Pasaydan Marathi : पसायदान
Pasaydan Marathi : पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरी चा सारांश आहे. ज्ञानेश्वरीतील विचार सारांशरूपाने पसायदानात मांडलेला आहे. Pasaydan पसायदान काळ, धर्म, पंथ या सर्वांच्या पलीकडे आहे, हे या प्रार्थनेचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरी या संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथाचा शेवट (अध्याय १८ वा – ओवी १७९४ ते १८०२) पसायदान या प्रार्थनेने होतो.
पसायदान
Pasaydan
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥२॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥४॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥७॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । हो आवें जी ॥८॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥