Namo Netra Sanjeevani Swasthya Abhiyan in marathi : नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान

Namo Netra Sanjeevani Swasthya Abhiyan in marathi : 2 ऑक्टोंबर पर्यंत घ्या अभियानाचा फायदा

Namo Netra Sanjeevani Swasthya Abhiyan in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी साजरा झाला. या वाढदिवसाचे अवचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाची सुरुवात केली आहे.

या अभियानांतर्गत राज्यातील नेत्र संदर्भातील संपूर्ण तपासणी, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ही मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे.

Namo Netra Sanjeevani Swasthya Abhiyan in marathi नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला. 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान महाराष्ट्रभर सुरू झाले आहे.

महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोंबर रोजी असते या दिवसापर्यंत चालणाऱ्या या भव्य उपक्रमांतर्गत दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्याचे उद्दिष्ट नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियाना अंतर्गत ठेवण्यात आले आहे.

या अभियानाअंतर्गत पहिल्याच दिवशी 15000 पेक्षाअधिक नागरिकांची तपासणी झाली असून 1857 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचाराला देखील सुरुवात झाली आहे. या अभियानामुळे नागरिकांना खूप फायदा होत आहे. संपूर्ण राज्यभर हे अभियान राबवण्यात येत आहे.

या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरपर्यंत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाचा लाभ प्रत्येक गरीब नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. यासाठी सर्व सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन

namo netra sanjeevani arogya abhiyan राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये तालुका व गाव पातळीवरील नेत्रा तपासणी शिबिले आयोजित केली जात आहेत.

गाव, वस्ती, तांडे- पाडे यासह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळत आहे. ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना जिल्हा रुग्णालय व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार देखील उपलब्ध करून दिले जात आहेत.

उपक्रमात या संस्थांचा सहभाग

Namo Netra Sanjeevani Abhiyan in marathi नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानात या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्रतज्ज्ञ रुग्णालये व विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

Namo Netra sanjeevani गरीब नागरिकांना कोणताही महागडा खर्च परवडणारा नसतो. त्यात डोळा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. त्यासाठीची लागणारा खर्च हा नागरिकांना परवडणारा नसल्यामुळे अनेक जण अनेक समस्यांना सामोरे जातात, अशा परिस्थितीत हे मोफत शिबिरे गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.

  • 17 सप्टेंबरला अभियानातून मिळालेला लाभ
  • या अभियानात 426 रुग्णालयाचा समावेश आहे.
  • 128 आयोजित शिबिराची संख्या आहे.
  • 15469 शिबिरात एकूण सहभागी रुग्णसंख्या आहे.
  • 717 रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित आहेत.
  • मोफत चष्म्यासाठी 1590 रुग्णांची नोंदणी झाली आहे.
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया 857 रुग्णांची झाली आहे.
  • अन्य नेत्र संदर्भात शस्त्रक्रियांची संख्या मोतीबिंदू वगळून 127 आहे.

Namo Netra sanjeevani राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवत सुरू केलेले नमो नेत्र आरोग्य संजीवनी अभियान खूप महत्त्वाचे आहे.

या अभियानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकापर्यंत मोफत नेत्र चिकित्सा पुरविण्यात येत आहे. याअंतर्गत विशेषता झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना लाभ मिळत आहे.

राज्यातील जे रुग्ण आर्थिक दृष्ट्या मागे असल्यामुळे उपचार घेत नव्हते अशा रुग्णांनाही मोफत उपचार या अभियानाच्या माध्यमातून मिळत आहेत. या अभियानातून तळागाळातील जनतेसाठी उपचार उपलब्ध झाले आहेत. याचा लाभ राज्यभरातील नागरिकांना होत आहे.

नेत्र संजीवनी अभियानाचे जनतेला होणारे फायदे

मोफत सेवा

Namo Netra Sanjivani नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत डोळ्याची तपासणी, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया, औषधे, चष्मे यासारख्या बाबी संपूर्णपणे मोफत मिळणार आहेत. राज्यातील गरीब व मागास वर्गातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

अंधत्व टाळण्यास होणार मदत

namo netra sanjivani arogya abhiyan अनेकदा आपण पैशा अभावी डोळ्याचे असलेल्या आजाराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आजार बळावत जातो तर काही वेळे आजार वेळेवर ओळखले जात नाहीत त्यातून अंधत्व येण्याची भीती असते. त्यामुळे या मोहिमे अंतर्गत काचबिंदू, रेटिनाचे विकार, मोतीबिंदू यासारख्या आजारांचे निदान होऊन अंधत्व टाळता येणार आहे.

ग्रामीण भागासाठी मोठा दिलासा

Namo Netra Sanjivani Swasthya Abhiyan या मोहिमेअंतर्गत मोबाईल युनिट आणि गावागावात शिबिरामुळे डोंगराळ, आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांनाही सहज तपासणी व उपचार घेता येणार आहेत. यापूर्वी कुठल्याही उपचार घेण्यासाठी नागरिकांना शहरात जावे लागायचे आता या अभियानामुळे ही सेवा तुमच्या घराजवळ मिळणार आहे.

आर्थिक बचत होणार

डोळ्याची कुठलीही शस्त्रक्रिया करायची असेल तर हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र सरकारने सुरू केलेल्या या अभियानामुळे सर्व खर्च सरकार उचलणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहेत. याचा तुमच्यावर आर्थिक भारतही पडणार नाही. त्यामुळे आर्थिक बचत होणार आहे.

आरोग्य बाबत जागरूकता आवश्यक

या मोहिमेच्या माध्यमातून आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, वेळोवेळी तपासणी का महत्त्वाची आहे. जीवनशैलीमध्ये कुठले बदल करणे आवश्यक आहे. याबाबत आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आधी ठिकाणी या मोहिमेअंतर्गत जागरूकता मोहीम राबवली जाणार आहे.

मोफत औषध उपचार

या अभियानांतर्गत तुम्ही जर कुठलीही शस्त्रक्रिया केली असेल तर तुम्हाला शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचारानंतर लागणारी सर्व प्रकारचे औषधे, डोळ्यांचे ड्रॉप्स व मलम मोफत दिले जाणार आहेत. ज्यामुळे गरीब व ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यात सातत्य राहील.

अशी राबवली जाणार मोहीम

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान ही मोहीम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. या अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी पणे राबवली जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात व गावागावात नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जाणार आहे. आरोग्य विभागासोबत वैद्यकीय शिक्षण विभाग, आयएमए विविध स्वयंसेवी संस्था, मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालय, शासकीय महाविद्यालय आदींचा यामध्ये सहभाग असणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय ही सेवा देण्यासाठी केंद्रबिंदू असते. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांना जवळच्या रुग्णालयामध्ये या सेवा उपचार मिळतील.

दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी भागांमध्ये विशेष पथके व मोबाईल युनिट जाऊन तपासणी व उपचार करणार आहेत. शाळा, महाविद्यालय, ग्रामसभा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून डोळ्यांच्या आरोग्याविषयी माहितीही देण्यात येणार आहे.