Namo Shetkari Installment 2025 In Marathi : शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 15000 रुपये

Namo Installment Update 2025 Marathi : नमो शेतकरी महासन्मान योजनेत मोठा बदल

Devendra Fadnavis : सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे सरकार नवनवीन योजनांची अंमलबजावणी किंवा जुन्या योजनांमध्ये काही नवीन बदल करत असते. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे.

Namo Installment Update त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक खुशखबर आहे ती म्हणजे आता Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana  नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 12 हजार रुपये रक्कम जमा होत होती. ती रक्कम वाढवून आता 15000 रुपये करण्यात आली आहे. म्हणजे शेतकऱ्याला वार्षिक 3000 रुपये आता या योजनेतून अधिक लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

NAMO Farmer Mahasamman Nidhi schemes नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे वाटप झाले आहे. राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनामती, नागपूर येथे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक स्पर्धेतील सहभागी शेतकरी तसेच प्रगतिशील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकांचा सत्कार केला.

NAMO Farmer Mahasamman Nidhi schemes यावेळी फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर या योजनेलाच अनुसरून राज्य सरकारने सुरू केलेल्या Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक 6000 रुपये मिळत होते. या योजनेमध्ये देखील वाढ करण्यात आली असून ती रक्कम आता 3000 रुपयाने वाढली आहे.

Namo Shetkari Yojana त्यामुळे लवकरच दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यात वार्षिक 15000 रुपये जमा होतील. या योजनेमुळे मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होत असल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत बळीराजा संवर्धन योजनेच्या माध्यमातून सुमारे 25000 कोटीचे 89 प्रकल्प विदर्भात पूर्ण केले. Namo Shetkari Installment

Namo Shetkari Yojana त्याचबरोबर स्व. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भात पहिल्या टप्प्यात 4 हजार कोटींची जलसंवर्धन व इतर विकासकामे राज्य सरकारने पूर्णत्वास नेली असून आणखी 6 हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत. शेतकरी बांधवांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट योजनेचा व राज्य सरकारची महत्त्वाकांशी योजना असलेल्या ऍग्री स्टॅग योजनेचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत आढावा घेतला.