Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्यापासून वंचित
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत होती. मात्र केवायसी करूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेले नाही.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लाडकी बहीण केवायसीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. मात्र केवायसी केल्यानंतरही आमच्या खात्यात पैसे आले नाहीत अशी अनेक महिलांची तक्रार आहे.
Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगर मधील एक महिला म्हणाली की, मी केवायसी केली आहे, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची चार चाकी गाडी नाही, तरी पण मला लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. मला दोन महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत. अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले पण मला नाही. सरकारने असं का केलं? असा सवाल एका लाडक्या बहिणीने केला आहे. हा प्रश्न त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणीने केवायसी पूर्ण केली त्यांना वाटले आता केवायसी पूर्ण केल्यानंतर तरी आपल्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे येतील. मात्र कसले काय? गेल्या दोन महिन्यापासून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ताच त्यांच्या खात्यात आलेला नाही. त्यामुळे एका बाजूला महिला नाराज झाल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला संतप्तही झाल्या आहेत.
यावर महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे म्हणाल्या की आम्ही पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे वर्ग केलेत. महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत. परंतु अग्रीम रक्कम जमा करण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केल्याने सरकारने केवळ डिसेंबर महिन्याचा निधी वितरित केला आहे.
जानेवारीचा हप्ता कधी?
Ladki Bahin Yojana : मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता. त्यावेळी ही विरोधकांनी टीका केली होती. यावेळीही महानगरपालिका निवडणूक पूर्वी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार होता. मात्र विरोधकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला.
काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे आता सरकारला फक्त नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा आत्ताच जमा करता येणार आहे. त्यामुळे जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाहीत. मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा करण्यात येणार यासंदर्भात सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.