Lakhpati Bitiya Yojana In Marathi : मुली बनणार लखपती

Lakhpati Bitiya Yojana 2026 In Marathi : लखपती बिटीया योजना, मुलीच्या खात्यात कसे येणार 1 लाख रुपये

Lakhpati Bitiya Yojana : लखपती बिटीया योजना दिल्ली सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. आता मुली शिक्षणाबरोबरच लखपती बनणार आहेत. मात्र या योजनेचा पैसा कधी आणि केव्हा मिळणार चला जाणून घेऊ.

Lakhpati Bitiya Yojana 2026 : दिल्लीमध्ये 19 फेब्रुवारीला एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली लखपती बिटीया योजना सुरू करत आहेत. या योजनेअंतर्गत दिल्लीतील मुलींना लखपती बनवले जाणार आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेवर सहमती झाली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून सरकार टप्प्याटप्प्याने पैसा जमा करणार आहे आणि 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीला 1 लाख रुपये मिळणार आहेत.

दरम्यान ही योजना पूर्वी चालू असलेल्या दिल्ली लाडली योजना चा विस्तार आहे. दिल्लीमध्ये भाजप सरकारने यापूर्वी चालू असलेल्या योजनेला अपडेट केले आहे. दिल्ली लाडली योजना 2008 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या योजनेचा लाभ समाजापर्यंत पोहोचत नव्हता. आता दीर्घकाळानंतर ही योजना अधिकाधिक मुलीपर्यंत पोहोचवण्याची तयारी दिल्ली सरकारकडून केली जात आहे. या योजनेवर 160 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मुली लखपती कशा बनणार?

What Is Lakhpati Bitiya Yojana

Delhi Government Scheme पूर्वी दिल्ली लाडली योजना अंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिचे 12 वी पर्यंतच्या शिक्षणापर्यंत सरकार विविध टप्प्यावर एकूण 35 हजार रुपये तिच्या खात्यात जमा करत होते. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा पैसा व्याजासह तिला मिळत असे, मात्र आता नवीन योजनेअंतर्गत एकूण 56 हजार रुपये ची रक्कम सरकार देणार आहे. त्यानंतर व्याज मिळवून ही रक्कम 1.20 लाख रुपये होणार आहे. ही रक्कम मुलीच्या खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. हा पैसा मुलीला ग्रॅज्युएशन किंवा 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहेत.

काय आहे लखपती बिटिया योजनेची पात्रता

Lakhpati Bitiya Yojana Eligibility

लाभार्थी मुलीचा दिल्लीमध्ये जन्म होणे आवश्यक आहे.
मुलीच्या कुटुंब 3 वर्ष पूर्वीपासून दिल्लीचे नागरिक असावे.
कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा अधिक नसावे.
एका कुटुंबातील केवळ 2 मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
जर एखाद्या मुलीने दिल्ली बाहेर ऍडमिशन केले आहे तिलाही या योजनेचा लाभ दिला जाईल.

किती टप्प्यात मिळेल पैसा

Lakhpati Bitiya Yojana In Marathi

मुलीच्या जन्माच्या वेळी 11000 रुपये
मुलीचा पहिली प्रवेश केला की 5000 रुपये
6 वी, 9वी, 10वी आणि बारावी प्रवेशाच्या वेळी 5000 – 5000 रुपये
पदवी किंवा डिप्लोमा ला प्रवेश घेतल्यास 20,000 रुपये
एकूण व्याजासहित 1 लाख रुपये

अर्ज प्रक्रिया

Lakhpati Bitiya Yojana Apply

सध्या लखपती बिटिया योजनेची घोषणा झाली आहे. मात्र सविस्तर गाईडलाईन्स नियम अटी जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र दिल्ली सरकार चा अन्य योजना आणि लाडली योजना अर्ज प्रक्रिया e-district portal द्वारे अर्ज करावा लागेल.
यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम दिल्लीतील पत्ता असलेले आधार कार्ड द्वारे इ डिस्ट्रिक्ट पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.