahin yojana udpate : लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता कधी?

ladki bahin yojana august installment : 1500 रुपये मिळणार की लाभ होणार बंद? मोठी अपडेट

ladki bahin yojana udpate : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता कधी जमा होणार? कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार आणि कोणाचा लाभ बंद होऊ शकतो? ई-केवायसी, पात्रता, उत्पन्न मर्यादा आणि आधार-बँक लिंकबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. ऑगस्टचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाचा थांबणार याचा संभ्रम संपला आहे. ई-केवायसी, पात्रता, उत्पन्न मर्यादा आणि आधार- बँकशी लिंक आदी प्रक्रिया अपडेट करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात राज्यातील महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक महिन्याला कोणाच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार आणि कोणत्या महिला या योजनेतून वगळल्या जाणार? त्या संदर्भात प्रशासनाकडून स्पष्टता समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील काही चुका, नियमांचे उल्लंघन किंवा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे. यामुळे हजारो महिलांचे हप्ता थांबणार आहे. केवायसी नंतर अपात्र ठरलेल्या 80 लाखापेक्षा अधिक महिलांचा दीड हजार रुपयांचा लाभ सरकारकडून बंद करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

ladki bahin yojana udpate : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना चालवली जात आहे. सरकार डीबीटीच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ट्रान्सफर करते. मात्र आत्ता झालेल्या केवायसी आणि पात्रता पडताळणी नंतर अनेक लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे. पुढील आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मात्र केवळ पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दीड हजार जमा होतील.

या महिलांना मिळणार ऑगस्ट- सप्टेंबरचा हप्ता?

ladki bahin yojana udpate : आता राज्य सरकारने घातलेल्या अटी- शर्ती पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींच्याच खात्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. यामध्ये लाडकी बहीण महाराष्ट्राची रहिवासी असावी, तिचं वय 21 ते 65 च्या दरम्यान असावे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलेलाही लाभ मिळू शकतो. मात्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीला दिला जाणार आहे. जे कुटुंब आयटीआर भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ई-केवायसी केली म्हणजे हप्ता मिळेलच असे नाही?

राज्य सरकारने ठरवून दिलेली ई केवायसी प्रक्रिया केली म्हणजे आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळेलच असे नाही. कारण ई केवायसी सोबतच इतर पात्रता राज्य सरकार करून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे चुकीची माहिती किंवा अपूर्ण पात्रता आढळल्यास लाभार्थी महिलांच्या खात्या मधून तुमचे नाव वगळले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही हप्ता मिळू शकत नाही.

यांचा हप्ता होणारा बंद

राज्य सरकारने ठरवून दिलेली वयोमर्यादा पूर्ण न करणाऱ्या महिला, 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला, महाराष्ट्राच्या पात्र रहिवासी नसणाऱ्या किंवा पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या महिला या लाभापासून वंचित राहू शकतात. याबरोबरच ई-केवायसी आवश्यक अपडेट पूर्ण नसतील आणि आधार बँक खात्याच्या माहितीत चूक असेल तरीही हफ्ता अडकू शकतो.

16 सप्टेंबरला जमा होणार हप्ता?

ladki bahin yojana udpate : गणेश उत्सवा दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तशी यावर चर्चा सुरू असून 16 सप्टेंबर नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे 16 सप्टेंबर किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो.