Palna Yojana Information In Marathi : तुमच्या मुलाची काळजी घेईल पाळणाघर, राज्य सरकारची पाळणाघर योजना
Palna Yojana 2025 In Marathi : राज्यातील अनेक महिलांना आपल्या पायावर उभे राहून कुटुंबाची आर्थिक मदत करायची असते मात्र लहान बाळामुळे त्यांना नोकरी करणे कठीण जाते. त्याचे संगोपन कोण करणारा? अशी काळजी त्यांना सतत स्वतः होत असते.
Palana Yojana मात्र आता ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने पुढाकार घेऊन नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ‘महिलांनो, आता तुम्ही करा बिनधास्त नोकरी’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Palana Scheme कारण यामुळे महिलांना नोकरी करता येणार आहे आणि त्यांच्या मुलांची काळजी पाळणा घरात घेतली जाणार आहे. याचा फायदा राज्यातील नोकरी करणाऱ्या हजारो महिलांना होणार आहे.
Maharashtra Government Palna Yojana राज्य सरकारची लाडकी बहीण योजना पॉपुलर ठरल्यानंतर आता पाळणाघर योजना सुरू करण्यात आली आहे. या पाळणाघरामध्ये एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येणार आहे. या पाळणा घरामध्ये वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौच्छालय यासारख्या सुविधा असणार आहेत.
Maharashtra Government Palna Yojana नोकरी करत असताना महिलांना त्यांच्या मुलांची काळजी घेता यावी यासाठी ही पाळणाघर योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ या उपक्रमामध्ये ही योजना असून यासाठी 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे.
यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे लहान मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि चांगली सुविधा असलेले पाळणाघर असणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये 345 ठिकाणी पाळणाघरे राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात येणार आहेत. या पाळणाघरामध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषक आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण, बाळांची काळजी या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
या पाळणाघरामध्ये मुलांना सकाळचा नाष्टा, दुपारचे गरम शिजवलेले जेवण, आणि संध्याकाळचा नाष्टा असे तीन वेळेचे जेवण दिले जाणार आहे.
राज्य सरकारने सुरू केलेले हे पाळणाघर महिन्यातील 26 दिवस सुरू राहणार आहे. दररोज साडेसात तास ते सुरू असेल. या पाळणा घरामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असणार आहेत. यामध्ये पाळणा सेविका व एक पाळणा मदतनिस असणार आहे.
लहान मुलांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा यामध्ये उपलब्ध असणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये प्रति महा भत्ता देण्यात येणार आहे.
अंगणवाडी मदतनीस यांना 750 रुपये प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना 5500 प्रतिमाह तर पाळणाघर मदतनीस यांना 3 हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष राज्यात सुरूच राहील. सध्या राज्यातील महिलांना 1500 रुपये दिले जातात. योग्य वेळी त्यामध्ये वाढ केली जाईल.
याबरोबरच राज्यामध्ये बचत गटाद्वारे 25 लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत. यंदा अजून 25 लाख लखपती दीदी होतील आणि पुढील काही वर्षात ही संख्या एक कोटीच्या घरात पोहोचले. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र देशात अव्वल आहे.
मुलींसाठी केजी ते पीजी शिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी पहिल्या टप्प्यात 10 मॉल उभारणीचे कामही सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.