Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana in Marathi : 85 लाख शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेचा लाभ

Table of Contents

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2024  Information : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना Namo Shetkari Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये 6000 रुपये वर्षाला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत मिळणारे 6000 आणि नमो शेतकरी योजना अंतर्गत मिळणारे 6000 असे एकूण वर्षाला 12000 रुपये निधी मिळणार आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

नमो शेतकरी योजनेचा Namo Shetkari Yojana उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही हातभार लावतात ही योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी पेक्षा अधिक राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये निधी दिला जाणार आहे. केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6000 रुपये असे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 वर्षाला तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहेत. तुम्हीही शेतकरी आहात आणि या योजनेचा लाभ तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या. आजच्या लेखातून आपण नमो शेतकरी योजना म्हणजे काय, नमो शेतकरी योजनेचे काय आहेत फायदे, नमो शेतकरी योजनेचा कसा मिळतो लाभ, नमो शेतकरी योजनेचे वैशिष्ट्ये, पात्रता तसेच या योजनेचा अर्ज कसा करावा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत. Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय

What is Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana शेतकऱ्यांना 6000 रुपये आर्थिक मदत केली जाते. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचाही यात सहभाग आहे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये वार्षिक मदत केली जाते. जानेवारी 2024 मध्ये सरकारने या हप्त्याची पहिली यादी जाहीर केली होती आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभही मिळत आहे. मात्र जे शेतकरी अद्याप योजनेच्या प्रतीक्षेत आहेत ते आपल्या अर्जाची स्थिती, लाभाची यादी तपासू शकतात.

Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कमी होते. Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे :

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय-

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची थोडक्यात माहि ती

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट काय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वैशिष्ट्ये

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फायदे

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पात्रता काय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचे नियम व अटी

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आवश्यक कागदपत्रे

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची स्थिती कशी तपासावी

FAQ’s

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची थोडक्यात माहिती

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana in Short

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
उद्देशशेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
किती मिळते मदत6000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://nanny.mahait.org

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट

Purpose of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

  • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक केंद्र आणि राज्य सरकार मिळून 12 हजार रुपये दिले जातात.
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही रक्कम सरकारकडून दिली जाते.
  • या योजनेचा 1.15 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.
  • या योजनेचे उद्दिष्टे मध्ये शेतकऱ्यावरील बोजा कमी करणे हा आहे.
  • महाराष्ट्र सरकारने या योजनेचा पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये वितरित केलेले आहेत, दुसरा हप्ता ही 27 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेसोबत दुसरा आणि तिसरा असे दोन हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
  • नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत Namo Shetkari sanman Yojana शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे त्यांचे जीवनमान सुधारणे.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना अवजारे, कीटकनाशके, खते, बी-बियाणे आदी गोष्टी खरेदी करण्यासाठी हा निधी वापरता मदत होत आहे. Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वैशिष्ट्ये

Features of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

  • नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 6000 रुपये वार्षिक मदत दिली जाणार आहे.
  • यासाठी राज्य सरकारने 6 हजार 900 कोटी रुपयांचे निधी मंजूर केलेला आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान योजना Namo Shetkari sanman Nidhi Yojana केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली एक योजना आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना सामाजिक आर्थिक विकास करणे त्यांचे जीवनमान सुधारणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.  
  • या योजनेअंतर्गत करण्यात येणारी मदत शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फायदे

Benefits of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते मात्र केंद्र सरकारची प्रधानमंत्री सन्मान योजना अंतर्गत 6000 आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6000 असे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात.
  • Namo Shetkari sanman Nidhi Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
  • केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा शेतकरी त्याच्या शेतीच्या कामासाठी वापर करू शकतो.
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ही आर्थिक मदत केली जाते.
  • शेतकरी शेतीकडे प्रोत्साहित व्हावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • छोट्या मोठ्या रकमेसाठी शेतकऱ्यांना आता इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • प्रत्येक चार महिन्याला केंद्र सरकारचे 2000 रुपये आणि राज्य सरकारचे दोन हजार रुपये असे मिळून 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्याची जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे हाही योजनेचा फायदा आहे. Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana

रोजगार संगम योजना

महिला बचत गट लोन योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पात्रता

Eligibility of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

  • या योजनेचा सर्वात पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे शेती असणे महत्त्वाचे आहे.
  • अर्जदाराचे शेती असावी अल्पभूधारक आणि त्याच्या नावावर दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
  • लाभार्थी शेतकऱ्याचे पती-पत्नी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत, मात्र शेतकरी हा ग्रामपंचायत सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक नसावा किंवा सरकारी नोकरीतही नसावा.
  • इन्कम टॅक्स भरणाराही नसावा
  • 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत आणि त्या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचे नियम व अटी

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Terms & Conditions

  • नमो शेतकरी महासन्मान योजना Namo Shetkari sanman Nidhi Yojana ही फक्त केवळ महाराष्ट्र राज्यापूर्ती योजना आहे त्यामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच घेऊ शकतात.
  • महाराष्ट्र राज्य बाहेर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.  
  • केंद्र सरकारच्या सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.
  • शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाची शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याबरोबरच हे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे ही आवश्यक आहे.
  • सरकारी सेवेत काम करणारा कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसेल तसेच इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती ही या योजनेसाठी पात्र नाही.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आवश्यक कागदपत्रे

Documents of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

  • शेतकऱ्याच्या आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • उत्पन्नाचा प्रमाणपत्र
  • जमिनीचा 7/12, 8अ
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Online Apply

नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. घरी बसल्या बसल्याही तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही अर्ज करू शकता. त्यामुळे शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होते.

नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी Namo Shetkari sanman Yojana अर्ज करताना शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करून लागू नये म्हणून ही अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारने सोपी ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना कुठली अडचण येत नाही.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana या योजनेसाठी कुठल्याही जाती-धर्माची अट नाही मात्र फक्त ज्यांच्याकडे शेती आहे असा शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

  • नमो शेतकरी योजनेचा Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana लाभ घेण्यासाठी तुम्ही स्वतःची नोंदणी खालील प्रक्रियेद्वारे करू शकतात

सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ग्रामीण शेतकरी नोंदणी हा पर्याय दिसेल.

आता यामध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक आहे का याची खात्री करून घ्या.

त्यानंतर अर्ज करताना प्रथम आपले राज्य निवडा.

राज्य निवडल्यानंतर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे सबमिट करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज दिसेल ज्यामध्ये तुम्ही जिल्हा, तालुका, गाव आदि माहिती निवडून सबमिट करा.

त्यानंतर तुम्ही तुमच्या जमीन नोंदणी आयडी समाविष्ट करा.

तुमचा शिधापत्रिका क्रमांक अर्जावर भरा.

त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती जसे की, क्षेत्रफळ खाते नंबर, बँक खाते नंबर आदीची माहिती भरा.

अर्ज भरून झाल्यानंतर एकदा तपासून पहा की याच्यावर तुम्ही दिलेली माहिती सर्व अचूक आहे का त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

  • ऑनलाइन अर्ज करण्याची दुसरी पद्धत

Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana

अर्ज करण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल यावर नवीन अर्जदार नोंदणी या पर्याय निवडा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आणि त्यामध्ये तुम्हाला अर्जावर विचारलेली सर्व माहिती नाव, गाव, पत्ता अधिक भरावी लागेल.

अर्जावर सर्व माहिती भरणे झाल्यावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

त्यानंतर सेव बटनावर क्लिक करावे.

अशा प्रकारे तुमची नवीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तिसरी पद्धत

Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana

सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर नमो शेतकरी निधी योजनेचा अर्ज उघडेल.

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, आधार कार्ड, बँक खाते नंबर, शेती सातबारा क्रमांक आदी सर्व माहिती भरा.

सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.

सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा तपासून पहा आणि तपासून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

  • ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana

शेतकऱ्याला सर्वात प्रथम जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल.

कृषी विभागातून अर्ज घेतल्यानंतर त्यावर संबंधित सर्व माहिती शेतकऱ्यांनी भरून द्यावे लागेल.

अर्जावर विचारलेली सर्व माहिती भरून दिल्यानंतर आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतील.

त्यानंतर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे तुमचा अर्ज जमा करू शकता.

अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेता घेऊ शकाल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची स्थिती कशी तपासावी

नमो शेतकरी योजनेचे Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana अपडेटची स्थिती तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी शेतकरी यादी तपासावी आणि त्या यादीमध्ये आपले नाव शोधून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी.

सर्व प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला.

जा होम पेजवर गेल्यानंतर शेतकरी हप्ता स्थिती या पर्यायाचा निवड करा.

शेतकऱ्याचे श्रेणी निवडा ग्रामीण किंवा शहरी.

आवश्यक माहिती भरा ओटीपी पर्याय निवडा.

तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी मिळेल तो ओटीपी तुम्ही इथे सबमिट करा.

त्यानंतर संपूर्ण नमो शेतकरी योजना लाभार्थ्याची यादी तुमच्यासमोर दिसेल.

या यादीत तुम्ही तुमचे नाव आणि तुमच्या नावावर सरकारने किती हप्ते जमा केले आहेत याची संपूर्ण माहिती तपासू शकता.

FAQ’s

प्रश्न : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कोणासाठी आहे?

उत्तर : महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

प्रश्न : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती मदत मिळते?

उत्तर : नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक तीन टप्प्यात मदत दिली जाते. मात्र केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्माननिधी योजना सलग्न असल्यामुळे शेतकऱ्याला 12000 रुपये मिळतात. यात केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे सहा असे मिळून 12000 मिळतात.

प्रश्न : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उद्देश काय?

उत्तर : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर : या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News 

https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA