Mofat Pithachi Girni Yojana 2025 In Marathi : मोफत गिरणी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

Mofat Pithachi Girni Yojana 2025 Information Marathi : असा करा अर्ज

Mofat Pithachi Girni Yojana सरकार महिलांसाठी सतत नवनवीन योजना सुरू करत असते. आर्थिकदृष्ट्या महिलांचा विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी केंद्र सरकार व राज्य सरकार सतत करत असते.

Pithachi Girni Yojana महिलांसाठी राज्य सरकारने पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. महिलांसाठी सरकार अशाच नवनवीन योजना राबवत असते. ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना सरकारने सुरू केली आहे.

या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी महिलांना मिळाली आहे.

Pithachi Girni Yojana महिलांना सक्षम करणासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. यापैकीच ही एक योजना आहे. महिलांना आर्थिक सहकार्य मिळावं यासाठी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मदत करते.

Free Flour Mill Yojana Maharashtra  राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनता यावं, महिलांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी सरकारने मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे.

या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात.

Free Flour Mill Yojana Maharashtra या योजनेचा अर्ज कसा करावा लागेल याची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

कमी गुंतवणुकीत उत्तम व्यवसाय

सरकार गिरणी खरेदीसाठी 90 टक्के अनुदान देत असते तर केवळ 10 टक्के रक्कम अर्जदार महिलेला भरावी लागते. अगदी कमी गुंतवणुकीत उत्तम व्यवसायाची संधी महिलांसाठी सरकारने सुरू केली आहे. या व्यवसायातून दररोज धान्य दळण्याच्या कामामुळे नियमित उत्पन्न मिळू शकते.

पात्रता

Mofat Pith Girni Yojana Eligibility

  • सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • अर्जदार महिला ही अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावी.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे

Mofat Pith Girni Yojana Documents

  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज प्रक्रिया

Mofat Pith Girni Yojana Apply

मोफत पिठाची गिरणी योजनेचा ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज करावा. अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी. अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी केली जाईल. त्यानंतर पात्रतेनुसार अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम ही महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.