Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 In Marathi : उच्च शिक्षणासाठी सरकार करणार 60 हजारांची मदत

Pandit Dindayal Upadhyay Yojana Information In Marathi : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 2024 मराठी माहिती

Pandit Dindayal Upadhyay Yojana: महाराष्ट्र सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सतत नवनवीन योजना आणत असते. आता सरकारने अशाच प्रकारची विद्यार्थ्यांना लाभ होणारी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना आहे.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana राज्यातील बहुतांश कुटुंब गरिबी रेषेखालील असून त्यातील अनेक जण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. त्यामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. यासाठी त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. तरीपण ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना Pandit Dindayal Upadhyay Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, राहण्याची निवास सुविधा आणि भोजनाची व्यवस्था या योजनेअंतर्गत करण्यात येते.

Pandit Dindayal Upadhyay Yojana

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे काय

What is Pandit Dindayal Upadhyay Yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासी भत्ता देण्यात येतो यासाठी विद्यार्थ्यांना 60,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या हक्काचे घर सोडून शहरात येऊन राहावे लागते. यासाठी त्यांना मोठा खर्च लागतो. पण आर्थिक स्थितीमुळे अनेक विद्यार्थी शहरात येऊन उच्च शिक्षण घेत नाहीत. त्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील आहेत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही मोजकीच आहे. त्यामुळे त्यांना इतर शहरात जाऊन राहणे, भोजन आणि शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे पैसे अभावी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही हे विद्यार्थी वंचित राहतात. मात्र सरकारने या सर्व बाबींचा विचार करून अशा विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना Pandit Dindayal Upadhyay Yojana सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरी भागात यावे लागते, मात्र तेथील वस्तीगृहात त्यांना जागा मिळणे प्रत्येकासाठी शक्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाबरोबरच राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांना भोजनाची व्यवस्था ही नसते. तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्चही त्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व कारणांमुळे अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना स्वयं महा डीबीटी योजना अंतर्गत उच्च शिक्षणासाठी भोजन निवास व शैक्षणिक खर्चासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट सरकारच्या वतीने आर्थिक मदत जमा केली जाते. या रकमेतून विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून शकतात.

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात एकूण 495 वस्तीग्रह मंजूर करण्यात आलेली आहेत. या एकूण वसतिगृहामध्ये 61 हजार 70 एवढे विद्यार्थी राहू शकतात. यापैकी 491 सरकारी वसतिगृह सुरू असून यापैकी 283 वस्तीग्रह ही मुलांची तर 208 वस्तीग्रह ही मुलींसाठी आहेत या वस्तीग्रहांची क्षमता 58,495 एवढी आहे.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2024 महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन वैद्यकीय अभियांत्रिकी, आयटीआय, अल्प मदतीचे कौशल्य विकास वर आधारित अभ्यासक्रम इत्यादीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेमुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. हे विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून महानगराच्या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत मात्र त्यांना राहण्याची, जेवणाची सुविधा पुरवण्यासाठी या विभागाअंतर्गत शासकीय वस्तीगृहामध्ये त्यांना प्रवेश दिला जातो आणि ही सुविधा पुरवली जाते.

ठळक मुद्दे :-

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे काय

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची थोडक्यात माहिती

पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेचा मुख्य उद्देश काय

शासन निर्णय काय झाला

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे उद्दिष्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची वैशिष्ट्ये

पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे कोण आहेत लाभार्थी

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे फायदे

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रम

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या पात्रता

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अटी

पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया

FAQ’s

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची थोडक्यात माहिती

Pandit Dindayal Upadhyay Yojana in Short

योजनेचे नावपंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
कोणी सुरू केलीसामाजिक न्याय व कल्याण विभाग
लाभार्थी कोणराज्यातील विद्यार्थी
आर्थिक मदत किती मिळते60 हजार रुपये
उद्देश कायविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे
अर्जाची प्रक्रियाऑनलाईन
https://swayam.mahaonline.gov.in

पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेचा मुख्य उद्देश काय

Purpose of Pandit Dindayal Upadhyay Yojana

Pandit Dindayal Upadhyay Yojana पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी भोजन भत्ता, निवास, शैक्षणिक मदत आदी पुरवणे हा आहे.

मात्र आता पदवी, पदव्युत्तर शिक्षण, उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत असल्यामुळे आता वस्तीग्रह मध्ये राहण्याची क्षमता कमी पडत आहे. मागील तीन शैक्षणिक वर्षामध्ये वस्तीग्रह मध्ये प्रवेशासाठी 75 हजार अर्ज आले होते. मात्र वस्तीग्रहाची क्षमता केवळ 58,495 असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळाला नाही. राज्यातील लोकप्रतिनिधी विद्यार्थी संघटना अजून वस्तीग्रह निर्माण करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत. मात्र नवीन वस्तीग्रह मंजूर करून वस्तीगृहाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य साठी निश्चित रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Pandit Dindayal Upadhyay Yojana

शासन निर्णय काय झाला

Pandit Dindayal Yojana राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सरकारी वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यास इयत्ता 12 नंतरच्या उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास, शैक्षणिक साहित्यासाठी त्यांना थेट आर्थिक मदत करण्यात येत आहे. यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana राबविन्यास सरकारने मंजुरी दिली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून 37 सरकारी वस्तीगृहात प्रवचने मिळालेले एकूण 20,000 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य त्यांच्या आधारकार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली होती. आणि ह्या पद्धतीने त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे उद्दिष्ट

Objectives of Pandit Dindayal Upadhyay Yojana

  • राज्यातील 10 वी, 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना सरकारी वस्तीगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सुविधा, निवास भत्ता उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था होईल वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
  • मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे राज्यातील मागास विद्यार्थ्यांचे साक्षरतेचे प्रमाण वाढवणे.
  • उच्च शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणे हा Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची वैशिष्ट्ये

Features of Pandit Dindayal Upadhyay Yojana

  • सरकारकडून मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • शैक्षणिक आणि निवासी खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते तसेच आदिवासी विभागातील ही पहिली योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
  • आदिवासी अनुसूचित जाती, जमातींच्या अपंग विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाते. 
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्यासाठी विद्यार्थी मोबाईलच्या सहाय्याने घरी बसून यासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन वेळ खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.
  • या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अर्जाची स्थिती वारंवार तपासून शकतो.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने अंतर्गत 3 प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले आहे.  शहरांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या तसेच शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण घेण्याच्या वार्षिक खर्चासाठी खालील प्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांचा आधारशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येते.

पहिला प्रकार :-

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम :- 

भोजन भत्ता       32,000
निवास भत्ता  20,000
निर्वाह भत्ता         8,000
एकूण वार्षिक खर्च60,000

दूसरा प्रकार :-

इतर महसूल विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम :-

भोजन भत्ता       28,000
निवास भत्ता  15,000
निर्वाह भत्ता         8,000
एकूण वार्षिक खर्च51,000

तिसरा प्रकार :-

इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम

भोजन भत्ता       25,000
निवास भत्ता  12,000
निर्वाह भत्ता         6,000
एकूण वार्षिक खर्च43,000

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे कोण आहेत लाभार्थी

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच मागास वर्गातील विद्यार्थी

Pandit Dindayal Upadhyay Yojana

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे फायदे

Benefits of Pandit Dindayal Upadhyay Yojana

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना Pandit Dindayal Yojana अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना 60,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत करते.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2024 विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • देशभरातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारते.
  • या योजनेअंतर्गत शिक्षण घेतल्यास विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहत नाही.
  • विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनतो.
  • विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारते.
  • विद्यार्थ्यांचा आर्थिक विकास होतो.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमुळे राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करतील.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रम

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

  • वैद्यकीय महाविद्यालय
  • उच्च महाविद्यालय
  • आयटीआय
  • तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय
  • अल्पमुदतीचे कौशल्य वरील आधारित अभ्यासक्रम

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या पात्रता

Eligibility of Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा Pandit Dindayal Upadhyay Yojana लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा आणि आदिवासी जमातीचा असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर विद्यार्थ्याला त्याचे जात प्रमाणपत्र अर्ज करताना सोबत जोडणे आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.  
  • तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रिकत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादित वाढ होईल त्यानुसार पालकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न मर्यादा त्याप्रमाणे लागू होईल.
  • विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्या बँक खात्याशी त्याचा आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे त्याच शहराच्या ठिकाणी त्याचे पालक रहिवाशी नसावेत.
  • या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने त्याच शहरामध्ये राहणे आवश्यक आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अटी

Pandit Dindayal Yojana Conditions 

पंडित दीनदयाळ योजनेच्या अटी खालील प्रमाणे :-

Pandit Dindayal Yojana

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच घेता येईल.
  • ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशांना या योजनेचा लाभ होईल.
  • विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा Pandit Dindayal Yojana अंतर्गत लाभ मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथील संबंधित शहरांमध्ये राहणे आवश्यक आहे.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याने काही कारणास्तव मध्येच शिक्षण सोडले तर त्या विद्यार्थ्याला दिले गेलेली लाभाची रक्कम वसूल केली जाईल.
  • विद्यार्थी त्याच शहरात शिक्षण घेत असता कामा नये.
  • या योजनेअंतर्गत एका विद्यार्थ्यास फक्त 7 वर्षे लाभ दिला जाईल त्यानंतर त्या विद्यार्थ्याला वस्तीगृहात प्रवेश दिला जाणार नाही.
  • विद्यार्थी हा त्याच्या शहरापासून दूर शिक्षण घेत असावा.
  • अर्जात जर चुकीची माहिती आढळून आली आणि अर्ज रद्द झाला तर त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार असेल.
  • विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  • या योजनेचा लाभ पोस्ट मॅट्रिक शिक्षणासाठीच दिला जाईल.
  • पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच लाभ देण्यात येईल.
  • या योजनेचा लाभ 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी दिला जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याने एका शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतलेला असेल आणि पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
  • त्याचप्रमाणे पहिली पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश घेतला असल्यास देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्याची शालेय किंवा महाविद्यालयात 80 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असणे आवश्यक आहे.
  • जर एखादा विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमा दरम्यान नापास झाला, तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्याला मागील वर्षात 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांचा प्रवेश हा सरकारच्या मान्यता प्राप्त संस्थेमध्ये असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी नोकरी करत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्याचे शिक्षण संस्था आणि त्याच्या शहराचे ठिकाण हे दोन्ही एकच असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा कमी असावे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा Pandit Dindayal Yojana लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाच्या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करावा लागेल.
  • विद्यार्थी हा 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत तांत्रिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिक मदत दिली जाणार नाही.
  • ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तो विद्यार्थी त्या संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्याला पात्र राहील, परंतु विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत पास होणे आवश्यक आहे.

पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

Documents of Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • डोमिसाइल सर्टिफिकेट
  • बोनाफाईड
  • दहावी आणि बारावीची मार्कशीट
Pandit Dindayal Upadhyay Yojana

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Apply

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा Pandit Dindayal Upadhyay Yojana अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो त्यासाठी स्टेप बघू.

स्टेप 1 : रजिस्ट्रेशन करणे

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.  

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन हा पर्याय आहे.  

त्या पर्यायावर क्लिक करा रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करताच तूमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

त्यामध्ये विचारलेली तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, आधार कार्ड, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आदीची संपूर्ण माहिती भरून सेव या बटनवर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमच्या रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.  

स्टेप 2 : अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे

अर्जदाराला सर्वप्रथम पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या Pandit Dindayal Upadhyay Yojana अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.  

वेबसाईटवर जाताच एक होम पेज उघडेल तिथे तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजनेचा अर्ज उघडेल.  

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

अशाप्रकारे तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने ची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

FAQs

प्रश्न : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा Pandit Dindayal Yojana लाभ कोणाला मिळतो?

देशातील आदिवासी भागातील तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेत येतो.

प्रश्न : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत Pandit Dindayal Yojana लाभाची रक्कम किती मिळते? 

उत्तर : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत 60 हजार रुपये लाभ रक्कम मिळते.

प्रश्न : पंडित दीनदयाळ उपाध्याय Pandit Dindayal Yojana योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा अर्ज हा ओळीने पद्धतीने करावा लागतो.

प्रश्न : पंडित दीनदयाळ उपाध्याय Pandit Dindayal Yojana योजनेचा उद्देश काय?

उत्तर : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे हा आहे. 

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA