Ladki Bahin Yojana July Month Installment Update : लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाचे गिफ्ट

Ladki Bahin Yojana July Month Installment Update In Marathi : खात्यात जमा होणार 3000 रुपये

Ladki Bahin Yojana July Month Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जुलै महिना संपला तरीही जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

Ladki Bahin Yojana July Month Installment Update मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये आणि जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये देण्यात आला होता. पण आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अशी लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लागली आहे. ती प्रतीक्षा आता संपली असून जुलै महिना चा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच जमा केला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै  2024 पासून सुरु केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती सरकारच्या निर्णयात देण्यात आली आहे. 

Ladki Bahin Yojana जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात.

महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मुहूर्त साधून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. ऑगस्ट महिन्यामध्ये बहिण भावांचा रक्षाबंधनाचा सण आहे आणि Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत भाऊ बहिणीला 2 महिन्याचे एकत्र गिफ्ट देणार आहे. म्हणजेच 2 महिन्याचा एकत्र हप्ता 3000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.

Ladki Bahin Yojana Next Installment In Marathi परंतु याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कदाचित रक्षाबंधनच्या दिवशी Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.