Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा
Marathi Bodhkatha : ससा आणि कासव यांच्यातील गोष्ट आपण लहान असल्यापासून ऐकत आलो आहोत. आजच्या या गोष्टीमध्ये स्वतःच्या अति आत्मविश्वासामुळे ससा कसा हरतो हे आपण पाहणार आहोत.
Marathi goshti : मात्र सातत्य ठेवल्याने आपल्या कामात आपण कसे यशस्वी होतो हे या गोष्टीतून कासव आपल्याला सांगणार आहे.
marathi katha : त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना आपण सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण सातत्य ठेवले तरच आपण यशस्वी होऊ शकतो. चला तर मग आज आपण ऐकूया ससा आणि कासवाची आगळीवेगळी गोष्ट..
सातत्याचा पाठ
Satatyacha Path
marathi katha : एक गाव होते. त्या गावात एक खळखळ वाहणारी नदी होती. त्या नदीच्या काठावर दोन मित्र राहत होते. एक होता नदीकाठच्या झुडपात राहणारा ससा आणि दुसरं होतं नदीत राहणार कासव.
या दोघांची खूप छान मैत्री होती. सकाळ झाली की नदीतल कासव काठावर यायचं आणि आपल्या मित्राला हाक मारायच “ससुल्या भाऊ, ससुल्या भाऊ” ये मी आलोय. मग काय ती मित्राची हाक ऐकली की ससोबा उड्या मारत त्या झुडपातून बाहेर यायचं.
धावत धावत मित्रा जवळ जायचं. ससोबा आपल्या मित्रासाठी खाऊ सुद्धा घेऊन यायचं बर का, मग दोघं मिळून खाऊ खायचे, गप्पा मारायचे, नदीकाठच्या गवतावर मजेत लढायचे, छान गप्पा गोष्टी करायचे, मनसोक्त खेळून झालं की मग ससोबा जायचे रानात तर कासव सूर मारायचे पाण्यात.
एकदा काय झालं ससा कासवला म्हणाला मित्रा आज आपण काहीतरी गमतीदार खेळ खेळूया. चालेल कासव म्हणाले हो चालेल पण काय खेळायचं? थोडे डोके खाजवून ससा कासवा ला म्हणाला चल आपण दोघे एक शर्यत लावू या.
ससोबाची ती कल्पना ऐकली आणि बिचारे कासव विचारात पडले धावण्याची शर्यत आपल्याला कसं दाखवता येईल पण नाही म्हणता येईना, शेवटी नाईलाजाने बिचारा हो म्हणाला दोघांनी मिळून झाडावरच्या पोपटाला साक्षीदार बनवलं त्याला म्हणाला दादा मी आणि कासव आम्ही दोघं त्या समोरच्या झाडापर्यंत पळत जाणार आहोत तू आमचा साक्षीदार !
तू सांगायचं की आमच्या पैकी कोण त्या झाडापाशी आधी जाईल आणि कोण शर्यत जिंकली ते. पोपट हो म्हणला. जागा ठरली ससा आणि कासव हे दोघेही त्या जागेजवळ येऊन उभे राहिले. पोपटाने शिट्टी वाजवत आता ससा वेगाने धावत सुटला.
त्याने मागे वळून पाहिलं बर का काही वेळातच ससा इतका पुढे गेला की, जवळजवळ झाडाजवळ गेला. आता अगदी थोडं सशाने एकदा मागे वळून पाहिलं तर काय बिचारे कासव ते तर अजून त्या झाडापासून बरेच दूर होते. त्याने अजून निम्मे अंतर पार केले नव्हते ते बिचारे हळूहळू हळूहळू एका वेगळ्याच विचाराने पुढे पुढे येत होते.
ससोबा ने एकदा त्या दूर असणाऱ्या कासवकडे एकदा त्या जवळच्या झाडाकडे पाहिले. ससोबा आपल्या लक्षाचा फार जवळ पोहोचला होता.
त्याने विचार केला कसं तर अजून बरेच लांब आहे तोपर्यंत आपण जरा थांबू मग पुढे झेप घेऊ. विश्रांती घेण्यासाठी म्हणून थांबला.
कासव मात्र हळूहळू पण सातत्याने चालतच राहील. प्रयत्न केले आणि ते ससा जिथे होता त्या जागेपर्यंत त्याने एक वार चारी बाजूला नजर टाकली.
ससा दिसला नाही त्याच्या मनात असा विचार आला की आपण आता खूप दमलो होतो जरा थांबावं थोडा आराम करावा.
पण त्याने तो विचार झटकून टाकला. काही झाले तरी मला त्या झाडापर्यंत गेलेच पाहिजे. आपले सातत्य कायम राखत त्यानी आपली झाडाच्या दिशेने वाटचाल पुढे चालू ठेवली.
त्याचा परिणाम असा झाला की, ते कासव सशाच्या आधी त्या झाडापाशी येऊन पोहोचलं. कासवाला झाडापाशी आलेलं पाहून पोपटाने शिट्टी वाजविली.
तो शिट्टीचा आवाज ऐकला आणि तिकडे झुडपात डुलकी घेत असलेला ससा जागा झाला आणि त्या झाडाकडे धाव घेतली बर का.
तिथे येऊन पाहतो तर काय हळूहळू चालत कासव त्याच्या आधी तिथे येऊन पोहोचले. ससोबला पोपट म्हणाला सासोब शर्यत कासव दादा ने जिंकली.
तो निर्णय ऐकून ससा हिरमुसला आपल्याला पळता येत असूनही आपण ही शर्यत कसे हरलो आणि कासव मात्र जिंकलं
ससा असा मनात विचार करत असताना पोपट म्हणाला ससोबा, अरे खरतर या शर्यतीत तूच जिंकणार हे तर कोणीही सांगितलं असतं! परंतु पाळण्यात फार जलद असून सुद्धा ही शर्यत मात्र जिंकू शकला नाही आणि हळूहळू चालणारे कासव मात्र ही शर्यत जिंकली.
कारण काय तर कासवाने आपल्या प्रयत्नात सातत्य राखलं म्हणून ते जिंकले. मुलांनो या कथेचा बोध काय तर कोणत्याही कामात सातत्य राखावं.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA