LIC bima sakhi yojana 2025 information in marathi : महिलाला मिळेल रोजगार, गावाला सामाजिक सुरक्षा
LIC bima sakhi yojana : ग्रामीण विकास मंत्रालय व भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) यांच्या दरम्यान एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भारतामध्ये आर्थिक संरक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना सक्षम बनवणे हा आहे.
LIC bima sakhi yojana या करारानुसार देशभरामध्ये बचत गटातील प्रशिक्षित महिलांना बीमा सखी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणार आहे.
Vima Sakhi Yojana हा पुढाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत सर्वांसाठी विमाच्या दृष्टिकोन आणि आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेशी निगडित आहे. वीमा सखी योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवते. याबरोबरच ग्रामीण जनतेपर्यंत सामाजिक सुरक्षा योजना पोहोचण्यासाठी एक सक्षम माध्यम म्हणून समोर येत आहे.
Vima Sakhi Yojana वीमा सखी विशेष करून ग्रामीण आणि अर्ध शहरी क्षेत्रामध्ये विमा एजंट म्हणून काम करतील आणि लाखो लोकांच्या घरापर्यंत ती विमा सरक्षण पोहोचवण्यात यशस्वी होईल. वीमा सखी द्वारे आपल्या स्थानिक ज्ञान आणि सामाजिक संबंधाच्या माध्यमातून समुदायांना विमाचे महत्त्व आणि आर्थिक सुरक्षा संदर्भात जागरूक करण्याचे काम केले जाईल.
या योजनेचे प्रमुख लाभ
bima sakhi yojana Benefits
- महिलांचे आर्थिक सशक्तिकरण-
- वीमा सखी योजनेच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर बनतील.
- रोजगार आणि महिलाश्रम मध्ये भागीदारी-
- ग्रामीण भागामध्ये महिलांची भागीदारी वाढण्यास मदत होईल.
- समुदायाआधारित विश्वासू आणि ती फायदेशीर विमा सेवा सुलभ होते.
- लवचिक आणि संरक्षण वीमा तंत्र
वीमा सखी योजना सामाजिक सुरक्षा आणि महिला सशक्तिकरण एका धाग्यामध्ये बांधते. भारताच्या ग्रामीण भागामध्ये आर्थिक संरक्षणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
या पुढाकारामुळे महिला सखींना आत्मनिर्भर बनवण्यात मदत होत आहे. या दृष्टिकोनातूनच पुढे हा करार राज्य सरकारच्या मदतीने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून एक राष्ट्रीय आंदोलन म्हणून विकसित करण्याच्या दिशेमध्ये काम करण्यात येत आहे.