Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज बैठक
nagpur farmers andolan bacchu kadu will attend mumbai meeting cm devendra fadnavis loan waiver decision : बच्चू कडू यांच्यासह सहा जणांचे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. आज सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बच्चू कडू यांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा तोडगा निघण्याची आज शक्यता आहे. कारण बच्चू कडू राज्य सरकारची चर्चा करण्यासाठी आज मुंबईला रवाना होत आहेत.
रात्री सात वाजता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीग्रहावर विविध मागण्यासाठी बैठक होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील तर आंदोलनाकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे बैठकीत सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला मुख्य सचिवांसोबत विविध विभागातील 30 वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आज तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का? याची घोषणा होते का? हे पाहणं खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
Bacchu Kadu news : राज्यातील सर्व शेतकरी एकत्र आल्यामुळे आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आम्ही एकत्र आल्याने शेतकऱ्यांचे बळ दिसले. आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. आजच्या बैठकीमध्ये कर्जमाफी, पंजाबच्या धरतीवर शेतमाल खरेदी केंद्र, 20 टक्के बोनस, हमीभाव याबाबत चर्चा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन
Nagpur Farmers Andolan : बच्चू कडू यांनी नागपूर मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे नागपूर मध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता सरकार पुढे आले आहे. सरकार आणि बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळामध्ये आज रात्री सात वाजता बैठक होणार आहे.
या बैठकीत बच्चू कडू यांच्या विविध मागण्या वर चर्चा होणार असून यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात अतिवृष्टी होत आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याची मदत मिळालेली नाही, मिळाली तरी तुटपुंजी अशा स्वरूपाची मदत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेला आहे. आता या बैठकीतून तरी शेतकऱ्यांच्या पदरी काही पडते का हे पाहावे लागेल.