Maharashtra Government Formation Date 2024 : या तारखेला नवीन सरकार शपथविधी घेणार
Maharashtra Government Formation Date 2024 : महाराष्ट्रात नुकतेच मतदान झाले त्याचा निकालही आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामध्ये सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींचा वेग चालू आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री सोबतच 20 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत भाजपचे 10 आमदार, शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यातच आता नवीन सरकार कधी स्थापन होणार याची तारीख देखील समोर आली आहे.
Maharashtra Government Formation Date 2024 : भाजप नेते रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण होणार? यावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले, येत्या 30 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. रावसाहेब दानवे असे म्हणाले की, भाजप सह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. या फक्त चर्चा होत आहे. मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्मुला एकत्रित बसून ठरवला जाईल असे रावसाहेब दानवे म्हणाले.