Ladki Bahin Yojana November, December Installment : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर

Ladki Bahin Yojana KYC Extended : KYC ची मुदतवाढ मिळण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana KYC Extended : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिणी योजनेच्या KYC साठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत.

KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्याआधी केवायसी करणे आवश्यक आहे. आता केवळ 3 दिवस लाभार्थ्यांकडे उरले आहेत. त्यामुळे अजूनही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी केवायसी करणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana KYC Extended परंतु लाडकी बहिणी योजनेच्या KYC साठीची डेडलाईन वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी याबाबत अजून कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana November, December Installment सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही मुदत वाढवली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिना संपत आला तरी अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा असे दोन्हीही हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत.

त्यामुळे महिलांना चिंता लागली आहे की आता दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार होते तेही आले नाही तर तीन महिन्याचे पैसे जानेवारीला एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana : 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांति पूर्वी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर, जानेवारी चा हप्ता देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी चा हप्ता एकत्र येणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

Ladki Bahin Yojana दर महिन्याला सरकारने कोणते ना कोणते औचित साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. तसेच आता जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचे औचित साधून महिलांच्या खात्यात एकदम नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे पैसे जमा होतील का हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. यासाठी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.