Marathi Bodhkatha Sandhi Sodu Naka : संधी सोडू नका

Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा

Marathi Bodhkatha : आपल्याला आयुष्यात अनेक संधी येतात. अगदी कधी कधी तर पावलो पावली संधी आपल्याला येतात पण आपण त्या संधीचा फायदा घेत नाहीत किंवा आपल्याला कधी कधी कळत देखील नाही की हीच आपल्यासमोर एक संधी आली आहे तिचा आपण फायदा करून घेऊया.

Marathi Goshti : अशीच एक गोष्ट आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे संधी सोडू नका. जर संधी सोडली तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण या कथेतून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया कथेला… marathi katha

संधी सोडू नका

Sandhi Sodu Naka

marathi katha : एकदा एक आजोबा मुलांना गोष्ट सांगत होते . जीवनामध्ये जर आपला उत्कर्ष व्हावा, विकास व्हावा, आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने सतर्क राहावे लागते. आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं कराव लागत नाहीतर त्या दुर्दैवी माणसासारखं होतं बरंका ! आजोबा मुलांना सांगत होते.

आजोबा कोण तो दुर्दैवी माणूस काय झालं आम्हाला सांगा ना त्याची गोष्ट मुलांनी आजोबांकडे आग्रह धरला. त्यावर आजोबा म्हणाले अरे हो हो थांबा थांबा सांगतो नीट लक्ष देऊन ऐका. असं म्हणून आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

एक गाव होत. त्या गावात एक देऊळ होत. त्या मंदिराचा एक पुजारी होता. त्याचं नाव ‘इच्छाराम’. इच्छाराम देवळातल्या देवाची पूजा-अर्चा करायचा गावात चार घरी पंचांग सांगायला जायचा. मिळेल ते खायचा आणि आनंदाने मंदिराच्या गाभाऱ्यात राहायचा त्याचा त्याच्या देवावर फार मोठा विश्वास होता. आपलं भले बुरे जे काही होणार आहेत ते या देवामुळे, असं त्याला वाटत असे.

Marathi Bodhkatha

खरे बोलल्याचे बक्षीस

 एका पैशाची चूक

एकदा काय झालं गावात सतत आठ दिवस पाऊस पडला. नदीला पूर आला लोकांच्या घराघरात पाणी शिरलं, काही लोकांचे संसार बुडाले काहीचे तर घर वाहून गेले, जो तो आसरा सोडण्यासाठी दुसऱ्या गावाकडे जाऊ लागला.

लोकांनी इच्छारामाला ते गाव सोडून दूर जाण्याबद्दल आग्रह केला पण च्छे इच्छाराम काही गाव सोडून जायला तयार होईना. तो म्हणायचा नको नाहीयेत मी तुम्ही जा माझा देव माझं नक्कीच रक्षण करील. लोक निघून गेले.

नदीचा पूल हळूहळू वाढूच लागला. एक पट्टीचा पोहोणारा इच्छारामाच्या जवळ आला आणि म्हणाला अहो ‘पुजारी बुवा’ चला मी नेतो तुम्हाला सुरक्षित. नको नको देव माझी काळजी घेईल असे पुजाऱ्याने त्याला उत्तर दिले.

पुजारी म्हणजे कोण मुलांनो इच्छाराम ! पुराचे पाणी वाढतच होते. तोच एक छोटीशी नाव पुजाऱ्याला पाण्याच्या प्रवाहातून वहात त्याच्या दिशेने येताना दिसली. तरीही त्याने त्या नावेत बसून स्वतः सुरक्षित जागी नेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. पुढच्या वेळी मात्र पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा आला ना तो पाण्याचा लोंढा आपल्यासोबतच इच्छारामला घेऊन गेला.

पोहता न येणारा इच्छाराम, अखेर नाकातोंडात पाणी गेले आणि मेला. स्वर्गात गेल्यावर इच्छाराम देवांशी भांडू लागला, देवा मी तुझी इतकी सेवा केली पूजा केली तू माझी रक्षा करशील म्हणून तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवला पण तू मात्र माझा विश्वासघात केलास रे! माझा मदत केली नाहीस देवा तू असं का केलंस रे.

त्यावर देव म्हणाला ‘अरे मी तुझा रक्षणाचा प्रयत्न केला नाही म्हणून मदत केली नाही हे तुझं म्हणणं अगदी चुकीचा आहे’. मी तुला स्वतःचा जीव वाचवण्याच्या दोन संधी दिल्या होत्या.

एकदा मी पोवाडा राहून तुला मदत करायला आलो परंतु ती मदत स्वीकारली नाहीस दुसऱ्यांदा मी तुझ्यासाठी नाव पाठवली तिचा उपयोग करून घेतला नाहीस. मी तुला एक एक संधी देत होतो पण तू त्या घेतल्या नाहीस त्याला मी काय करू बरं.

देवाच हे बोलण ऐकलं आणि मग मात्र इच्छारामाला त्याची चूक कळली. संधी येते आपण त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो हे त्याला कळलं.पण कधी ‘मेल्यावर’ त्याचा काय उपयोग नाही का. आजोबांनी ते सांगत असलेली गोष्ट तिथे थांबवली आणि त्यांनी एकटक नजरेने मुलांकडे पाहिलं.

तेव्हा मुलं म्हणाले आजोबा तुमचा या गोष्टीचं तात्पर्य या गोष्टीचा बोध आलाय बर का आमच्या लक्षात आणि तेवढ्यात छोटासा चिंटू पटकन उठला आणि जोरात म्हणाला ‘आजोबा कथेचा बोध आहे संधी वाया जाऊ देऊ नका ती पुन्हा पुन्हा येत नाही’.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA