Mahur Devi Information In Marathi : माहुर देवीची माहिती
Mahur Devi Information In Marathi : माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे.
Mahur Devi Information In Marathi माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Mahur Devi Information In Marathi एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले . शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला . ऋषीकडे कामधेनू कशाला हवी ? ती माझ्यासारख्या पराक्रमी राजाकडेच अधिक शोभून दिसेल , असे सांगत त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला . आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली . नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला . तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘ इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर ‘ असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो दु : खी होऊन शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल . फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘ मातापूर ‘ म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ ऊर ‘ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले .
मंदिराची रचना
Mahur Devi Information प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते . या परिसरात रेणुकामाता , दत्तात्रेय , अनसूयामाता या तीन डोंगरावर असलेल्या मंदिरांना जोडणारा माहूरचा डोंगरकिल्ला एकेकाळी सत्तेचे केंद्र होता. एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू , सहा मैलाचा परिसर व्यापणारी तटबंदी आज मात्र उपेक्षित राहिली आहे . आजही ‘ हत्तीदरवाजा ‘, किल्ल्यावरचे प्रचंड तळे ( ब्रह्माकुंड ), कारंजी , हौद यांचे अवशेष असलेला ‘ चिनी महाल ‘ मध्ययुगीन वैभवाची साक्ष देतो .
१४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा या परिसरातली मंदिरे , तीर्थस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली होती . पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला . रेणुकेचे मंदिर लहानसे असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजावर नगारखाना आहे. प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे . अलीकडे दर्शनाच्या सोयीसाठी या वास्तूत काही बदल करण्यात आले आहेत . या सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणा-या महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत .
मूर्ती
Mahur Devi Information In Marathi अन्य शक्तीपीठात देवीच्या मूर्ती असताना माहूरला रेणुकामातेचा तांदळा का पूजला जातो याच्या अनेक पुराणकथा व दंतकथा प्रचलित आहेत .सभामंडपवजा मंदिरात ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे . देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे .पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
Mahur Devi Information माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. ‘स्थानपेथी’च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७ मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०’ X१२’ या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
मंदिरातील काही महत्त्वाचे उत्सव
Mahur Devi Information देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवितात. नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीच्या काळात आणि एरव्हीही दागिन्यांनी नटलेली असते. Mahur Devi Information In Marathi
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती