Lek Ladki Yojna 2024 लेक लाडकी योजना 2024:
Lek Ladki Yojna 2024 लेक लाडकी योजना 2024: महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2023-24 अर्थसंकल्पात लेक लाडकी योजणाची घोषणा करण्यात आली होती. या द्वारे मुलीच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत सरकार कडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलीचे वय आणि ती शिक्षण घेत असलेला वर्ग पाहून ही आर्थिक मदत केली जाते. काय आहे लेक लाडकी योजना ? कोणाला मिळतो या योजनेचा लाभ? काय आहे पात्रता आदींची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी या योजनेची घोषणा केली आहे. नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेक लाडकी योजेनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यातील पात्र मुलींना एक लाख एक हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला गेला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलींच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत पाच हप्त्यात ही रक्कम मुलीला दिली जाईल. मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आर्थिक मदत म्हणून सरकार कडून एकरकमी 75 हजार रुपये दिले जाणार आहेत.
राज्याचे अर्थमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती आणि मुलीच्या सक्षमीकरणासाठी यांच्या सरकारने ही योजना सुरू केल्याचे त्यांनी त्यावेळी बोलताना संगितले होते. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलींच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत पाच हप्त्यात ही रक्कम मुलीला दिली जाईल. मुलींना आर्थिक मदत राज्य सरकार कडून मिळाल्यानंतर मुलींना शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यातून समाजात मुलिंबाबत नकारात्मक विचारसरणी बदलेल.
- ठळक मुद्दे :-
- लेक लाडकी योजना म्हणजे काय ?
- लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती
- लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे
- कशी मिळते आर्थिक मदत?
- लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्ये
- लेक लाडकी योजनेसाठी आर्थिक मदत
- लेक लाडकी योजनेसाठी पात्रता
- लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्ती
- लेक लाडकी योजना 2024 : आवश्यक कागदपत्रे
- लेक लाडकी योजनेसाठी असा करा अर्ज
- FAQ’s
फ्री शिलाई मशीन योजनेच्या संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा.
https://yojanamazi.com/free-silai-machine-yojana-2024-in-marathi/#more-270
What is Lek Ladki Yojana लेक लाडकी योजना म्हणजे काय ?
महाराष्ट्र सरकारनी सुरू केलेल्या लेक लाडकी योजणेमुळे मुलींचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी मदत होणार आहे. या मुळे भ्रूणहत्यासारख्या घटनांना आळा बसेल. या योजनेदवारे मुलीला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून एकरकमी ७५००० रुपये दिले जातात.
लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी केला होता. मुलींना या योजनेअंतर्गत १,००,००० (एक लाख) रुपयाची रक्कम मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील गरीब मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी लेक लाडकी योजनेचा शुभारंभ केला होता. त्यावेळी मोदींनी काही लाभार्थीना पहिला हप्ता दिला होता. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना सक्षम करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील मुलींना १ लाख १ हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने ऑक्टोबर महिन्यात मुलींना मोठी भेट दिली होती लेक लाडकी योजनेच्या अमलबजावणीसाठी सरकारने तब्बल १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील मुलींना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती
Lek Ladki Yojana Maharashtra 2024
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
योजनेचा उद्देश | मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे |
योजनेची सुरुवात | 2023-24 |
कुठे सुरू झाली | महाराष्ट्र |
किती मिळणार रक्कम | एक लाख एक हजार 1,01,000 |
मुलीला कधी मिळणार रक्कम | मुलगी 18 वर्षाची झाल्यावर |
कोण आहेत लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब मुली |
Lek Ladki Yojana लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेचा Lek Ladki Yojna मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मदत करणे आणि मुलींच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे. यामुळे समाजात मुलींबाबत निर्माण झालेली नकारात्मक विचार सरणी बदलण्यास मोठी मदत होणार आहे. भ्रूणहत्या सारख्या घटना थांबवण्यासाठीही मदत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ५ हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाणार आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत सरकारच्या वतीने आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पात्र मुलीला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ७५००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे मुलीला उच्च शिक्षण घेत येईल आणि तिचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.
कशी मिळते आर्थिक मदत?
महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक (रेशन कार्ड) कुटुंबात मुलगी जन्मल्यास त्या मुलीला ५००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्या नंतर मुलगी शाळेत जायला लागेल तेंव्हा पहिला हप्ता ६००० रुपयाचा सरकारकडून दिला जातो. मुलीने इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर ६००० रुपयांची मदत दिली जाते. अकरावीत गेल्यानंतर मुलीला ८००० रुपये सरकारकडून मिळतात विशेष बाब म्हणजे मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी एकरकमी ७५००० रुपये सरकारकडून दिले जातात या मुळे तिला उच्च शिक्षण घेण्यास मदत होते. किंवा तिच्या लग्नासाठीही या रकमेचा वापर करता येतो. या योजनेमार्फत मुलींना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा सरकारचा उद्देश आहे.
लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्ये
- लेक लाडकी योजनेचा Lek Ladki Yojna गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ होणार आहे.
- मुलींना सरकारकडून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
- केशरी व पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावावर ५००० रुपयांची मदत दिली जाणार आहे.
- मुलीला इयत्ता १ ली मध्ये प्रवेश करताच ६००० रुपयाची मदत मिळेल.
- मुलगी ६ वी मध्ये गेल्यावर तिला ७००० रुपयाची मदत मिळेल.
- ११ वीत प्रवेश करताच मुलीला ८००० रुपये मिळतील.
- विशेष बाब म्हणजे मुलगी १८ वर्षाची झाल्यावर तिला एकरकमी ७५००० रुपये मदत सरकारकडून मिळेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- सरकारच्या या मदतीमुळे मुलीच्या शिक्षणासाठी पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयात होणे आवश्यक आहे.
- लेक लाडकी योजनेसाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करणे गरजेचे आहे.
- या योजणेमुळे भ्रूणहत्या कमी होण्यास मदत होईल.
- गरीब कुटुंबातील मुलीचे भविष्य उज्ज्वल होण्यास या योजनेची मदत होईल.
- या योजणेमुळे समाजात मुलीबाबत असलेली नकारात्मक विचारसरणी कमी होण्यास मदत होईल.
- या योजणेमुळे मुलीला ओझे मानले जाणार नाही. आणि मुलाप्रमाणे तिलाही उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल.
विश्वकर्मा योजनेसाठी इथून करा अप्लाय
लेक लाडकी योजनेसाठी आर्थिक मदत
मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून ५००० रुपयांची मदत.
मुलीने इयत्ता पाहिलीत प्रवेश करताच ६००० हजार रुपयांची मदत.
मुलगी इयत्ता सहावीत प्रवेश करताच ७००० हजार रुपयांची मदत
मुलीने अकरावीत प्रवेश घेताच ८००० हजारची आर्थिक मदत.
मुलीला १८ वर्ष पूर्ण होताच तिला ७५००० हजाराची आर्थिक मदत सरकारच्या वतीने केली जाते.
Lek Ladki Yojana लेक लाडकी योजनेसाठी पात्रता
- अर्जदार मूळचा महाराष्ट्रातील असावा.
- लेक लाडकी योजनेसाठी केवळ मुलीच पात्र असतील.
- पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीच या योजनेसाठी पात्र.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी चे बँक खाते असणे गरजेचे आहे
- मुलींना १८ वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल
Lek Ladki Yojana लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्ती
- पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक व दोन मुलींसाठी ही योजना असून एक मुलगा व एक मुलगी असल्यासही मुलीला मिळेल लाभ.
- पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्या साठी आणि दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असताना आई वडिलांनी कुटुंब नियोजन केले असल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास आणि त्यात एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही मुलीच जन्मल्यास त्या मुलींना लाभ मिळतो मात्र त्यावेळी आई किंवा वाडीलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
- १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे त्या नंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलीलाही या योजनेचा लाभ मिळतो.
- या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक नसावे.
- लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
Lek Ladki Yojana 2024 लेक लाडकी योजना 2024 : आवश्यक कागदपत्रे
- पालकांचे आधार कार्ड
- मुलीचे जम प्रमाणपत्र
- पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आवश्यक
- उत्पन्न प्रमाणपत्र गरजेचे
- जात प्रमाणपत्र आवश्यक
- मोबाइल नंबर असावा
- बँक खाते असणे आवश्यक
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
आदि कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
Lek Ladki Yojana 2024 online apply लेक लाडकी योजनेसाठी असा करा अर्ज
आम्ही तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पाच्या वेळी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 Lek Ladki Yojna 2024 सुरू करण्याची घोषणा केली असून ही योजना राज्यात अजून लागू करण्यात आलेली नाही. मात्र ही योजना राज्य सरकार लवकरच सुरू करण्याच्या विचारात आहे. त्या नंतर या योजनेची माहिती सरकारच्या वतीने सार्वजनिक करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिवस या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही दिवस प्रतिक्षाच करावी लागणार आहे. सरकारकडून या योजनेसाठी कसा अर्ज करता येईल या संदर्भात लवकरच आधी सूचना जारी होऊ शकते.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींना आपले शिक्षण घेता यावे यासाठी लेक लाडकी ही योजना Lek Ladki Yojana सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे मुलीच्या शिक्षणाचा आर्थिक भार गरीब कुटुंबावर पडणार नाही. कारण राज्यभरात अनेक आशे कुटुंब आहेत की आर्थिक परिस्थितीमुळे ते आपल्या मुलीला शिक्षण देण्याची इच्छा असतानाही पैसे अभावी शिक्षण देऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या मुली शिक्षणापासून वंचित होतात आशा मुलींना या योजनेचा अधिक लाभ होणार आहे. शिक्षण नसल्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळत नाही आणि त्यांना मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून राज्य सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील मुलीही चांगले शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहून कुटुंबाला हातभार लावतील.
काय आहे लखपती दीदी योजना https://yojanamazi.com/lakhapati-didi-yojana-2024-in-marathi/#more-258
FAQ’s लेक लाडकी योजनेसाठी विचारली जाणारी काही प्रश्न Lek Ladki Yojana 2024
- लेक लाडकी योजना म्हणजे काय?
- महाराष्ट्र सरकारने मुलीच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. याद्वारे मुलगी ही १८ वर्षाची झाल्यानंतर तिला सरकारकडून ७५००० रुपयांची मदत मिळते.
- महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना कधी सुरू केली?
- २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू करत असल्याची घोषणा केली आहे.
- लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय?
- पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलीच या योजनेसाठी पात्र आहेत.
- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत साइड वर जाऊन अर्ज करावा लागेल.
- लेक लाडकी योजनेची अधिकृत लिंक कोणती?
- या योजनेची अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत वेबसाइट लिंक जाहीर करण्यात आलेली नाही. ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे जशी ती लिंक जाहीर होईल आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून कळवू.