NPS Vatsalya Yojana For Children In Marathi : 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर कोटींचा परतावा
NPS Vatsalya Yojana For Children : केंद्र सरकारने मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करतो. मुलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित व्हावे या दृष्टीने एक NPS योजना सरकारने सुरू केली आहे. एनपीएस वात्सल्य योजना हे या योजनेचे नाव आहे.
Vatsalya Yojana For Children या वात्सल्य योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमच्या मुलांना भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ही योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दलची अधिक माहिती.
एनपीएस वात्सल्य योजना ही 18 सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झाली. या योजनेत आई-वडील आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करतात. मुलांसाठी लॉन्ग टर्म सेविंग करतात. या योजनेत 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या नावाने गुंतवणूक केली जाईल. यामध्ये भारतीय आणि एनआरआय नागरिक देखील आपले खाते उघडू शकतात. हे खाते त्यांच्या आई-वडिलां द्वारे चालवले जाते.
Vatsalya Yojana योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकी साठी जास्तीत जास्त कुठलीही रक्कम नाही. तुम्ही कितीही रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकतात. यामधील 25% रक्कम ही शिक्षण, मेडिकल यासाठी वापरता येईल.
NPS Vatsalya Scheme या योजनेत तुम्ही 18 ते 21 या वयोगटात दोनदा पैसे काढू शकणार आहात. एनपीएस वात्सल्य योजनेत तुमच्या मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याची केवायसी करणे अनिवार्य आहे. यामध्ये तुम्ही जर पैसे काढले तर 80 टक्के रक्कम काढू शकता त्यातील 20% रक्कम ही एनयुटी मध्ये गुंतवली जाणार आहे.
NPS Vatsalya Yojana यामध्ये तुम्ही 8 लाखांपर्यंतची रक्कम काढू शकतात. एमपीएस वात्सल्य योजनेत तुम्हाला 9 टक्के परतावा मिळतो. अशी ही सरकारची कोटींचा फायदा करून देणारी योजना आहे. तर लवकरात लवकर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्या.
11.57 कोटींचा फंड
जर तुम्ही या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक केली तर तुम्हाला 9 टक्के परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत 11.57 कोटी रुपये मिळवू शकतात.