Mahayuti Government Loan Interest Waiver Scheme : राज्य सरकारने तरुणांसाठी सुरू केली नवी योजना

Mahayuti Government Loan Interest Waiver Scheme : निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची तरुणांसाठी नवी योजना

Mahayuti Government Loan Interest Waiver Scheme : राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. निवडणुका तोंडावर असतानाच सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महायुती Government सरकारने नवीन योजनेची घोषणा केली आहे. ही योजना तरुणांसाठी सुरू केल्याचे सरकारने सांगितले आहे. कर्ज व्याज परतावा योजना असं या योजनेचे नाव आहे.

Maharashtra state government scheme नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका तोंडावर असतानाच सरकारने तरुणांसाठी नवीन योजनेचे गिफ्ट दिल आहे. सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांसाठी कर्ज व्याज परतावा ही योजना राबवली आहे.

Maharashtra Government या योजनेमुळे सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे. ती कशी ही आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Government Scheme कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत तरुणांना कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज जर तरुणांनी वेळेवर फेडले तर त्यावरील व्याज परत मिळणार आहे. म्हणजे जवळपास कोणत्याही व्याजाशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला कर्जाचे हप्ते वेळेवर भरावे लागणार आहेत.

Mahayuti Government Loan Interest Waiver Scheme सरकारच्या या निर्णयामुळे स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने परशुराम महामंडळाची स्थापना केली होती. यासाठी 10 कोटींचा निधी दिला होता. त्याचबरोबर ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांसाठी 10 टक्के आरक्षण देखील देण्यात आले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी योजना सुरू केली आहे. यामुळे या समाजातील तरुणांना दिलासा मिळाला आहे.

या योजनेत अंतर्गत दरवर्षी 50 लाभार्थ्यांना कर्ज दिले जाणार आहे. 15 लाख रुपया पर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार आहे. त्यामुळे ते स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतील किंवा अन्य कोणताही व्यवसाय सुरू करू शकतील. जर हे कर्ज फेडले तर व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Mahayuti Government Loan Interest Waiver Scheme गट कर्ज योजनेत 50 लाख पर्यंतच्या कर्जावर देखील परतावा मिळणार आहे. मात्र या गट योजनेत कर्जाची कमाल मर्यादा 15 लाख रुपये असणार आहे. कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत तुम्ही कर्जाचा हप्ता भरल्यानंतर त्याची माहिती 15 दिवसाच्या आत महामंडळाला देणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला व्याजाचा परतावा मिळणार नाही.

Maharashtra Government या योजनेमुळे ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकारला फायदा देखील होण्याची शक्यता आहे.