modi govt women empowerment schemes in marathi : आई, बहीण आणि मुलींसाठी मोदी सरकारच्या या 6 खास योजना
modi govt women empowerment schemes in marathi : देशात मागील काही वर्षांमध्ये मोदी सरकारने बहिणी आणि मुलीसाठी अनेक लाभकारी योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांमुळे महिलांच्या जीवनामध्ये बदल झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच प्रकारच्या मोदी सरकारने सुरू केलेल्या 6 विशेष योजना.
modi govt women empowerment schemes पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 11 वर्ष होत आहेत. या 11 वर्षांमध्ये त्यांनी अनेक जनकल्याणकारी योजना सुरू केल्या. विशेष करून आई-बहीण मुली साठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
modi govt top schemes in marathi देशभरातील कोट्यावधी महिलांना यामुळे आधार मिळाला आहे. देशांमध्ये मागील काही वर्षांमध्ये मोदी सरकारने बहीण, मुलीसाठी लाभकारी योजना सुरू केल्यामुळे महिलांचे जीवन बदलून गेले.
modi govt top 6 women schemes मोदी सरकारच्या या योजनांमधील महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली आहे.
modi govt top schemes चला मग जाणून घेऊया या अशा योजना ज्यांनी महिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांच्या पंखांना बळ दिले.
बेटी बचाव बेटी पढाव योजना
ही मोदी सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. याद्वारे देशातील मुलींचे जीवन सुधारण्यासाठी मदत मिळते. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत बाल लिंग अनुपात मध्ये सुधारणा आणि मुलींचे शिक्षणला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींप्रति सामाजिक मानसिकता मध्ये बदल घडवणे आणि त्यांना सशक्त बनवणे आहे.
उडान स्कीम
2014 मध्ये सीबीएससी उडान स्कीम ची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे इंजीनियरिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची कमी प्रवेश आणि शालेय शिक्षण व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा दरम्यान शिक्षण काळ दूर करणे आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा ची तयारी करण्यासाठी अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत व्हर्च्युअल क्लासेस आणि स्टडी मटेरियल च्या माध्यमातून मोफत ऑफलाईन आणि ऑनलाईन संसाधन देण्यात येतात.
सुकन्या समृद्धी योजना
ही एक बचत योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करणे आहे. 2015 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्ष पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीच्या नावावर बँक खाते उघडले जाते. हे खाते मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक असणाऱ्यांकडून उघडले जाऊ शकते.
एका वर्षात कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पर्यंत या खात्यामध्ये रक्कम जमा करता येते. योजनेमध्ये आकर्षक व्याजदर दिला जातो. ज्यामध्ये सरकार द्वारे सतत बदल केले जातात.
लखपती दीदी योजना
या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2023 ला करण्यात आली. या योजनेद्वारे ग्रामीण भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला.
या योजनेअंतर्गत सरकार ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध करते. याद्वारे महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि चांगले उत्पन्न मिळू शकतात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
2017 मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देणे. जानेवारी 2025 पर्यंत 3.81 कोटी महिलांना 17000 362 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला मुलाच्या जन्मा दरम्यान आर्थिक मदत देण्यात येते. पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांना 5000 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. ही रक्कम 3 टप्प्यांमध्ये लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येते.
जर दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या महिला मुलगी झाली तर एक रकमी 6000 रुपये देण्यात येतात. मात्र ही रक्कम केवळ मुलगी जन्माला आली तरच दिली जाते.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
ही मोदी सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना मधील एक आहे. विशेष म्हणजे ग्रामीण महिला त्या जीवनामध्ये या योजनेने मोठा बदल घडून आणला आहे. या योजनेअंतर्गत गरीब व ग्रामीण कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी सिलेंडर आणि कनेक्शन देण्यात येते.
या योजनेचा लाभ गावामध्ये पारंपारिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांची चुलीपासून मुक्ती होते आणि त्यांना धुराचा त्रास होत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे स्वयंपाक करताना मोठ्या प्रमाणात लाकड जळाली जातात.
त्याऐवजी एलपीजी चा वापर करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येते. या योजनेअंतर्गत BPL कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन आणि सबसिडीवर 12 सिलेंडर दिले जातात. आतापर्यंत 10 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.