Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात पॉप्युलर लाडकी बहीण योजना ठरली आहे. आता या लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दहा मोठी आश्वासने दिली आहेत.
Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा 2024 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
आता महाराष्ट्रात सर्वच पक्षाकडून प्रचाराचा नारळ फोडला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडी सर्वच पक्षाच्या नेत्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यभर विविध सभा मेळावे घेण्यात येत आहेत. तसेच मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : या सभा मेळाव्यामधून विरोधकांवर आरोप प्रत्यारोपाच्या होत आहेत. मंगळवारी कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली एकत्रित सभा झाली. या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेंना 10 मोठी आश्वासने दिले आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : या आश्वासनामध्ये लाडकी बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25000 महिलांची पोलीस भरती करणार असल्याचे आश्वासने त्यांनी यावेळी दिली आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : कोल्हापूर मधील महायुतीच्या संयुक्त सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. या सभांमध्ये बोलताना या सर्वांनीच विरोधी असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यावर जोरदार टीका केली आहे.
Maharashtra Assembly Elections : याबरोबरच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवले तसेच हा फक्त ट्रेलर असून सविस्तर जाहीरनामा आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणूक 2014 च्या प्रचाराची सुरुवात आम्ही कोल्हापूर मधूनच केली होती असे एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आणि यावेळीही याच ठिकाणावर प्रचाराची सुरुवात करणार आहोत. 23 नोव्हेंबरला आम्ही विजयाचा गुलाल घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत.
आमच्या महायुतीचा जो राहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने यावेळी तुमच्यासमोर मांडत आहे. आमचे सरकार जे बोलते ते करते हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यातील राज्यात सर्वात पॉप्युलर ठरलेली लाडकी बहीण योजना आहे.
या राज्यातील लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याबरोबरच राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही आशीर्वाद द्या, तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवून दाखवतो!
Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित महायुती विजय निर्धार सभेला कोल्हापूर येथे एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्यासमवेत उपस्थित होतो. यावेळी महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद केला व जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला संबोधित केले.
महायुती सरकारने महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसह उद्योगांचे जाळे उभे केले, सामाजिक क्षेत्रात सर्व समाजांना पुढे आणण्यासाठी महामंडळांची स्थापना केली. आपल्या बहिणींना केंद्रस्थानी आणण्याकरिता लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात सवलत, मोफत उच्चशिक्षण या योजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.
कोल्हापूर येथून प्रचाराची सुरुवात केली की विजय मिळतोच, आज येथे करवीरनिवासीनी आई अंबाबाईचे दर्शन व आशीर्वाद घेतले. आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही आशीर्वाद द्या तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवून दाखवू असा विश्वास यावेळी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महायुतीचा वचननामा!
- लाडक्या बहिणींना 2100 रुपये
प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन ! - शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये
प्रत्येक वर्षाला 12,000 वरून 15,000 रुपये देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन ! - प्रत्येकास अन्न आणि निवारा
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन ! - वृद्ध पेन्शनधारकांना 2100
महिन्याला 1500 वरून 2100 देण्याचे वचन ! - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन ! - 25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000
प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन देण्याचे वचन ! - 45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार
राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन ! - अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला 15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे वचन ! - वीज बिलात 30% कपात करून
सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन ! - सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029‘
100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024