Ladki Bahin Yojana E-KYC : बाकीच्या महिलांसाठी मुदतवाढ होणार का ?
Ladki Bahin Yojana E-KYC In Marathi : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीला केवळ 2 दिवस बाकी आहेत. दोन महिन्याचे दोन दिवस कधी झाले हे महिलांना कळालेच नाही. आतापर्यंत अनेक महिलांची केवायसी झाली आहे. परंतु लाखो महिला अशा आहेत ज्यांनी केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण केलेली नाही.
Ladki Bahin Yojana E-KYC अशा लाभार्थी महिलांसाठी केवळ 2 दिवस त्यांच्या हातात राहिले आहेत. 2 दिवसात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ लाभार्थी महिलेला मिळतो. त्याची e-KYC करण्यासाठी महिलांना 2 महिने कालावधी दिलेला होता.
Ladki Bahin Yojana आता दोन महिने ची समुदत संपत आली आहे. केवळ दोनच दिवस या मदतीसाठी आहेत. कारण 18 नोव्हेंबर ही e-KYC करण्याची अंतिम तारीख आहे. परंतु आता या तारखे मध्ये काही बदल होणार का? कारण की अजूनही लाखो महिला अशा आहेत ज्यांनी केवायसी पूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
दररोज 4 ते 5 लाख महिला ई-केवायसी करतात अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आतापर्यंत साधारण 1 कोटी महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
Ladki Bahin E-KYC Website Changes त्याचबरोबर ज्या महिलांच्या वडिलांचे किंवा पतीचे निधन झाले आहे किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशा महिलांनी ही e-KYC प्रक्रिया कशी करायची यावर प्रश्न उभारला गेला होता. या प्रश्नावर तोडगा निघालेला आहे.
Ladki Bahin E-KYC Website Changes ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्या महिलांनी घटस्फोटीत कागदपत्रे अपलोड करणे आणि ज्या महिलांच्या वडील किंवा पतीचे निधन झाले आहे अशा महिलांना त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. हे बदल लवकरात लवकर वेबसाईट मध्ये केले जाणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. परंतु आता ई-केवायसी ची मुदत वाढ होणार का? हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी सरकार घेणार आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली. आता सध्या तरी प्रत्येक महिलांच लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC च्या मुदतवाढीकडे लागले आहे.