Marathi Bodhkatha Khot Bolu Naye : खोटं बोलू नये

Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा

Marathi Bodhkatha आपल्याला घरचे आपल्याला नेहमी म्हणतात खोटं बोलू नये. कोणतीही गोष्ट घडली ती खरी काय घडली ती सांगावी. खोटं बोलल्याने वाईट परिणाम होतात.

Marathi katha खोटं बोलण्याची सवय चांगली नाही. असे अनेकदा आपल्या घरचे आपल्याला समजावून सांगत असतात. खरंच आपण खोटं बोलावे का? तर नाही आपण खोटं बोलू नये.

Marathi katha आज आपण अशीच एक कथा या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या कथेचं नाव आहे खोटं बोलणार नाही. चला तर मग करूया सुरुवात या लेखाला. बघूया आज या लेखातुन संजू खरं बोलतो की खोटं… Marathi Goshti

खोटं बोलू नये

Khot Bolu Naye

Marathi Goshti घंटा वाजली, शाळा सुटली सर्व मुले धावपळीने आपापल्या घरी निघाली. संजू देखील पटकन शाळेतून बाहेर पडला. त्याला असं झालं होतं की मी कधी एकदा घरी पोहोचतो आणि आईला पाटी दाखवतो.

आज बाईंनी वर्गात मुलांना काही गणित करायला दिली होती. संजुची सर्वच्या सर्व गणित बरोबर आली होती. बाईंनी त्याच्या पाटी वर छान असा शेरा दिला होता. आपल्याला मिळालेला छान हा शेरा त्याला त्याच्या आईला दाखवायचा होता आणि म्हणूनच तो शेरा मिटला जाऊ नये म्हणून त्याने पाटी दप्तरात न ठेवता ती आपल्या हातात ठेवली होती.

कधी एकदा घरी जातो आणि ती पाटी आईला दाखवतो असं त्याला झालं होतं. तो घाईघाईने घरी निघाला होता. पण अचानक त्याला ठेच लागली. “आई ग” त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर आला आणि तो खाली पडला.

त्याबरोबर त्याच्या हातातली पाटी ही खाली पडली आणि खळकन फुटली. जी पाटी त्याला कौतुकाने आईला दाखवायची होती तीच फुटली म्हटल्यावर त्याला फार वाईट वाटलं.

आता आपण आईला काय दाखवणार. त्याला ठेच लागून संजू खाली पडला, त्याला लागलं, त्याचे कपडेही मिळाले पण त्या कशाचच त्याला काहीच वाटत नव्हतं पाटी फुटली याच मात्र संजूला खूप वाईट वाटत होतं. तो सारखा रडत होता.

शेजारी राहणाऱ्या राधा काकुनी संजूला रस्त्यात रडताना पाहिले. त्या त्याच्या जवळ आल्या त्यांनी संजू च्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत विचारले काय झालं. तेव्हा स्वतःला सावरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत तो म्हणाला काकू मी रस्त्यात ठेच लागून पडलो. माझी पाटी फुटली आहे. आता आई मला रागवेल. तिने परवाच मला नवी पाटी आणून दिली होती.

मग त्यावर राधा काकू म्हणाल्या अरे येवढच ना! मग आईला सांग मी नीट घरी येत होतो पण रस्त्यात एक दांडगा भेटला मी खाली पडलो आणि माझी पाटी फुटली.

राधा काकूंचा तो सल्ला ऐकून संजू म्हणाला काकू म्हणजे मी आता आईशी खोटं बोलू. अरे संजू पण तु जर खरं सांगितलं तर आई तुला रागावेल, बोलेल, कदाचित मार सुद्धा देईल बरं. मग काय करशील?

राधा काकुनि विचारलं त्यावर काहीशा निश्चयाने संजु म्हणाला, “नाही काकू” मी माझ्या आईशी खोटं बोलणार नाही” मग जे व्हायचे ते होऊ दे. रागावू दे नाहीतर मारू दे. आपलं मत ठामपणे आणि स्पष्टपणे संजुनी सांगितलं.

डोळे पुसले आणि ती फुटकी पाटी दप्तरात घालून तो घरी परतला. घरी येताच संजूने आईला झालेला सगळा प्रकार सांगितला. आई म्हणाली संजु जाऊ दे, फुटू दे पती पण तुला तर कुठे जास्त लागलं नाही ना बाळा.

संजू हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव नेहमी खाली नीट बघून चालावं. अग आई बाईने दिलेला शेरा, माझी सगळे गणित तुला दाखवायचे होते ना! संजू रडवलेल्या चेहऱ्याने म्हणाला.

अरे संजू तू सांगितलेस ना मला मग झालं तर, त्याला अधिक पुराव्यांची काय गरज आहे बरं. अरे बाळा माझा तेवढा विश्वास आहे बरं का तुझ्यावर आई म्हणाली.

त्या दोघांचं हे बोलणं चालू असतानाच राधा काकू आल्या. त्या संजू च्या आईला म्हणाल्या खरंच तुमचा संजू मोठा हुशार. मी त्याची परीक्षा घेत होते. पण त्यात त्याने मात्र निक्षून सांगितलं की मी काही खोटं बोलणार नाही. तू त्याच्यावर चांगले संस्कार केले आहे.

राधा काकू तसं बोलून निघून गेल्या आणि आईने संजूला प्रेमाने आपल्या जवळ घेतले. मुलांनो या कथेचा बोध काय तर खोट बोलू नये.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

खरे बोलल्याचे बक्षीस

 एका पैशाची चूक

संधी सोडू नका

सातत्याचा पाठ

‘मी’ चा त्‍याग