Mahila Samman Yojana 2024 In Marathi :फक्त 2 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.5 टक्के व्याजसाहित रक्कम

Mahila Samman Yojana 2024 Information In Marathi : महिला सन्मान बचत पत्र योजना 2024 मराठी माहिती

Mahila Samman Yojana 2024 देशभरातील सर्व मुली आणि महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून 27 जून 2024 रोजी महिला सन्मान बचत पत्र  योजना सुरू करण्यात आली आहे.

Mahila Samman Bachat Patra Yojana सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकाना ही योजना लागू आहे. महिला आणि मुलींना योजनेच्या माध्यमातून सक्षम करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच महिला सन्मान बचत पत्र  योजना ही आता पोस्ट ऑफिस आणि पात्र असलेल्या शेड्युल बँक मध्ये सुरू करण्यात आली आहे. पोस्ट विभागाच्या माध्यमातून ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केली आहे. आणि 31 मार्च 2025 पर्यंत 2 वर्षासाठी ही योजना सुरू राहणार आहे.

ठळक मुद्दे

महिला सन्मान बचत पत्र योजना 2024 मराठी माहिती

Mahila Samman Yojana 2024 Information In Marathi

महिला सन्मान बचत पत्र  योजनेची थोडक्यात माहिती

Mahila Samman Bachat Patra Yojana In Short

महिला सन्मान बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये

Mahila Samman Bachat Patra Features

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे

Mahila Samman Saving Certificate Scheme Benefits

महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत ठेवी

Mahila Samman Saving Certificate Scheme

या योजनेच्या माध्यमातून मॅच्युरिटी वर पेमेंट

Mahila Samman Saving Certificate Scheme

महिला बचत पत्र योजनेतून पैसे कसे काढावे

Mahila Samman Yojana

या योजनेअंतर्गत उघडलेले खाते वेळेपूर्वी बंद करता येते का

Mahila Samman Yojana 2024

महिला सन्मान पत्र योजनेची पात्रता

Mahila Samman Bachat Patra Eligibility

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Mahila Samman Yojana Documents

महिला सन्मान बचत पत्र योजनेची अर्ज प्रक्रिया

Mahila Samman Saving Certificate Scheme Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महिला सन्मान बचत पत्र  योजनेची थोडक्यात माहिती

Mahila Samman Bachat Patra Yojana In Short

योजनेचे नावमहिला सन्मान बचत पत्र  योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू केली1 एप्रिल 2023
लाभार्थीदेशातील महिला व मुली
ठेवीवरील व्याज7.5 टक्के
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Mahila Samman Yojana

महिला सन्मान बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये

Mahila Samman Bachat Patra Features

  • देशातील सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय देते.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला आणि मुलींना 31 मार्च 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी 2 वर्षाच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल.
  • MSSC च्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवीवर 7.5 टक्के वार्षिक व्याज असेल जे तिमाही चक्रवाढ होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून किमान 1 हजार रुपये आणि 100 च्या पटीत कोणतीही रक्कम 2 लाखाच्या कमाल मर्यादेत जमा करता येते.
  • या योजनेच्या माध्यमातून खाते उघडल्यावर योजनेतील गुंतवणुकीची परिपक्वता ही खाते उघडल्यापासून च्या तारखेपासून 2 वर्षा ची आहे.
  • ही केवळ गुंतवणूकच नव्हे तर या योजनेच्या कालावधी दरम्यान अंशिक पैसे काढण्यासाठी देखील पर्याय दिला आहे. खातेदार व्यक्ती योजनेच्या खात्यातील पात्र शिल्लकीपैकी जास्तीत जास्त 40 टक्के रक्कम काढू शकतो.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे

Mahila Samman Saving Certificate Scheme Benefits

  • या योजनेच्या माध्यमातून देशातील महिला आणि मुलींना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय देण्यात आला आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतचे कमाल मर्यादेसह गुंतवणूक करता येते. तसेच मध्ये आवश्यकता पडल्यास तुमच्या ठेवीतील रकमेच्या 40% रक्कमही तुम्हाला काढता येते. या रकमेवर ती माहीत 7.5 टक्के व्याज दिले जाते.
  • महिला बचत पत्र  योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे
  • या योजनेच्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवीवर तिमाही चक्रवाढ व्याज दिले जाईल जे थेट महिलेच्या खात्यात जमा करण्यात येईल.

महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत ठेवी

Mahila Samman Saving Certificate Scheme

या योजनेच्या माध्यमातून एखादी व्यक्ती रक्कम जमा करण्यासाठी अधिक खाते उघडू शकते. मात्र सध्याचे खाते आणि नवीन खाते उघडण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या माध्यमातून किमान 1000 रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र त्यानंतर इतर रक्कम जमा करण्याची परवानगी या खात्यात नाही.

या योजनेच्या माध्यमातून खात्यात 2 लाख रुपयांची जमा करण्याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खातेदार आपल्या खात्यावर 2 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करू शकत नाही.

या योजनेच्या माध्यमातून मॅच्युरिटी वर पेमेंट

Mahila Samman Saving Certificate Scheme

या योजनेच्या माध्यमातून ठेवलेल्या तारखेपासून 2 वर्ष पूर्ण झाल्यावर ठेव रक्कम परिपक्व होईल. त्यानंतर मुदतपूर्तीवर खातेदाराला पात्र शिल्लक रक्कम दिली जाईल.

या योजनेच्या माध्यमातून मॅच्युरिटी व्हॅल्यू ची गणना करताना रुपयाच्या अपूर्ण अंकातील रक्कम जवळच्या रुपयांमध्ये पूर्ण केली जाईल. या उद्देशासाठी 50 पैसे किंवा त्या हून अधिक रक्कम 1 रुपया मानली जाईल तसेच 50 पैशापेक्षा कमी रक्कम दुर्लक्षित करण्यात येईल.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

अग्निपथ योजना

महाडीबीटी शेतकरी योजना

प्रधानमंत्री रोजगार योजना

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना

महिला बचत पत्र योजनेतून पैसे कसे काढावे

Mahila Samman Yojana

खातेदार मुलगी, महिला खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्ष झाल्यानंतर खात्यात पात्र शिल्लकीच्या जास्तीत जास्त 40% रक्कम काढू शकते.

Mahila Samman Yojana या योजनेच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकांनी खाते उघडले असेल तर त्यांना खात्यातून पैसे काढण्यासाठी पालक लेखा कार्यालयाचे पत्र  सादर करून अल्पवयीन मुलीच्या खात्यातून अर्ज करून पैसे काढू शकतात.

Mahila Samman Yojana या खात्यातून पैसे काढण्याची गणना 1 रुपयाच्या अपूर्ण अंकातील रक्कम अपूर्णकांतील रक्कम जवळच्या रुपयांमध्ये पूर्ण केली जाईल आणि या उद्देशासाठी 50 पैसे किंवा त्याहून अधिक रक्कम 1 रुपया मानली जाईल 50 पैसे पेक्षा कमी रक्कम दुर्लक्षित करण्यात येईल.

Mahila Samman Yojana

या योजनेअंतर्गत उघडलेले खाते वेळेपूर्वी बंद करता येते का

Mahila Samman Yojana 2024

Mahila Samman Yojana या योजनेअंतर्गत उघडलेले खाते मॅच्युरिटी पूर्वी बंद केले जाणार नाही मात्र काही अपवाद वगळता ते खालील प्रमाणे

खातेदाराच्या मृत्यूनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

खातेदाराच्या जीवघेणा आजारासाठी वैद्यकीय मदत किंवा पालकाचा मृत्यू यासारख्या अत्यंत सहानुभूतीच्या कारणामुळे खाते चालवण्यासाठी सक्षम असलेलं किंवा खाते चालू ठेवण्यासाठी त्रास होत असल्यास खातेदार पूर्ण कागदपत्रासह ऑर्डर द्वारे लिखित स्वरूपात नोंदवल्या जाणाऱ्या कारणासाठी खाते अकाली बंद करण्याची परवानगी दिली जाते.

हे खाते मुदतपूर्व बंद केल्यास मूळ रकमेवरील व्याज हे संबंधित खात्यामध्ये या योजनेच्या दरानुसार जमा केले जाईल.

खाते उघडल्याच्या तारखेपासून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर खाते बंद केले असेल तर शिल्लक राहिलेली रक्कम 2 टक्के व्याजदराने खातेदारास परत दिली जाते.

मॅच्युरिटी रकमेची गणना करताना 1 रुपयाच्या अपूर्ण अंकातील कोणती रक्कम रुपये मानली जाते किंवा 50 पैशा पेक्षा कमी असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

महिला सन्मान पत्र योजनेची पात्रता

Mahila Samman Bachat Patra Eligibility

  • अर्जदार महिला मुली भारताच्या नागरिक असणे आवश्यक आहे.
  • पोस्ट ऑफिस ची ही योजना केवळ महिला आणि मुलींसाठीच आहे.
  • पुरुष या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
  • या योजनेसाठी देशातील कोणतीही मुलगी किंवा महिला अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • अल्पवयीन मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी पालक पुढाकार घेऊन खाते उघडे शकतात.
  • या योजनेसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही सर्व वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Mahila Samman Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

वयाचा पुरावा म्हणून जन्म पत्र  किंवा शाळेची टीसी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जमा रक्कम किंवा चेकसह पे इन स्लिप

महिलेची ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे वैध मानले जातील

पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन

मतदान ओळखपत्र

नरेगा द्वारे दिलेले जॉब कार्ड

राज्य सरकारच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी असलेले ही नाव आणि पत्त्याच्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी द्वारे जारी केलेले पत्र

Mahila Samman Yojana

महिला सन्मान बचत पत्र योजनेची अर्ज प्रक्रिया

Mahila Samman Saving Certificate Scheme Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला जवळच्या पोस्ट ऑफिस निवड झालेल्या बँकेला भेट द्यावी.

पोस्ट ऑफिस कार्यालयातून तुम्ही या योजनेचा अर्ज घेऊ शकता. तसेच ऑनलाइन पद्धतीने ही  अधिकृत वेबसाईटवरून या योजनेसाठीचा अर्ज डाऊनलोड करता येतो.

त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा आणि त्यासोबत मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा.

त्यानंतर घोषणा आणि नामांकन तपशील अर्जावर भरा त्यानंतर तुम्ही गुंतवणूक/ ठेवीच्या सुरुवातीच्या रकमेसह अर्ज जमा करू शकता.

महिला सन्मान बचत पत्र  योजनेतील गुंतवणुकीचा पुरावा म्हणून तुम्हाला एक पत्र  देण्यात येईल.

महत्त्वाची सूचना : महिला सन्मान बचत पत्र  योजनेच्या माध्यमातून खाते उघडण्यासाठी महिला स्वतःसाठी आणि अल्पवयीन मुलीच्या वतीने पालक या योजनेसाठी 31 मार्च 2025 पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: महिला सन्मान बचत पत्र Mahila Samman Bachat Patra योजना म्हणजे काय?

उत्तर: केंद्र सरकारने 2 वर्षाच्या परिपक्वता कालावधीसह महिलांसाठी सुरू केलेली ही एक लहान बचत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला किंवा मुलीचे पालक खाते उघडू शकतात आणि या खात्यात जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेच्या परिपक्वतेनंतर महिला किंवा मुलीला 2 लाख 32 हजार रुपये रक्कम व्याजासह परत केली जाते.

प्रश्न: महिला सन्मान बचत पत्र Mahila Samman Bachat Patra योजना व्याजदर किती?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून ठेवीवर 7.5 टक्के वार्षिक व्याजदर दिले जाते. ते प्रत्येक तीमाहित संबंधित बँक खात्यात जमा करण्यात येते आणि खाते बंद करताना दिले जाते.

प्रश्न: महिला सन्मान बचत पत्र Mahila Samman Bachat Patra योजनेतून कोण खाते उघडू शकते?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक महिला आणि अल्पवयीन मुलीच्या वतीने पालक हे खाते उघडू शकते आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न: महिला सन्मान बचत पत्र Mahila Samman Bachat Patra योजनेचा फायदा काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून महिलांना 2 वर्षाच्या कालावधीनंतर एक रक्कम ठेवीवर 7.5 टक्के व्याजदर दिला जातो.

प्रश्न: महिला सन्मान पत्र Mahila Samman Bachat Patra योजनेचे खाते कुठे उघडावे?

उत्तर: देशातील महिला जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन किंवा सरकारी निश्चित केलेल्या बँकेत जाऊन खाते उघडू शकतात.

प्रश्न: Mahila Samman Bachat Patra Yojana या योजनेसाठी गुंतवणूक कालावधी काय आहे?

उत्तर: महिला सन्मान बचत पत्र  योजना 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न: Mahila Samman Bachat Patra Yojana या योजनेच्या माध्यमातून किमान आणि कमाल किती गुंतवणुकीला परवानगी आहे?

उत्तर: महिला सन्मान बचत पत्र  योजनेच्या माध्यमातून किमान 1 हजार रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे तर एका खात्यातील रक्कम ठेव 2 लाख रुपये इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

प्रश्न: खाते परिपक्वता कधी होते?

उत्तर: खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षानंतर खाते परिपक्व होते?

प्रश्न: महिला सन्मान बचत पत्र Mahila Samman Yojana योजनेचे खाते मुदतीपूर्व बंद करता येते?

उत्तर: संबंधित खातेदार काही परिस्थितीमध्ये दोन वर्षांपूर्वी आपले खाते बंद करू शकतात अशा परिस्थितीमध्ये ठेवीवर 2 टक्के व्याजदराने रक्कम परत दिली जाते. मुदतपूर्व खाते बंद करण्यासाठी खातेदाराचा मृत्यू किंवा अत्यंत अनुकंपा कारणाचा समावेश आहे.

प्रश्न: मुदतपूर्व या योजनेतून पैसे काढता येतात?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर शिल्लक रकमेपैकी 40% रक्कम काढता येते.

प्रश्न: Mahila Samman Yojana  या योजनेअंतर्गत मुदतपूर्वी कधी खाते बंद करता येते?

उत्तर: खालील कारणाशिवाय मॅच्युरिटी वर होण्यापूर्वी बंद केले जाणार नाही

खातेदाराच्या मृत्यूनंतर : पोस्ट ऑफिस किंवा बँक याची खात्री करून खाते बंद करू शकते. खातेदाराच्या जीवघेणे आजारामध्ये वैद्यकीय मदत किंवा पालकाचा मृत्यू यासारख्या कारणामुळे खाते चालवणे त्रासदायक होत असल्यास खाते बंद करण्याची परवानगी दिली जाते.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA