Magel Tyala Vihir Yojana 2024 Information In Marathi : मागेल त्याला विहीर योजना 2024 मराठी माहिती
Magel Tyala Vihir Yojana 2024 : देशभरातील बदलत्या हवामानाचा फटका राज्यातील शेतीलाही मोठ्या प्रमाणात बसतो. राज्यातील पावसाच्या लहरीपणामुळे पाण्याअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र प्रत्येक जण विहीर घालू शकेल अशी आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीहीर काढण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचनाचे पाणी देता यावे यासाठी सरकारच्या वतीने मागेल त्याला विहीर योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती विहीर योजना Magel Tyala Vihir Yojana 2024 या नावाने ही योजना सुरू केली.
Magel Tyala Vihir Yojana मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या मदतीच्या साह्याने शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदू शकतो आणि विहिरीतील पाण्याचा सिंचनासाठी वापर करून आपले उत्पादन वाढू शकतो. राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध होत नाही. शेतीला योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. हे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून सरकारने मागेल त्याला विहीर देण्यासाठी Magel Tyala Vihir Yojana योजना सुरू केली आहे. त्यामुळे पावसाने खंड दिला तरी शेतकरी आपल्या विहिरीतील पाणी शेतीला देऊन आपले पिके वाचवू शकेल. मात्र विहीर खाणण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. त्यांच्याकडे पैशाची अडचण असते ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने पंचायत समिती विहीर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रभावी ठरताना दिसत आहे.
मागेल त्याला विहीर योजना म्हणजे काय?
Magel Tyala Vihir Yojana Information
Maharashtra Vihir Yojana शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खाणण्यासाठी सरकारच्या वतीने या योजनेअंतर्गत 4 लाख रुपयाची आर्थिक मदत लाभार्थी शेतकऱ्याला दिली जाते. लाभार्थी या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊन विहीर घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागतो. शेतीमध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी पिकांना योग्य वेळी सिंचनाद्वारे पाणी देणे महत्त्वाचे असते. पाणी देण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी कोण आहेत पात्र?, या योजनेसाठी अर्ज कुठे करावा?, योजनेचे फायदे काय? आदी सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर Maharashtra Vihir Yojana खोदण्यासाठी सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समिती विहीर योजना अंतर्गत मागील त्याला विहीर होण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना चार लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतीला योग्य वेळी सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध होते आणि शेतकऱ्याचे होणारे नुकसान होत नाही. या योजनेला मागेल त्याला विहीर योजना 2024 Magel Tyala Vihir Yojana 2024 व पंचायत समिती विहीर योजना 2024 या दोन्ही नावाने ओळखले जाते.
Maharashtra Vihir Yojana राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्याकडे विहीर नसल्यामुळे पावसावर आधारित शेती करावी लागते आणि बिघडलेल्या हवामानामुळे पाऊस हा लहरीपणाचा झाला आहे. त्यामुळे मध्येच पावसाला खंड पडतो आणि शेतीतील पिके करपू लागतात यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असतात. त्यामुळे ते आपल्या शेतात विहीर किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विहीर अनुदान योजना सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने मनरेगाच्या योग्य नियोजनातून पाणी नियोजनाचे मोठे काम केले आहे. यामुळे भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात एकूण 3,87,520 विहीर खोदणे शक्य आहे मनरेगाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर ठिबक, तुषार सिंचन त्याच्या माध्यमातून शेतीला देण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागेल त्याला विहीर योजना 2024 सुरू केली आहे.
ठळक मुद्दे :
मागेल त्याला विहीर योजना म्हणजे काय?
मागेल त्याला विहीर योजनेची थोडक्यात माहिती
विहीर अनुदान योजनेचे उद्दिष्ट
पंचायत समिती विहीर योजनेची वैशिष्ट्ये
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र लाभार्थी
शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान
मागेल त्याला विहीर योजनेचे फायदे
मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून दिला जाणार लाभ
विहीर योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या लाभार्थ्याची निवड प्रक्रिया
विहीर अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती
विहीर योजना अंतर्गत विहीर कुठे खोदावी याबद्दलची माहिती
विहीर कुठे खांदू नये यासाठीचे नियम
मागेल त्याला विहीर योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
मागेल त्याला विहीर योजनेसाठीची पात्रता
मागेल त्याला विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया
मोबाईल ॲप द्वारे हा अर्ज कसा करावा ते बघूया
मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसा करावा
मागेल त्याला विहीर या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येतो.
FAQ’s
मागेल त्याला विहीर योजनेची थोडक्यात माहिती
Magel Tyala Vihir Yojana In Short
योजनेचे नाव | मागेल त्याला विहीर |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | कृषी विभाग |
लाभ | चार लाख रुपयाचे अनुदान |
उद्देश | शेतात विहीर खोदण्यासाठी मदत |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | http://aaplesarkar.maharashtra.gov.in |
विहीर अनुदान योजनेचे उद्दिष्ट
Magel Tyala Vihir Yojana Purpose
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य वेळी सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- अधिकाधिक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी खाजगी कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हा एक या योजनेचा उद्देश आहे.
- लहरी पावसाच्या पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे
- शेतीचे नुकसान झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात त्या थांबवने हा Sheti Vihir Yojana या योजनेचा उद्देश आहे.
- आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला विहीर योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे शेतीला योग्य वेळी सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक विकास करणे हा एक उद्देश.
- Sheti Vihir Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे, त्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य संपवण्यासाठी प्रयत्न करणे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीहीर खोदण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून देणे.
- शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत निर्माण करून देणे.
- शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याचा भवितव्यासाठी त्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून देणे.
पंचायत समिती विहीर योजनेची वैशिष्ट्ये
Magel Tyala Vihir Yojana Features
- मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाखाचे अनुदान उपलब्ध करून देणे हा योजनेची वैशिष्ट्य आहे.
- या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया सरकारकडून सोपी ठेवलेली आहे जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतीचे पिकाचे होणारे नुकसान आणि त्यातून येणारे नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या शेतकरी आत्महत्या थांबवणे साठी ही योजना प्रभावी ठरणार आहे.
- राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पूर्वीची गावासाठी निश्चित केलेली विहिरीची संख्या हटवून आता मागील त्याला विहीर देण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेची मिळणारी आर्थिक मदत शेतकरी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
- राज्यभरातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आता घेता येईल.
विहीर अनुदान योजना Vihir Yojana महाराष्ट्र लाभार्थी
- आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी व स्वतःच्या शेतात विहीर होण्यासाठी असमर्थ असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी.
- भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी.
- अन्य मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती.
- अन्य मागास वर्गातील शेतकरी.
- महिला शेती करत असलेल्या कुटुंबातील महिला शेतकरी.
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
- जॉब कार्ड धारक व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील शेतकरी अनुसूचित जाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 लाभार्थी.
- तसेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे अशी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे अशी शेतकरी ही या योजनेसाठी पात्र आहेत शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान
Maharashtra Vihir Yojana
Vihir Yojana राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर होण्यासाठी मागेल त्याला विहीर या योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याद्वारे शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदून शेती पिकासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करू शकेल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
मागेल त्याला विहीर योजनेचे फायदे
Magel Tyala Vihir Yojana Benefits
- Shet Vihir Yojana या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 4 लाख रुपये अनुदान त्यांच्या शेतात विहीर होण्यासाठी देत आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हा या योजनेत फायदा आहे.
- विहीर खाण्यासाठी अर्थक मदत देऊन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.
- शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाचा स्त्रोत निर्माण करून देणे व याद्वारे शेतीला योग्य वेळी पाणी दिल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
- त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मदत होईल.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर होण्यासाठी आर्थिक पाठबळ निर्माण करून देणे.
- शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून आपल्या पायावर उभा करणे.
- अशा योजनातून शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
- सरकारी योजनेच्या माध्यमातून चार लाखापर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना वीहीर घेण्यासाठी देत असल्यामुळे शेतकऱ्यांना वीहीर होण्यासाठी इतर कुठल्याही खाजगी सावकाराकडे कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल होईल आणि त्यांना आर्थिक उत्पन्नाचा एक कायमस्वरूपीचा स्त्रोत निर्माण होईल.
मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून दिला जाणार लाभ
Maharashtra Vihir Yojana राज्यातील शेतकऱ्यांना मागील त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून चार लाख रुपयांचा आर्थिक मदत केली जात आहे जेणेकरून शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी.
विहीर योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या लाभार्थ्याची निवड प्रक्रिया
Shet Vihir Yojana सिंचन विहीर योजना 2024 साठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही गावाच्या ग्रामसेवकाच्या मार्फत करण्यात येते यासाठी त्याला गावातील सरपंच मदत करतात.
विहीर अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती
Magel Tyala Vihir Yojana terms and Conditions
- केवळ महाराष्ट्रातील शेतकरीच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- इतर कुठल्याही राज्यातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी त्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर नसावी.
- अर्ज शेतकऱ्याचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे किमान 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतामध्ये कोण काम करायचे आहे त्या परिसरात 500 मीटर पर्यंत इतर कुठली विहीर असता कामा नये.
- शेतकऱ्याची जमीन विहिरीसाठी तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. (यासाठी शाखा अभियंता उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून या संबंधीचा अहवाल घेण्यात येईल).
- दोन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराची 8 ही रन ऑफ झोन आणि अनुसूचित जाती व जमाती, दारिद्र रेषेखालील कुटुंब या त्यासाठी लागू नसेल.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारावर यापूर्वीची विहिरीची नोंदणी असता कामा नये. शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा ऑनलाईन दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- शेतकरी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र यासाठी एक एकर जमीन सलग असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याच्या जमिनीत सह हिस्सेदार असेल अशा स्थितीत शेतकऱ्याने अर्जासोबत त्या हिस्सेदारांची ना हरकत प्रमाणपत्रे जोडणे गरजेचे आहे.
विहीर योजना अंतर्गत विहीर कुठे खोदावी याबद्दलची माहिती
Shetkari Vihir Yojana
- दोन नाल्या मधील क्षेत्रात नाल्याचे संगमाजवळ जेथे मातीचा 30 सेंटिमीटरचा थर असेल व किमान 5 मीटर खोलपर्यंत मऊ झालेला खडक आढळतो तेथे विहीर खांदावी.
- नदी, नाल्या जवळील उथळ गाळ्याच्या भागात वीहीर खोंदावी. जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 सेमी पर्यंत मातीचा थर आणि किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम आढळतो अशा ठिकाणीही विहीर खाणता येते. नालाच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तिथे परंतु सदर उंचावर 54 किंवा चिकन माती नसावी ही अट घातली आहे.
- घनदाट झाडांच्या भागात.
- नदी व नाल्याचे जुने प्रवाह किंवा नदीपात्र नसताना देखील वाळू गारगोट्या सापडतात अशा ठिकाणीही विहीर खोदण्यास काही हरकत नाही.
- नदी नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भागात.
विहीर कुठे खांदू नये यासाठीचे नियम
Shetkari Vihir Yojana
- जमिनीत कडक खडक असलेल्या ठिकाणी विहीर खांदू नये.
- डोंगराचा कडा आणि परिसराचे दीडशे मीटरच्या अंतरात विहीर खांदू नये.
- मातीचा थर 300 सेंटीमीटर पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत मुरमाची खोली पाच मीटर पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत( मुरमाची खोली तपासण्यासाठी जवळच असलेल्या विहिरीत तुम्ही पाहून मुरमाची पातळी शोधू शकता किंवा विहीर नसल्यास नदी नाल्याच्या काठावरूनही मुरमाची खोली आपल्याला दिसून येते).
- विहीर खोदताना खाली काळा पाषाण लागल्यास मशीन वापरून पुढील खोद काम करता येते मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोंदकाम बंद करून पंचनामा करून पूर्णत्वाचे दाखले घ्यावे व 14 क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोलीत हे काम करूनही एखाद्या वेळेस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करून विहीर निष्फल ठरवण्यात यावी.
- अशा दोन्ही प्रकारे अपयश आल्यानंतर विरोध पावसाचे पुरेसे पाणी यावे यासाठी शेतात चर खोदकाम व फॉर्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहिरीच्या समोरच्या भागात करावा त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर विहीर पाण्याने भरून जाईल आणि यावेळी काळापासून असल्यामुळे तीन-चार महिने विविध पाणी साचलेले राहील त्याचा उपसा करून शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊ शकेल.
मागेल त्याला विहीर योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Magel Tyala Vihir Yojana Documents
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- रोजगार हमीचे जॉब कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- शेतीचा 7/12 व 8अ
- पासपोर्ट फोटो
- सामूहिक वीर खंदायचे असल्यास लाभार्थी मिळून एक एकर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पण जनामा सामुदायिक विहीर असल्यास पाणी वापरण्याबाबतचे करार पत्र
मागेल त्याला विहीर योजनेसाठीची पात्रता
Magel Tyala Vihir Yojana Eligibility
- या योजनेसाठी अर्ज करताना प्रथम तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे.
- याबरोबर तुमच्या नावावर असलेली उत्पादन आवश्यक असणे आवश्यक आहे.
- यापूर्वी तुमच्या शेतात जुनी विहीर असता कामा नये.
मागेल त्याला विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया
Magel Tyala Vihir Yojana Online Apply
मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येतो. तसेच मोबाईल वरील ॲप द्वारे देखील करता येतो. दोन्हीही पद्धती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
- मोबाईल ॲप द्वारे हा अर्ज कसा करावा ते बघूया
- अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला आपल्या मोबाईलवर वरील प्ले स्टोअर वर MA HA-EGS Horticulture/Well app हे ॲप आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या.
- त्यानंतर लाभार्थ्याला तिथे लॉगिन हा पर्याय दिसेल लॉगिन पर्यावर क्लिक करा
- त्या नंतर तुम्ही अर्ज सादर केल्यावर अर्जाची सद्यस्थिती बघू शकता
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करा
- यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची माहिती भरावी लागणार आहे. जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत ही सर्व माहिती भरा.
- त्यानंतर लाभार्थ्याला जॉब कार्ड क्रमांक खालील चौकटीमध्ये टाकायचा आहे.
- त्यानंतर जॉब कार्ड चा फोटो अपलोड करा.
- त्यानंतर लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे ते निवडा
- अर्जदाराकडे किती जमीन आहे ते टाका 8 अ प्रमाणे
- त्यानंतर खालच्या चौकटीमध्ये विहीर भूमापन क्रमांक टाका जो की तुमच्या सातबारावर असतो
- तुम्ही लिहिलेली संपूर्ण माहिती अचूक आहे ना याची खात्री करून घ्या आणि पुढे जा या बटनवर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर प्रपत्र अ दिसेल त्या पेजवर खाली आल्यावर शेवटी पुढे जा हा पर्याय आहे त्या पर्यायावर करून प्रपत्र ब दिसेल त्या पेजच्या खाली तुम्हाला अर्ज जमा करा जमा करा असे बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करा
- त्यानंतर अर्जदाराने जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावर एक ओटीपी येईल तो त्या बॉक्समध्ये टाका
- तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल जो की धन्यवाद अर्ज यशस्वी प्रस्तुत केला आहे असा असेल.
आशा पद्धतीने मोबाईल वरुण तुम्ही अर्ज करू शकता.
- मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसा करावा
- तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या योजनेचा करू शकता.
- यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर वेबसाईट वरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्या.
- हा डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या आणि त्यावर स्वतःची सही करा.
- हा भरलेला अर्ज आणि त्यासोबतच या अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- हे सर्व झाल्यानंतर आपले सरकार या पोर्टलवर जाऊन विहीर कार्यक्रम या लिंक वर क्लिक करा.
- आपले सरकार पोर्टलवर तुमची प्रोफाइल तयार करून घ्या.
- त्यानंतर ऑनलाईन अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना यांची स्कॅन कॉपी अपलोड करा .
- ऑनलाईन अर्जाची डाउनलोड केलेली पावती तुमच्याकडे ठेवा.
अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
- मागेल त्याला विहीर या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येतो.
यासाठी अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल आणि त्यानंतर ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्ज विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे लागतील.
त्यानंतर तो अर्ज तुम्ही ज्यांच्याकडून घेतला आहे त्यांच्याकडे जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुम्ही या तीनही पद्धती पैकी कोणत्याही पद्धतीने मागेल त्याला विहिरी या योजनेचा अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s
प्रश्न: मागेल त्याला विहीर योजनेचा उद्देश?
उत्तर: शेतकऱ्यांना शेतात वीहीर करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे.
प्रश्न: शेती विहीर योजना अंतर्गत अनुदान रक्कम किती मिळते?
उत्तर: मागेल त्याला विहिरी योजना अंतर्गत शेतकऱ्याला शेतात विहीर करण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळते.
प्रश्न: मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर: मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज तुम्ही मोबाईल ॲप द्वारे, ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने या तीनही पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जवळील भागातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयाच्या कृषी विभागात जाऊन अर्ज करावा लागेल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA