middle class with lower than 50 thousand salary are going more dependent on credit card : 50 हजारपेक्षा कमी वेतन असणारे 93 टक्के लोक क्रेडिट कार्डवर अवलंबून
middle class with lower than 50 thousand salary are going more dependent on credit card : आत्ता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या. या सेवांचा वापर 18% स्वयंरोजगार व्यक्ती आणि 15 टक्के वेतनदार व्यक्ती करतात.
देशामध्ये एका बाजूला वेगाने यूपीआयचा वापर वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्डवर अवलंबून कमी उत्पन्न असणारे लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. एका संशोधनामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार 50 हजारापेक्षा कमी पगार असणारे जवळपास 93% पगारदार लोक क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत.
एका वर्षा दरम्यान भारतामधील 20000 पेक्षा अधिक पगारदार आणि स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार 85% स्वयंरोजगार व्यक्ती क्रेडिट कार्डवर वर अवलंबून असल्याचे समोर आले.
कमी पगार आणि गरजा अधिक?
middle class with lower than 50 thousand salary are going more dependent on credit card
आत्ता खरेदी आणि नंतर पैसे द्या.. या सेवेचा वापर 18% स्वयंरोजगार व्यक्ती आणि 15% पगारदार व्यक्ती करत आहेत. भारताच्या विकसित होणाऱ्या कर्ज प्रक्रियेमध्ये क्रेडिट कार्ड आणि बीएनपीएल आता पगारदार वर्गापासून सर्व स्तरातील लोकांपर्यंत आवश्यक झाले आहे.
या अहवालामध्ये आर्थिक प्रोद्योगिक कंपन्याचा वाढता प्रभावाचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे भारत डिजिटल कर्ज क्रांतीचे नेतृत्व करत आहे. या अहवालात म्हटले आहे की फिनटेक कंपन्या आर्थिक वर्ष 2022 23 मध्ये 92 हजार कोटी रुपये पेक्षा अधिक व्यक्तिगत कर्ज वितरित केले होते जे मात्राच्या हिशोबाने सर्व नवीन कर्जाच्या 76 टक्के आहे.
मात्र अनेकांच्या पगार कमी असतो आणि गरजा अधिक यामुळेही अनेकांना क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो अशी माहिती यामधून समोर आली आहे.
क्रेडिट कार्डने बदलले नियम
बँकेकडून क्रेडिट कार्डधारकांना पैसे परत करण्यासाठी निश्चित वेळ दिला जातो. या व्यतिरिक्त क्रेडिट कार्डवर एक लिमिटपर्यंत तुम्ही खर्च करू शकता.
त्यानंतर तुम्हाला बँकेकडून अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जातात, अशामुळे कमी उत्पन्न असणारे लोक बिल भरणे आणि शॉपिंग करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
यादरम्यान एसबीआयने क्रेडिट कार्ड धारकाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलामध्ये अमाऊंट ड्यू सोबतच प्रीमियम कार्ड वर मिळणाऱ्या फ्री इन्शुरन्स आणि पेमेंट सेटल प्रक्रियांचा समावेश आहे.