Ladki Bahin Yojana e-KYC Information In Marathi : आदिती तटकरे यांनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana e-KYC In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्यासाठी तुमच्याकडे दोन महिने आहेत. दोन महिन्याच्या आत तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जमा केला जाणार नाही.
Ladki Bahin Yojana e-KYC In Marathi तर आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आज आपण या लेखाच्या माध्यमातून E-KYC कशी करायची तेही अगदी सोप्या पद्धतीने हे पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi
Ladki Bahin Yojana e-KYC Process सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर e-KYC बॅनर हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतरही केवायसी फॉर्म उघडेल.
त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि capcha कोड नमूद करावा लागेल.
त्यानंतर send OTP या बटनवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
तो ओटीपी तिथे टाकून सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही हे समजेल. त्यामध्ये जर आधीच तुमची केवायसी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला ‘ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे’ असा मेसेज येईल.
जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला तुम्हाला जाता येईल
यानंतर लाभार्थ्यांनी पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक तसेच कॅपच्या कोड नंबर करावा
त्यानंतर सेंड ओटीपी यावर क्लिक करावे
ओटीपी संबंधित मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाकून सबमिट या बटनवर क्लिक करावे
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणेच कराव्या लागतील.
1 माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून शासकीय /विभाग /उपक्रम/ मंडळ /भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2 माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्स वर क्लिक करावे आणि सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. शेवटी ‘तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’. असा संदेश तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.