Ladki Bahin Yojana February Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा

Ladki Bahin Yojana February Installment In Marathi : 86 लाख महिलांना मिळाला नाही लाभ

Ladki Bahin Yojana February Installment : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. आता सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे.

त्याचबरोबर लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांना फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळालेले नाहीत. आता या महिलांना पुढे लाभ मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 86 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. लाडकी बहिणी योजनेची सुरुवात 2024 मध्ये झाली त्यावेळी 2.4 कोटी महिला लाभार्थी होत्या आता ही संख्या कमी होऊन 1.5 कोटी पर्यंत झाली आहे.

तब्बल 86 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना हप्ता मिळालेला नाही या महिलांना जानेवारी चा हप्ता देखील मिळालेला नव्हता.

Ladki Bahin Yojana Next Installment लाडकी बहीण योजनेचा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नसल्यामुळे याचे काय कारण आहे असे प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत.

निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना याआधीच योजनेतून वगळण्यात आलेले आहे. फक्त 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. चार चाकी वाहन असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

त्याचबरोबर सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसी न केलेल्या महिलांची देखील संख्या भरपूर आहे अशा महिलांचा देखील लाभ बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच केवायसी मध्ये चूक झालेल्या महिलांचा लाभ तात्पुरता थांबवला आहे. केवायसी ची दुरुस्ती केल्यानंतर महिलांना पुन्हा हा लाभ सुरू करण्यात येईल तोपर्यंत महिलांना लाभ मिळणार नाही.