Ladki Bahin Yojana e-kyc Increase Date In Marathi : आता 31 डिसेंबर पर्यंत करा लाडकी बहीण योजनेची e-kyc

Ladki Bahin Yojana e-kyc Increase Date In Marathi : पती- वडील नसणाऱ्या महिला व घटस्फोटीत महिलांनाही करता येणारी केवायसी

Ladki Bahin Yojana e-kyc Increase Date In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची तारीख आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे. याबरोबरच राज्यातील ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील/ पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे आशा महिलांनी स्वतःची इकेवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांच्या अधिकृत प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाची आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी अशी माहिती अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आहे.

Ladki Bahin Yojana e-kyc महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात यशस्वी झाली आहे. मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र महिलांनी घेतल्याचे किंवा काही पुरुषांनी घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

Ladki Bahin Yojana e-kyc यासाठी यापूर्वी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करून राज्य सरकारने 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना आपली ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

Ladki Bahin Yojana e-kyc ई-केवायसीचा मुख्य उद्देश म्हणजे अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये. केवळ लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे.

Ladki Bahin Yojana e-kyc मागील दोन महिन्यांमध्ये राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यामुळे आमचे सरकार लाडक्या बहिणीची केवायसीची तारीख 31 डिसेंबर 2025 करत आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana यापूर्वी राज्यातील पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण करावी असे आव्हान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून केले आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana या निर्णयामुळे राज्यातील ज्या पात्र लाभार्थी महिलांची ekyc प्रक्रिया झालेली नव्हती त्या महिला आता 31 डिसेंबर पर्यंत इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. राज्यातील कुठलीही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक महिलांनी आपली केवायसी करावी असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

वडील व पती नसणाऱ्या महिलांनी अशी करावी केवायसी

Ladki Bahin Yojana e-kyc Increase Date In Marathi

Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची तारीख वाढवल्याबरोबरच अदिती तडकरे यांनी राज्यातील अशा महिला ज्यांना त्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोटीत झाले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटीत प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी ई-केवायसी करावी. यामुळे त्यांचा लाभ सुरू राहील. या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थ्याची सत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे.

ज्या भगिनींनी अध्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकरात पूर्ण करावी असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.