Maharashtra Government Vivah Protsahan Yojana In Marathi : कसा कराल अर्ज वाचा सविस्तर
Maharashtra Government Vivah Protsahan Yojana : महाराष्ट्र सरकार प्रत्येकासाठी नवनवीन योजना राबवत असते. आता देशातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजनेची घोषणा केली आहे.
Maharashtra Government Vivah Protsahan Yojana : सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे. आता दिव्यांग असलेल्या नागरिकांना लग्नासाठी प्रोत्साहन निधी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यानुसार दिव्यांग नागरिकांना आता 2.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
जर दिव्यांग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी लग्न केले तर त्यांना 1.5 लाख रुपये दिले जातात, जर दिव्यांग व्यक्तीने दुसऱ्या दिव्यांग व्यक्ती सोबत लग्न केले तर त्यांना 2.5 लाख रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. ही रक्कम पती-पत्नीच्या एकत्रित खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
Maharashtra Government या योजनेअंतर्गत पती-पत्नीच्या खात्यावर जमा केलेली 50% रक्कम ही 5 वर्षासाठी एफडी करणे आवश्यक असणार आहे. जेणेकरून त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. दिव्यांग व्यक्तींच्या लग्नाबाबतचे विचार बदलण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग सामान्य विवाह प्रोत्साहन योजनेत बदल केला आहे.
Maharashtra Government या योजनेतील रक्कम वाढवून देण्यात आली आहे. याबाबतचे निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने जाहीर केले आहेत. या योजनेच्या पात्रता काय आहेत या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो याची माहिती आज आपण पाहू.
योजनेची पात्रता
Maharashtra Government Vivah Protsahan Yojana सरकारच्या निर्णयानुसार वधू आणि वर यांच्याकडे दिव्यांग असण्याचे UDID कार्ड असणे आवश्यक आहे. दिव्यांग वर किंवा वधू पैकी एक जण महाराष्ट्राचा रहिवासी असावा. या दोघांचेही यापूर्वी लग्न झालेले नसावे. लग्नाचे रजिस्ट्रेशन केलेले असावे. लग्नानंतर एका वर्षात या योजनेसाठी अर्जदार अर्ज करू शकतात.