Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा
Marathi Bodhkatha लहानपणीपासून आपल्याला घरातील मोठी माणसे आपण खरे बोलावे असे शिकवत आली आहे. त्यामुळे आपल्याकडून एखादी छोटी मोठी चूक झाली तरी आपण घाबरून न जाता खरे काय आहे तेच बोलले पाहिजे.
Marathi Goshti कारण खरे बोलण्याची बक्षीस आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळत असते हाच बोध देणारी कथा आज आपण पाहणार आहोत कथेचे नाव आहे खरे बोलण्याची बक्षीस.. या कथेमध्ये आपण हत्ती आणि सशाची गोष्ट पाहणार आहोत.
खरे बोलल्याचे बक्षीस
khare bolalyache bakshis
Marathi Bodhkatha
Marathi Katha एक होतं जंगल या जंगलात एका झाडाखाली दोन पिटुकले ससे राहत होते. एकाचे नाव होते ‘कापशा’ दुसऱ्याचे नाव होते ‘भुरक्या’. कापशा आणि भुरक्याची जोडी नेहमी एकत्र खेळायची, एकत्र खायची आणि एकत्रच फिरायची सुद्धा.
एक दिवस काय झालं ही जोडगोळी अशीच जंगलाच्या एका वाटेनं फिरत असताना अचानक एक नारळ त्यांच्यापुढे थांबल दोघांना आश्चर्य झाले. प्रथम तर दोघांनाही मोठी भीतीच वाटली. झालेला आवाज ऐकला आणि त्यांची छाती भीतीने घाबरून धडधडायला लागली. त्यांनी आवाजाच्या रोखाने पाहिले त्यांना एक वस्तू पडलेली दिसली. काय बरं होतं ते तो होता नारळीच्या उंच झाडावरून खाली पडलेला नारळ.
भुरश्या म्हणाला चल काय आहे ते पाहूया. कापसाची छाती अजून धडधडत होती तो म्हणाला नको बाबा मला भीती वाटते. भुरश्या म्हणाला अरे त्यात भीण्यासारखे काय आहे बघुया तर खरं काय आहे ते. असं बोलून ते दोघं मोठ्या धिटाईने त्या वस्तू जवळ आले त्यांनी पाहिलं तर तो एक नारळ होता तेवढ्यातच भुरश्याला काय वाटलं कुणास ठाऊक त्याने पुढे जाऊन त्या नारळाला जोरात लाथ मारली. त्याबरोबर तो नारळ घरंगळत पुढे गेला.
Marathi Bodhkatha एका पैशाची चूक
नारळ रांगत पुढे जाताना पाहून कापशालाही मजा वाटली आनंदाने टाळ्या वाजवत आता तोही पुढे सरसावला त्याने पण त्या नारळ लाथ मारली. नारळ अजून पुढे गेला त्यांना खूप मजा वाटली. मग काय विचारता पाहता पाहता त्यांच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळाली.
मग त्या नारळाला मारीत मारीत पुढे न्यायचं हा त्यांचा खेळ झाला. अगदी मजेशीर खेळ खेळता खेळता भुरश्याने त्या नारळाला अशी काही जोरात लाथ मारली नारळ उंच आकाशात उडाला आणि खाली जाऊन आदळतो हत्तीच्या डोक्यावर त्याबरोबर तो हत्ती खूप चिडला रागावला आणि विचारू लागला “कोण आहे, कोणी मला नारळ मारलं”.
हत्तीचा आवाज ऐकून दोघेही ससे खूप घाबरले. मग आता काय करायचं आपण तर एवढे छोटे आणि हा हत्ती मात्र फार मोठा अगडबम. त्याच्यापुढे आपल्या कसा टिकाव लागणार. हे दोघेही भीतीने थरथरू लागली. हत्ती चार पावले पुढे आला आणि त्याने परत तोच प्रश्न केला “कोण आहे, कोणी मला नारळ मारलं”. जो असेल त्याने माझ्यासमोर या बघतो.
रागावलेल्या हत्तीचे बोलणे एकूण आता काय करायचं अस म्हणत दोघे ससे एकमेकांकडे पाहू लागले. मला वाटतं आपण सरळ पुढे जाऊन हत्तीला सांगू या की तुला कोणी मारला ते आम्हाला काही माहीत नाही रे बाबा. दुसरा म्हणाला म्हणजे दादा आपण हत्तीशी खोटं बोलायचं? आईने तर आपल्याला शिकवले आहे की खोटं कधी बोलू नये.
कापश्याच ते बोलणे ऐकून भुरश्या म्हणाला अरे पण म्हणून काय खरं खरं सांगायचं. अरे बाबा जरा विचार तरी कर आपण केवढे तो हत्ती केवढा. दोघंही विचारात पडली नेमकं काय करायचं त्या दोघांना वाटायला लागलं की आता आपलं काही खरं नाही.
काय करायचं? काय करायचं? मागे निघून जायचं का आम्हाला काही माहीत नाही तो नारळ कोणी मारला असं खोटं खोटं सांगून टाकायचं. कापशा म्हणाला नको खोट बोलण्यापेक्षा खरच बोललेलं बरं! मग काय होईल ते होवो.
बरं ठिक आहे तु म्हणतोस तसं करू असं म्हणून ते दोघे पुढे गेले आणि म्हणाले रागावू नका आम्ही खरंच सांगतो आम्ही नारळ तुम्हाला मुद्दाम मारला नाही आम्ही खेळताना आमच्याकडून तो नारळ तुम्हाला लागला आम्ही खरंच सांगतो आमची चूक झाली हो..
कृपया तुम्ही आम्हाला क्षमा करा ना. ते दोन्ही तसे विनवणी करत असतानाही गजराज मात्र पुढे आले ते पाहून भुरश्या आणि कापशा ते दोघे भीतीने मागे सरकत होते. एक एक पाऊल पुढे पुढे टाकीत हत्ती त्यांच्या जवळ येऊ लागला.
हत्तीने आपला एक पाय वर उचलला आता हा रागावलेला हत्ती त्याच्या पायाखाली आपल्याला चीरडणार म्हणून दोघांनी दाबून घट्ट डोळे मिटले. दोघे थरथर कापू लागले तोच पुन्हा आवाज झाला
तो आवाज होता त्या हत्तीचा. त्याने पुढे येऊन फोडलेल्या नारळाचा तुकडा त्यांना दिला. हत्ती त्यांना म्हणाला मित्रांनो घाबरू नका भिऊ नका असे पुढे या. या माझ्या समोर या.
तुम्ही खरे बोलण्याचे धाडस दाखवलं ना त्याबद्दल हे घ्या तुमचं बक्षीस असे म्हणून हत्तीने पायाने फोडलेल्या नारळाचे गोड गोड खोबरे या दोघांना खाऊ म्हणून दिले.
गजराज यांनी दिलेले ते गोड गोड खोबरे खाऊन पिटुकले भुरश्या आणि कापसा हे दोघे ससुरे आनंदाने नाचू लागले कथा बोध आहे नेहमी खरे बोलावे. Marathi Bodhkatha
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA