mukhyamantri mahila rojgar yojana in marathi : मुख्यमंत्री महिला रोजगार योजना
mukhyamantri mahila rojgar yojana in marathi : नमस्कार वाचकहो, आज आपण अशा एका योजनेची माहिती पाहणार आहोत ज्या योजनेच्या माध्यमातून महिलांना 2 लाख रुपये पर्यंत सरकार मदत करते. अशी कोणती योजना आहे ही आपण आज पाहू.
mukhyamantri mahila rojgar yojana केंद्र सरकार सोबतच राज्य सरकार देखील महिलांसाठी अनेक नवनवीन योजना सुरू करते. नुकत्याच बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याआधी सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची घोषणा केली होती.
mukhyamantri mahila rojgar yojana या योजनेअंतर्गत १.५१ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता पुढचा हप्ता म्हणजे 2 लाख रुपये कधी मिळणार? असा प्रश्न महिलांना पडला आहे. याबाबत बिहार सरकारने माहिती दिली आहे.
बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी माहिती दिली आहे की, आतापर्यंत 1.51 लाख महिलांना 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे. राज्यात उपजीविका गटांची संख्या देखील 1.14 कोटी झाली आहे. ही योजना भविष्यात सुरू राहणार आहे.
Government Scheme मंत्री श्रवण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत ज्या महिलांना 10,000 रुपयांचा पहिला हप्ता वापरून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनाच पुढील हप्ता 2 लाख रुपयांचा मिळणार आहे. यादरम्यान प्रत्येक महिलेला 2 लाख रुपये मिळणार नाहीत.
व्यवसायाच्या गरजेनुसार हे पैसे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाणार आहेत. जर एखाद्या महिलेने कोणताही व्यवसाय सुरू केला त्यासाठी फक्त 50 हजार रुपये भांडवलांची गरज असेल तर तेवढेच पैसे देण्यात येतील.
Government Scheme ज्या महिलांना 2 लाख रुपयांच्या भांडवलाची गरज आहे अशा महिलांना 2 लाख रुपये दिले जातील. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा 6 महिन्यांनी सरकारला आढावा जाईल.
जर सरकारला असे दिसले की, लाभार्थी महिलेचे 10 हजार रुपये योग्य रित्या वापरले आहेत तिचा व्यवसाय उत्तम पद्धतीने सुरू आहे. तर त्यांचे उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे. त्याबाबत सरकार अहवाल तयार करेल.
त्यानंतर तुमच्या प्रस्तावाचा आढावा घेईल आणि तुमचा निधी वाढवला जाईल. ज्या महिलांना व्यवसाय वाढीसाठी जेवढे भांडवल लागेल तेवढेच भांडवल देण्यात येईल.