Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Information मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 मराठी माहिती
Mukhyamantri Vayoshri Yojana सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना वृद्ध, दिव्यांग आणि गरीब व्यक्तींसाठी असलेली एक महत्त्वाची योजना आहे. देशभरातील गरीब दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामे करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना सरकारच्या वतीने विविध साहित्यांचे मोफत वाटप केले जाते. या उपकरणाच्या वाटपामुळे त्यांना इतर व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही आणि ते आत्मनिर्भर बनतात.
Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्याधी नुसार उपयोगी पडणाऱ्या साहित्यांचे मोफत शिबिरे आयोजित केले जातात. राज्यभरातील वृद्ध व्यक्तींना वय वाढल्यामुळे चालण्यास अडचणी येतात, काहींना कमी ऐकू येते तर अनेक व्यक्ती शारीरिक दृष्ट्या अपंग असतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वतःसाठी उपयुक्त अशी साहित्य खरेदी करू शकत नाहीत अशा राज्यभरातील गरजू व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजना च्या माध्यमातून मदत केली जाते.
Vayoshri Yojana महाराष्ट्र राज्यातील वृद्ध, दिव्यांग, गरजू व्यक्तींना मदत देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येते. केंद्र सरकारही वृद्ध व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो गरजू वृद्ध व्यक्तींना अपंग दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ते आज चांगले जीवन जगत आहेत.
Vayoshri Yojana वृद्ध नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार दारिद्र्यरेषेखालील वृद्ध, निराधार व्यक्तींना, दिव्यांगांना खालील प्रमाणे साहित्यांचे वाटप करते यामध्ये व्हीलचेअर, चष्मा, फोल्डिंग वापर श्रवण यंत्र, यासह सहाय्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 3000 रुपयाची आर्थिक मदतही दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
राज्यातील 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमधून आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा Mukhyamantri Vayoshri Yojanaमुख्य उद्देश म्हणजे राज्यभरातील वृद्ध दिव्यांग नागरिकांना शारीरिक व्याधीनुसार आवश्यक असलेली साहित्य मोफत वाटप करणे हा आहे.
ठळक मुद्दे :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती
Mukhyamantri Vayoshri Yojana In Short
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे उद्दिष्टे
Mukhyamantri Vayoshri Yojana Purpose
राष्ट्रीय वयोश्री योजनेची वैशिष्ट्ये
Mukhyamantri Vayoshri Yojana Features
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी साहित्य
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिली जाणारी साहित्य
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे
Mukhyamantri Vayoshri Yojana Benefits
मुख्यमंत्री वयश्री योजनेची पात्रता
Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रसाठी आवश्यक कागदपत्रे
Mukhyamantri Vayoshri Yojana Documents
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Vayoshri Yojana Online Application
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रसाठीची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Vayoshri Yojana Offline Apply
FAQ;s
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती
Mukhyamantri Vayoshri Yojana In Short
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना |
लाभ रक्कम | 3000 |
लाभ | देशातील वृद्ध, अपंग व्यक्ती |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे उद्दिष्टे
Mukhyamantri Vayoshri Yojana Purpose
- राज्यभरातील गरीब, वृद्ध, शारीरिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेले साहित्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून त्यांना साहित्यांचे वाटप करून वृद्ध, अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेच्या माध्यमातून वृद्ध दिव्यांग नागरिकांचा सामाजिक विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा ही या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून वृद्ध आणि दिव्यांगांना आवश्यक असलेली साहित्य खरेदीसाठी पैसा लागत नाही. सरकार त्यांना मोफत उपकरणे देत असल्यामुळे त्यांना ते खरेदी करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहत नाही.
राष्ट्रीय वयोश्री योजनेची वैशिष्ट्ये
Mukhyamantri Vayoshri Yojana Features
- Vayoshri Yojanaराष्ट्रीय वयोश्री योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब, वृद्ध, दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेले साहित्य खरेदीसाठी मदत केली जाते
- केंद्र सरकार या योजनेला आर्थिक मदत करते
- देशातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील वृद्ध नागरिकांसाठी शारीरिक साहित्या खरेदीसाठी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या अंमलबजावण्यासाठी होणारा खर्च नागरिक कल्याण निधी च्या माध्यमातून दिला जातो
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दिलेली साहित्याची गुणवत्ता चांगल्या प्रतीची ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेचा लाभ राज्यभरातील वृद्ध, अपंग महिलांना सुद्धा दिला जातो.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी साहित्य
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, चालण्याची काठी, स्टिक, व्हीलचेअर, श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, कमरेचा पट्टा, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस आदी साहित्य दिली जातात.
राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिली जाणारी साहित्य
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
चालण्याची काठी, हात आणि पायाच्या कोपऱ्यांना बांधायची पट्टी, तीन पायाची सायकल, श्रवण यंत्र, कृत्रिम दात, चष्मा आदी साहित्य दिली जातात.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे
Mukhyamantri Vayoshri Yojana Benefits
- मुख्यमंत्रीवयोश्री योजनेच्या Mukhyamantri Vayoshri Yojanaमाध्यमातून गरीब वृद्ध, अपंग, व्यक्तींना आवश्यक असलेले साहित्य दिली जातात.
- वृद्ध आणि अपंग व्यक्ती आपली दैनंदिन कामे सहजरीत्या करू शकतील यासाठी ही साहित्य वरदान ठरत आहेत कारण या साहित्यांमुळे त्यांना इतर व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही.
- या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षापेक्षा अधिक वेळ असलेल्या व्यक्तींना आवश्यक भौतिक साहित्यांचे वाटप करण्यात येते.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभार्थी व्यक्तींना मोफत साहित्यांचे वाटप केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून वृद्ध व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील वृद्ध आणि अपंग व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना आवश्यक असलेली साहित्य खरेदी करू शकत नाहीत मात्र या योजनेच्या माध्यमातून त्यांना मोफत अशी साहित्य दिले जात असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकर होत आहे आणि त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची ही गरज भासत नाही.
- या योजनेच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होत आहे.
- या योजनेच्या माध्यमातून वृद्ध आणि दिव्यांगांना वाटप करण्यात आलेली उपकरणे वृद्ध व्यक्तींच्या शारीरिक समस्यावर मदत करतात.
मुख्यमंत्री वयश्री योजनेची पात्रता
Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility
- अर्जदार व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
- योजनेचा 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनाच लाभ दिला जातो त्यामुळे साठ वर्षा खालील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी व्यक्तीची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच साहित्यांचे वाटप केले जाते.
- 40% पेक्षा कमी अपंग असलेल्या व्यक्ती राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत.
- या योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला एकाच शारीरिक व्याधीसाठी उपक्रमाचे वाटप केले जाते तसेच अर्जदार व्यक्ती आर्थिक दृष्ट्या गरीब असणे ही आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रसाठी आवश्यक कागदपत्रे
Mukhyamantri Vayoshri Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- वयाचा दाखला किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड
- शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यास अपंगाचा दाखला
- ईमेल आइडी
आदी कागदपत्रे आवश्यक आहेत
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो
अर्जदार व्यक्तीचे वय 60 पेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द करण्यात येतो
वृद्ध, अपंग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज ठरवला जातो
अर्जदार व्यक्तीचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा कमी असल्यासही अर्ज रद्द करण्यात येतो
तसेच अर्जदार व्यक्तीने दुसऱ्या साहित्यासाठी अर्ज केला असल्यास हा अर्ज रद्द केला जातो
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Vayoshri Yojana Online Application
या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल यावर असलेल्या अप्लाय फॉर राष्ट्रीय योजना या पर्याय वर क्लिक करा
आता तुमच्या समोर एक अर्ज दिसेल त्यावर क्लिक करा
त्यानंतर या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा तसेच अर्ज भरून झाल्यानंतर यासोबत जोडावयाची कागदपत्रे ही जोडा
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा तपासून पहा अर्ज अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करून
या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा पद्धतीने तुमची या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
विशेष सूचना — राष्ट्रीय वयश्री योजनेच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी शिबिरे भरवली जातात. या शिबिराची तारीख, पत्ता आधी सर्व माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाते. त्यामुळे अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी हे शिबिरांबद्दलची तारीख आणि पत्ता माहिती करून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रसाठीची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Vayoshri Yojana Offline Apply
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून राज्यभरात सर्व ठिकाणी शिबिरे राबवली जातात त्यात आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर वर्धन नागरिकांची दिव्यांगाची तपासणी करतात आणि त्यानंतर त्यांना आवश्यक असलेले साहित्यांचे वाटपही केले जाते.
FAQ;s
प्रश्न: मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील वृद्ध दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे साहित्यांचे राज्य सरकारकडून मोफत वाटप करण्यात येते. त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन काम करण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.
प्रश्न: या योजनेचा कोणाला मिळतो लाभ?
उत्तर: या योजनेचा लाभ 65 वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो.
प्रश्न: वयोश्री योजनेचा उद्देश काय?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध, गरीब दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्यांचे वाटप करून त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या उपकरणाचे राज्य सरकारकडून मोठ्या वाटप केले जाते.
प्रश्न: मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA