Ladki Bahin Yojana PM Kisan Latest News In Marathi : लाडक्या बहिणींना 4500 तर शेतकऱ्यांना मिळणार 6000

Ladki Bahin Yojana PM Kisan Latest News Installment Date : या महिन्यात मिळणार बहिणींना आणि शेतकऱ्यांना लाभ

Ladki Bahin Yojana PM Kisan Latest News In Marathi : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत. याबाबतची नवीन बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना एकत्र 3 हप्त्यांचे पैसे मिळू शकतात, तर शेतकऱ्यांच्या खात्यात देखील 2 हप्ते एकत्रित जमा होतील असे सांगण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana Pending Installment Latest Update राज्यातील तब्बल सव्वा दोन कोटी महिलांना डिसेंबर पासूनचे हप्ते जमा झाले नाही, तर किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांनाही आठवा आणि नववा हप्ता मिळालेला नाही.

Ladki Bahin Yojana Pending Installment Latest Update लाडकी बहिणी योजना आणि सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारला 14 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे, पण याबाबत अर्थ खात्याकडून अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

PM Kisan Samman Nidhi 8th And 9th Installment Maharashtra शेतकऱ्यांना 6000 तर लाडक्या बहिणींना 4500 रुपये एकत्रित हप्ता मिळू शकेल. फेब्रुवारीच्या अखेरीस अथवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा हप्ता मिळेल. राज्यात सध्या सव्वा दोन कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात.

e-KYC द्वारे लाडक्या बहिणींची सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या दीड कोटी पर्यंत येऊ शकते असा अंदाज आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्याचे प्रत्येक महिन्याला 1635 कोटी रुपयांची बचत होतात म्हणजेच वर्षाला 19 हजार 620 कोटी रुपयांची राज्याची बचत होईल असा अंदाज आहे, तर दुसरीकडे फेब्रुवारीच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचा 22 वा हप्ता जमा होणार आहे, तर राज्य सरकारकडून आठवा आणि नववा हप्ता मिळेल.

काही दिवसांपूर्वी कीसान सन्मान निधीतील लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी झाली. आता राज्यातील 91 लाख 16 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा 22 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्यात शेतकऱ्यांना राज्य सरकारचे 2 हप्ते मिळतील असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एप्रिल पासून पात्र बहिणींनाच मिळणार लाभ

राज्यातील लाडकी बहीण योजनेची पडताळणी अखेरच्या टप्प्यात आहे. लडकी बहीण योजनेची e-KYC करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. पडताळणी नंतर 1 एप्रिल पासून पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांचा लाभ जमा होणार आहे.

1 जुलै 2024 मध्ये राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. जेव्हापासून ही योजना सुरू करण्यात आली तेव्हापासून ही अगदी चर्चेचा विषय बनली आहे. यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त अपात्र महिलांनीही अर्ज केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेणारे, चारचाकी वाहन असणारे, सरकारी नोकरीत कार्यरत असणारे असे निकषात न बसणारे अनेक अर्ज होते. या सर्वांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून फक्त पात्र महिलांच्या खात्यातच लाडकी बहिणी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.