Mahila Bachat Gat Loan Yojana Information In Marathi : महिला बचत गट कर्ज योजना 2024 मराठी माहिती
Mahila Bachat Gat Loan Yojana महिला समृद्धी कर्ज योजना 2024 : केंद्र सरकार नवनवीन योजना महिलांसाठी राबवत आहे. जेणेकरून महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. त्यातीलच एका योजनेची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्या योजनेचे नाव म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना 2024 महिला बचत गट लोन Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana. ही योजना महिलांना त्यांच्या व्यवसायाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाकडून राबवली जात आहे. आपण पाहतो की, सध्या महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. तसेच त्यांना एक आधार म्हणून सरकारने ही महिला बचत गट कर्ज योजना सुरू केली आहे. आजच्या जगात प्रत्येक महिला ही काम करत आहे. कोणी नोकरी, कोणी घरामध्ये छोटा मोठा व्यवसाय, कोणी बचत गटाच्या साह्याने स्वतःचा व्यवसाय करत आहे. परंतु काही महिलांना या योजना माहित नाहीत आणि त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभही घेता येत नाही. महिला बचत गट कर्ज योजना 2024 Mahila Bachat Gat Loan Yojana ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे. जी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आणि महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी राबविण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास मदत होते. (बचत गट शासकीय योजना 2024)
महिला बचत गट लोन योजना 2024 Mahila Bachat Gat Loan Yojana ही शासनाची अशी एक योजना आहे जी त्यांना लघुउद्योगांसाठी आणि स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना Mahila Bachat Gat कर्ज मिळते. त्या कर्जाची रक्कम 5 लाख ते 20 लाख पर्यंत आहे. तसेच त्याचा व्याजदरही खूप कमी आहे. केवळ 4 टक्के प्रति वर्ष हा या कर्जाचा व्याजदर असून, त्याची परतफेड ही 3 वर्षापर्यंत आहे. आज आपण या बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांसाठी कर्ज योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महिला समृद्धी कर्ज योजना 2024 म्हणजे काय, महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, उद्दिष्टे, महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज कसा करावा, महिला बचत गट कर्जासाठीची लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत यासह सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही संपूर्ण लेख नक्की वाचा. (बचत गट शासकीय योजना 2024)
महिला समृद्धी कर्ज योजना म्हणजे काय?
What is Mahila Samridhi Yojana
महिला बचत गट कर्ज योजना 2024 : Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana 2024 या योजनेची सुरुवात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुरू केलेली असून ही योजना महिलांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करते. तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास मदत करते. महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेचा प्रारंभ झाला आहे. महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज तुम्हाला 5 लाख रुपयापासून 20 लाख रुपये पर्यंत मिळते. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध केले जाते. या योजनेचा लाभ हा शहरी भागातील महिलांना तसेच ग्रामीण भागातील महिलांना देखील होतो. या महिला बचत गट कर्ज योजना 2024 च्या कर्जाचा व्याजदर हा फक्त 4 टक्के असून त्याचा परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षे आहे. त्यामुळे या योजनेतून कर्ज घेण्यासाठी महिलांना कसलीही चिंता करायची आवश्यकता नाही. (बचत गट शासकीय योजना 2024)
ठळक मुद्दे :
महिला समृद्धी कर्ज योजना म्हणजे काय?
महिला समृद्धी कर्ज योजनेची थोडक्यात माहिती
महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे
महिला समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश
महिला समृद्धी कर्ज योजनेची पात्रता
महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अटी
महिला समृद्धी कर्ज योजना साठी आवश्यक कागदपत्रे
महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचा उपयोग
महिला बचत गट कर्ज योजनेसाठीचा व्याजदर
महिला बचत गट कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
FAQ’S
महिला समृद्धी कर्ज योजनेची थोडक्यात माहिती
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana in Short
योजनेचे नाव | महिला समृद्धी कर्ज योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील बचत गटातील महिला |
कर्ज रक्कम | 5 लाख ते 20 लाख |
कर्ज व्याजदर | 4% |
उद्देश | राज्यातील लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana Benefits
महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना ही स्वतःचा एखादा लहान व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे.
महाराष्ट्र राज्यातील महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावते.
बचत गटामध्ये असणाऱ्या महिलांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरते.
महिला समृद्धी कर्ज योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो .
या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आत्मनिर्भर बनतात.
महिला बचत गट कर्ज योजने अंतर्गत आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होते.
महिलांना त्यांचा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे या योजनेद्वारे कर्ज दिले जाते त्याचे व्याजदर अत्यंत कमी आहे. केवळ 4 टक्के व्याज दराने हे कर्ज उपलब्ध होते.
महिला बचत गट समृद्धी योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्षापर्यंत आहे त्यामुळे महिलेला आता कुठलाही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही.
या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते.
या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
या योजनेतून महिला बचत गटांना छोटा व्यवसाय आणि रोजगारासाठी कर्ज मिळते
महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनते तसेच त्यांच्या सक्षमीकरणाद्वारे समाजाचा विकास होतो.
महिला समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana Purpose
राज्यातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या बनविण्यासाठी महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
बचत गटातील ज्या महिलेला स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना आर्थिक मदत करणे.
bachat gat Yojana या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारून त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे.
महिला बचत गट कर्ज योजनेचे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर करणे.
महिला समृद्धी कर्ज योजनेची पात्रता
Mahila Samruddhi Karj Yojana Eligibility
महिला बचत गट योजना या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच होईल.
महिला बचत गट योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
महिला बचत गट योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती यापैकी असाव्या.
बचत गटातील महिलांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
महिला लाभार्थी ह्या BPL दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतील असाव्यात.
कोणतेही बचत गट सुरू होऊन कमीत कमी 2 वर्षे तरी पूर्ण झालेली असावी त्याच बचत गटास या योजनेचा लाभ घेता येईल.
मागील गुन्हेगारी रेकॉर्ड नसावे.
लाभार्थ्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये असावे तर शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये पर्यंत असावे.
कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
शासनाच्या महिलांसाठीच्या काही योजना
महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अटी
Mahila Samruddhi Karj Yojana Conditions
महिला बचत गट योजना Mahila bachat gat Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून तर 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध केले जाते.
कर्ज वितरणाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग चार महिन्यांच्या आत करणे आवश्यक आहे.
महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 20 लाखांचे कर्ज दिले जाते व त्या वरील रक्कम ही लाभार्थ्यास स्वतः जवळील भरावी लागते.
bachat gat Yojana या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच होतो.
लाभार्थी महिला ही कुठल्याही बँकेची थकबाकीदार नसावी.
लाभार्थी महिलेने जर आधी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे रोजगार योजनेचा लाभ घेतलेला असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत मिळणारे रक्कम तीन वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.
जर अर्जदार महिलेने खोटी माहिती अर्जात भरली असेल तर अशा महिलेवर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि लाभाची रक्कम वसूल केली जाईल.
महिला बचत गट bachat gat Yojana हे सुरू होऊन कमीत कमी दोन वर्षे पूर्ण झालेले असावे त्याच बचत गटाला या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाईल.
बचत गटांनी त्यांच्या बचतीच्या संबंधित नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
महिला बचत गटाची मासिक बैठक नियमित आणि बचतीसाठी जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणी ही नियमित भरणे आवश्यक आहे.
बचत गटामार्फत सुरू असलेल्या उद्योगाच्या सक्षमीकरिता या निधीचा उपयोग करण्यात यावा.
ज्या बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असेल त्याच बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येईल.
bachat gat Yojana या योजनेअंतर्गत आर्थिक मदत ही एका बचत गटाला एकदाच मिळते.
सादर केलेल्याच्या अनुषंगाने त्या महिला बचत गटाला अर्थसाह्य मिळणे अथवा न मिळणे याचा अंतिम अधिकार हा माननीय आयुक्त यांना राहील. (बचत गट शासकीय योजना 2024)
महिला समृद्धी कर्ज योजनासाठी आवश्यक कागदपत्रे
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न दाखला
जन्म प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
शपथपत्र
व्यवसायाचे अंदाजपत्रक
बचत गटाचे पॅन कार्ड
महिला बचत गटामधील सर्व महिलांची यादी
व्यवसायाच्या जागेचा पुरावा
बचत गटाच्या बँकेची पासबुक खाते
महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचा उपयोग
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या कर्जाचा उपयोग हा छोट्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो किंवा खालील कामांसाठी देखील केला जाऊ शकतो
मशिनरी आणि उपकरणे खरेदी
कच्चा माल खरेदी
कर्मचाऱ्यांची नियुक्ती
व्यवसायासाठी भाड्याची जागा घेण्यासाठी
शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी
जाहिरातीसाठी
मार्केटिंग साठी
महिला बचत गट कर्ज योजनेसाठीचा व्याजदर
Bachat gat loan interest rate
महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत करजवरील व्याजदर ही 4 टक्के आहे
महिला बचत गट कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
Mahila Bachat Gat Loan Apply Online
महिला समृद्धी बचत गटाचा Mahila Bachat Gat Samruddhi Karj अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो
यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम जवळच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जावे लागते तिथून तुम्हाला महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला जमा करावा लागेल
त्यानंतर तुम्हाला त्याची पोच पावती घ्यावी लागेल
अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता शकता
FAQ’S
प्रश्न : महिला बचत गट कर्ज योजना mahila bachat gat Loan कोणत्या राज्यासाठी आहे?
उत्तर :- महिला बचत गट कर्ज योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
प्रश्न : महिला बचत गट कर्ज mahila bachat gat Loan योजनेअंतर्गत कोणाला मिळतो लाभ?
उत्तर :- महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
प्रश्न : महिला बचत गट कर्ज mahila bachat gat Loan योजनेत किती रुपये कर्ज मिळते?
उत्तर :- महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाखापासून 20 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते.
प्रश्न : महिला बचत गट कर्ज mahila bachat gat योजनेचा व्याजदर किती? Bachat gat loan interest rate
उत्तर :- महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेवर केवळ 4% व्याजदर आकारला जातो.
प्रश्न : महिला बचत गट mahila bachat gat समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज परतफेड कालावधी किती?
उत्तर :- या योजनेअंतर्गत कर्जाचा परतफेड कालावधी हा 3 वर्षापर्यंत आहे.
प्रश्न : महिला बचत गट mahila bachat gat समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?
उत्तर :- या योजनेअंतर्गत महिलांना 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून तर 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध होते.
प्रश्न : महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यास काय होते?
उत्तर :- कर्ज वेळेवर परतफेड केले नसल्यास तुम्हाला त्याचा दंड भरावा लागतो.
प्रश्न : महिला समृद्धी कर्ज योजनेचा कसा करावा अर्ज Apllication?
उत्तर :- महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तुमच्या जवळील जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन करावा लागेल.
प्रश्न : महिला समृद्धी कर्ज योजना अंतर्गत कर्ज रक्कम मंजूर झाल्यास किती दिवसात पैसे मिळतात?
उत्तर :- कर्ज रक्कम कर्ज रक्कम मंजूर झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत या कर्जाचे पैसे मिळतात
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA