LIC Jan Suraksha Yojana : काय आहेत या योजनेचे फायदे
lic jan suraksha yojana benefits premium tenure and all details in marathi : एलआयसी जन सुरक्षा योजना (Jan Suraksha Yojana) कसे काम करते?आज आम्ही तुम्हाला एलआयसी जन सुरक्षा योजना संदर्भात माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला या योजनेच्या लाभाबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया एलआयसी जन सुरक्षा योजना मध्ये गुंतवणूक किंवा प्रीमियमची रक्कम किती असते आणि कुठले लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी भारतातील दिग्गज इन्शुरन्स कंपनी आहे. नुकत्याच एलआयसीने दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचे नाव एलआयसी जन सुरक्षा योजना आणि एलआयसी बीमा लक्ष्मी योजना (Bima Lakshmi Yojana) आहे. आम्ही तुम्हाला या योजनेच्या लाभा बद्दल माहिती देणार आहोत.
चला तर जाणून घेऊया एलआयसी जन सुरक्षा योजनामध्ये गुंतवणूक किंवा प्रीमियमची रक्कम किती आहे आणि कोणाला यामध्ये गुंतवणूक करता येते. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये इन्शुरन्स सोबतच गुंतवणुकीचा लाभ पण आपल्याला मिळतो.

एलआयसी जन सुरक्षा योजना
lic jan suraksha yojana benefits premium tenure and all details in marathi : एलआयसी जन सुरक्षा योजना कसे काम करते?एलआयसी जन सुरक्षा योजना एक मायक्रो इन्शुरन्स योजना आहे. एलआयसीच्या या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असणारे व्यक्ती आणि कुटुंबांना स्वस्त दरात इन्शुरन्स उपलब्ध करून देणे हा आहे. एलआयसी जन सुरक्षा योजना एक नॉन लिंक आणि नॉन पार्टीसीपेटींग व्यक्तिगत बचत जीवन विमा योजना आहे.
या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास इन्शुरन्सचा लाभ मिळतो. समजा पॉलिसी दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू होत नाही म्हणजे पॉलिसीधारक जिवंत आहे तर त्याला गुंतवणुकीच्या अनेक रकमेचा लाभ मिळतो.
एलआयसी जन सुरक्षा योजनामध्ये विमा रक्कम आणि अवधी
एलआयसी जन सुरक्षा योजनामध्ये एक लाख रुपये ते दोन लाख रुपये पर्यंत इन्शुरन्स दिला जातो. या योजनेमध्ये इन्शुरन्सची रक्कम 5000 गुणक मध्ये असणे आवश्यक आहे. या योजना किंवा विमा मर्यादेबद्दल बोलले तर याचा अवधी बारा वर्षे ते वीस वर्षापर्यंत आहे. या योजनेमध्ये प्रीमियम तुम्हाला पॉलिसी अवधी पासून पाच वर्ष पर्यंत करावा लागतो. एलआयसी जन सुरक्षा योजना मध्ये 18 ते 55 वर्षातील व्यक्ती अर्ज करू शकतात
एलआयसी जन सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये
एलआयसी जन सुरक्षा योजनेमध्ये तुम्ही गुंतवणुकी बरोबरच इन्शुरन्सचा लाभही मिळू शकता.
या योजनेमध्ये तुम्ही सतत तीन वर्ष प्रीमियम भरत राहिलात की तुम्हाला ऑटोमॅटिक कव्हर सुविधा मिळते.
जर तुम्ही कमीत कमी एक वर्षाचा प्रीमियम जमा केला आहे तर तुम्हाला या पॉलिसी अंतर्गत कर्जही मिळू शकते.