Ladki Bahin Yojana New Update : लाडकी बहीण योजना बंद पडणार का? बघा ही महत्त्वाची बातमी

Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहिणी बद्दल महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana New Update : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेचा जुलै महिन्यापासून महिलांना लाभ मिळत असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात ॲडव्हान्स मध्ये जमा करण्यात आले होते.

Ladki Bahin Yojana आचारसंहिता लागल्यामुळे अनेक जणांना हा प्रश्न पडला की आता लाडकी बहीण योजना बंद होणार का? या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे बंद होणार का? त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतीउत्तर दिले आहे. त्याचबरोबर विरोधकांकडून देखील या योजनेअंतर्गत टीका केल्या जात आहेत. लाडकी बहीण ही योजना म्हणजे निवडणुकीसाठीचा जुमला आहे असे विरोधकांकडून बोलले जात आहे. या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

Ladki Bahin Yojana New Update

काय म्हणाले मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडकी बहीण योजना विरोधकांना सलत आहे ही योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही असे म्हणाले. सरकारची कोणतीच योजना कधीही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे पडणार आहेत. या पैशांमध्ये वाढ होत जाणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

यापूर्वी देखील जळगावच्या मुक्ताईनगर मध्ये बोलताना Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदे बोलले होते त्यांनी हेच सांगितलं होतं की, ही योजना कधीही बंद पडणार नाही. या लाडक्या बहिणीचे पैसे वाढत जाणार. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर चा हप्ता मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता बहिणींना कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही. ही योजना कधीही बंद पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Mukhyamantri Ladki Bahin Yojana